शहरात उद्योग व्यवसाय झपाट्याने वाढत असल्याने कामगारांची नोंदणी करण्याची मागणी
राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने कामगार आयुक्त यांना निवेदन. शहरात उद्योग व्यवसाय झपाट्याने वाढत असल्याने कामगारांची नोंदणी करण्याची मागणी- गजानन भांडवलकर.
अहमदनगर - अहमदनगर शहर झपाट्याने विकसित होत असून शहरांमध्ये नवे नवे उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणात येत असून आलेले उद्योग व्यवसायामध्ये कामगार हे भूमिपुत्र नसून परप्रांतीय मोठ्या संख्येने आलेले आहे. तरी कामगार आयुक्त कार्यालय मार्फत आलेला नवा उद्योग व्यवसाय व कामगार या सर्वांची नोंदणी असणे गरजेचे असून नोंदणी करण्याच्या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवळे यांना निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचे जिल्हा अध्यक्ष गजानन भांडवलकर, उपाध्यक्ष अक्षय भिंगारदिवे, नितीन लिगडे पाटील, निलेश बांगरे, वैभव म्हस्के, विशाल म्हस्के, वैभव शेवाळे, पवन कुमटकर, शेखर पंचमुख, अशोक जगताप, हेमराज भालसिंग, सुरज जपे, यश लिगडे, साईराज शेळके, ओंकार गोडाळकर, सचिन गायकवाड आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की अहमदनगर शहरांमध्ये नव्याने आलेले उद्योग व्यवसाय व कामगार यांची नोंदणी करणे गरजेचे असून परप्रांतीय हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्या राज्यात गुन्हा करून येतात व येथे कामगार होतात तरी यांची कामगार आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी असणे गरजेची असून. कामगार हा बारा तास काम करून देखील त्याला आठ तासाचे वेतन देण्यात येते तसे न होता कामगार आला आठ तास काम करून वाढीव तासाचा देखील मोबदला भेटला पाहिजे तसेच शहरात आलेले नवे उद्योग व जुने व्यावसायिक व कामगार, कुशल कामगार, अतिकुशल कामगार, संघटित कामगार व असंघटित कामगार यांच्या हितासाठी सरकारी दरबारी काही गोष्टींची मागणी करणे शक्य होईल परंतु असे होत नसल्याकारणाने अनेक धनिक व्यवसायिक कामगारांवर अन्याय अत्याचार करत असून त्याविषयी कोणतीही तक्रार होत नाही व नोंदणीकृत व्यवसाय व उद्योग याची माहिती द्यावी तसेच नोंदणीकृत व्यवसाय व कामगार यांची नोंदणी त्वरित सुरू करावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे...
Comments
Post a Comment