श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

 


कोपरगांव प्रतिनिधी

कोपरगांव तालुक्यातील दक्षिणगंगा गोदावरी नदीलगत असलेल्या बेट भागातील संजीवनी मंत्राचे जनक म्हणून प्रसिद्ध असलेले जगातील एकमेव अतिशय पुरातन जागृत धार्मिक ऐतिहासिक पौराणिक संदर्भ असलेले ग्रामदैवत श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिराचे गाभार्‍याचे वरील भागात 12 बाय 12 या आकाराचे ध्यानमंदिर आढळून आले आहे ते पहाण्यासाठी भाविकभक्त, नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.


सध्या श्री गुरुशुक्राचार्य महाराज पुरातन मंदिराच्या नुतनीकरणाचे काम सध्या सुरु आहे. त्यावेळेस काम करतांना तीन आठवडे पूर्वी हे ध्यान मंदिर आढळून आले आहे. त्याबाबत आज 
मंदिर प्रशासनाच्या वतीने पत्रकार परिषद घेवून ही माहिती देण्यात आली.


हजारो वर्षाची परंपरा असलेल्या जगातील एकमेव 
मंदिर असलेल्या श्री गुरुशुक्राचार्य महाराजांची महती संपूर्ण जगभर पसरली आहे. श्रावण महिन्या निमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परम सदगुरु श्री गुरुशुक्राचार्य मंदिर गाभाऱ्याची दुरुस्ती व सुशोभिकरणाचे काम नासिक येथील उद्योगपती यांचे मदतीने व सहकार्याने हे काम पूर्णत्वास जात आहे. गाभारा दुरुस्ती समोरील सभामंडपाच्या वरील भागात कोणी कधीही न पाहिलेली छोटीसी खिडकी आढळून आली. ती खिडकी उघडली असता सभामंडपाच्या गच्चीच्या खाली 12 बाय 12 या जागेत सहा फूट उंचीची पोकळ जागा आढळून आली. बहुदा हे त्याकाळचे ध्यान मंदिर असावे असा कयास लावला जात आहे.


या 
मंदिराचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, सचिव एडवोकेट संजीव कुलकर्णी, खजिनदार एडवोकेट गजानन कोराळकर, सदस्य सुहास कुलकर्णी, हेमंत पटवर्धन, स्थानिक व्यवस्थापन कमिटी सर्वश्री सचिन परदेशी मंदिर प्रमुख, प्रसाद पर हे मंदिर उपप्रमुख, तसेच सदस्य संजय वडांगळे, राजेंद्र उर्फ मुन्ना आव्हाड, भागचंद रुईकर, बाळासाहेब लकारे, बाळासाहेब गाडे, मधुकर साखरे, सुजित वरखेडे, विजयराव रोहम, आदिनाथ ढाकणे, विलास दशरथ आव्हाड, विलास रंगनाथ आव्हाड, अरुण जोशी, दिलीपराव सांगळे, दत्तात्रेय सावंत, महेंद्र नाईकवाडे, विकास शर्मा, विशाल राऊत, राजाराम पावरा व्यवस्थापक या सर्वांच्या देखरेखीखाली  8,10 वर्षापासून मंदिर परिसरात विविध बदल केले जात आहेत. पूर्वीचा श्री क्षेत्र बेट हा दंडकारण्याचा एक भाग होता. चोहोबाजुंनी त्याला पाण्याने वेढले होते.

या पावनभूमीत भार्गव ॠषींचे पूत्र कवी म्हणजेच श्री गुरुशुक्राचार्य महाराज यांचे कर्मस्थान असून त्यांच्या वास्तव्याने घोर तपश्‍चर्यने पावन व पवित्र झालेला हा परिसर आहे. येथे श्री गुरुशुक्राचार्यांचा वास्तव्याचा व त्या बरोबरच भगवान शंकराकडून मिळवलेल्या संजीवनी मंत्राचा कचदेव (बृहस्पती पूत्र) व शुक्राचार्यांची कन्या देवयानी यांचे प्रेमकथेचा संदर्भ आहे त्याचा उल्लेख ययाती या कादंबरीत प्रामुख्याने आलेला आहे, कचदेव यांनी प्रेम कहानी म्हणजे जगातील पहिली प्रेम कहानी येथे घडली होती अशी माहिती अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी दिली.

उपस्थितांचे स्वागत, सूत्रसंचालन मंदिर प्रमुख सचिन परदेशी यांनी केले, तर आभार आदिनाथ ढाकणे यांनी मांनले.

श्री गुरुशुक्राचार्य महाराजांच्या शिविंपंडीस 17 किलो चांदीचे लेपण केले जाणार आहे त्यासाठी डॉक्टर अजय गर्ग चंदिगड दोन किलो चांदी, डॉ.रामदास आव्हाड यानी 2 किलो चांदी, माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील कोपरगाव दोन किलो चांदी, संजय रॉय पिंपरी चिंचवड एक किलो चांदी, कृष्णा क्षीरसागर कोपरगाव, व इतर शुक्रभक्तानी चांदी देवू केली आहे त्याचेही काम लवकरच केले जाणार असल्याची माहिती अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड मंदिर प्रमुख सचिन परदेशी यांनी यावेळी दिली.

गुरु शुक्राचार्य महाराज मंदिराची माहिती मराठी व इंग्रजी या भाषेतून शुक्र तीर्थ नावाने स्टोरी टेलवर ऑडिओ स्वरूपात भाविकांना पुस्तकही उपलब्ध करून दिले आहे.


Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा