श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!
कोपरगांव प्रतिनिधी कोपरगांव तालुक्यातील दक्षिणगंगा गोदावरी नदीलगत असलेल्या बेट भागातील संजीवनी मंत्राचे जनक म्हणून प्रसिद्ध असलेले जगातील एकमेव अतिशय पुरातन जागृत धार्मिक ऐतिहासिक पौराणिक संदर्भ असलेले ग्रामदैवत श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिराचे गाभार्याचे वरील भागात 12 बाय 12 या आकाराचे ध्यानमंदिर आढळून आले आहे ते पहाण्यासाठी भाविकभक्त, नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. सध्या श्री गुरुशुक्राचार्य महाराज पुरातन मंदिराच्या नुतनीकरणाचे काम सध्या सुरु आहे. त्यावेळेस काम करतांना तीन आठवडे पूर्वी हे ध्यान मंदिर आढळून आले आहे. त्याबाबत आज मंदिर प्रशासनाच्या वतीने पत्रकार परिषद घेवून ही माहिती देण्यात आली. हजारो वर्षाची परंपरा असलेल्या जगातील एकमेव मंदिर असलेल्या श्री गुरुशुक्राचार्य महाराजांची महती संपूर्ण जगभर पसरली आहे. श्रावण महिन्या निमित्त मंदि रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परम सदगुरु श्री गुरुशुक्राचार्य मंदिर गाभाऱ्याची दुरुस्ती व सुशोभिकरणाचे काम नासिक येथील उद्योगपती यांचे मदतीने व सहकार्याने हे काम पूर्णत्वास जात आहे. गाभारा दुरुस्ती समोरील सभामंडपाच्या व