दारुल उलूम मदरसा मधील विद्यार्थ्यांचे आर.एम.टी. तायक्वांदो स्पर्धेत यश
दारुल उलूम मदरसा मधील विद्यार्थ्यांचे आर.एम.टी. तायक्वांदो स्पर्धेत यश
सुवर्ण, रौप्य व कास्य पदकांची कमाई
मोबाईलमध्ये अडकलेल्या मुलांना मैदानावर आणण्याची गरज -दिनकराव मुंडे
अहमदनगर - केडगावमध्ये झालेल्या आर.एम.टी. तायक्वांदो चषक स्पर्धेत आलमगीर येथील दारुल उलूम मदरसा मधील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश संपादन केले. खेळाडूंनी विविध गटात सुवर्ण, रौप्य व कास्य पदकांची कमाई केली. या गुणवंत खेळाडूंचा दारुल उलूम मदरसा मध्ये भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे दिनकराव मुंडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देऊन सत्कार करण्यात आला.
दारुल उलूम मदरसा मधील विद्यार्थ्यांना शोदान शोदान इंटरनॅशनल कराटे फेडरेशनच्या माध्यमातून फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रशिक्षक गौस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे व तायक्वांदोचे प्रशिक्षण दिले जात आहे. दीड महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण करुन खेळाडू या स्पर्धेत उतरले होते. यामध्ये हम्माद अन्सारी, अरशीद सय्यद, मुख्तार सय्यद, सुलतान शेख यांनी सुवर्ण पदक पटकाविले. तर सुफियान शेख, हमजा शेख यांनी रौप्य तर अयान सय्यद, समीर शेख, खालिद शेख यांनी कास्य पदक पटकाविले. तसेच या स्पर्धेत अयान पठाण, अफ्फान शाह, उमर बागवान, नोमान मीरजा, तलहा शेख, याहिया शेख, अब्दुल खान, युसूफ पठाण, मुशरफ चौस, सईद शेख, अस्लम शेख, याकूब शेख या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या खेळाडूंचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रशिक्षक गौस शेख, मदरसाचे प्राचार्य शेख रियाज अहमद बशीर, फिरोज शेख, गुलाम दस्तगीर, सचिन धोंडे, सचिन कोतकर, अल्ताफ खान, हाजी समीर शेख, स्नेहल, जहीर आदी उपस्थित होते.
प्रशिक्षक गौस शेख म्हणाले की, शिक्षणाबरोबर खेळाला देखील महत्त्व आले आहे. अनेक मुला-मुलींनी खेळातून आपले करियर घडविले आहे. मदरसा मधील मुलांना देखील मैदानी खेळाची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने व शारीरिक तंदुरुस्तीसाठी कराटे व तायक्वांदोचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
दिनकराव मुंडे म्हणाले की, निरोगी आरोग्य व आनंदी जीवनासाठी व्यायाम हा महत्त्वाचा घटक आहे. कराटे खेळातून शारीरिक व्यायाम होऊन स्वसंरक्षणाचे धडे देखील मिळतात. मोबाईलमध्ये अडकलेल्या मुलांना मैदानावर आणण्याची गरज निर्माण झाली आहे. मदरसामध्ये धार्मिक व शालेय शिक्षणाबरोबरच दिले जाणारे कराटे व तायक्वांदो प्रशिक्षणाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. खेळाडूंनी खेळात प्राविण्य दाखवून आपली प्रगती साधावी व शहरासह आपल्या देशाचे नाव उज्वल करण्याचे त्यांनी सांगितले.
Comments
Post a Comment