आयवोमी इलेक्ट्रिक स्कूटरच्यावतीने ग्राहकांसाठी अनेक योजना 15 ऑगस्टच्या पहिल्या लकी सोडतीत

 नगरमधील विकास वाघ यांना बक्षीस

अहमदनगर : इलेक्ट्रिक स्कूटरमधील प्रथितयश असलेली भारतातील नामांकित कंपनी आयवोमीतर्फे ग्राहकांसाठी अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. यातील नुकत्याच झालेल्या पहिल्या भाग्यवान ग्राहक सोडतीत येथील विकास भाऊसाहेब वाघ यांना एका गाडीवर दुसरी गाडी (जीत-एक्स मॉडेल) तसेच दुसर्‍या एका ग्राहकास एक्स शो-रुम 100% कॅशबॅक योजनेचा लाभ मिळाला, अशी माहिती सुदोहा शोरुमचे संचालक श्री. नंदकुमार सुपेकर यांनी दिली.

15 ऑगस्ट रोजी सावेडी रस्त्यावरील सुदोहा सेल्स कॉर्पोरेशन या आयवोमी स्कूटर विक्री दालनात भाग्यवान विजेता सोडत काढण्यात आली. त्यात वरील भाग्यवान ग्राहकांना बक्षिसे मिळाली. या कंपनीच्यावतीने आता दुसरी सोडत येत्या 30 ऑगस्ट रोजी होणार आहे. ग्राहकांनी या सोडतीत सहभागी होण्यासाठी या दालनास जरूर भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

इलेक्ट्रिक स्कूटर गाड्यांमध्ये आयवोमी कंपनी एक नामांकित असून या गाड्यांना ग्राहकांची प्रथम पसंती आहे. गेल्या सुमारे पाच वर्षांपासून या कंपनीचे सावेडीमध्ये दालन असून आतापर्यंत सुमारे 500 गाड्या ग्राहकांनी खरेदी केल्या असून या सर्वांचा अनुभव उत्तम आहे. गाडी खरेदीदारांसाठी आयवोमी कंपनीतर्फे येथे टेस्ट राईडचीही व्यवस्था करण्यात आली आहे. इच्छुकांनी 8380838027 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून यासंबंधी अधिक माहिती घ्यावी, असे आवाहन नंदकुमार सुपेकर यांनी केले आहे.






Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"