नातवासाठी 85 वर्षाच्या आजीचे पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आत्मदहन करण्याचा प्रयत्न.
नातवासाठी 85 वर्षाच्या आजीचे पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आत्मदहन करण्याचा प्रयत्न.
कोरोनात निधन झालेल्या वडिलांच्या जागेवर नातवाला हजर करुन घेण्याची मागणी. शासनाकडून अहवाल प्राप्त असून, देखील हजर करून घेतले जात नसल्याचा आरोप.
अहमदनगर - पोलीस दलात कार्यरत असलेला मुलगा व सेवानिवृत्त सूनचे कोरोनामध्ये निधन झाले. मुलाच्या जागेवर लहान नातूला अनुकंपा तत्वावर हजर करून न घेता टाळाटाळ करत असून अनेक वेळा जिल्हा पोलीस अधीक्षक व शासनाकडे व महासंचालकाकडे विनंती अर्ज देऊनही कुठल्याही प्रकारची अद्यापही कारवाई करण्यात आली नसून आजी मुंबई येथील विधान भवन येथे 18 जुलैला आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. परंतु परवानगी नाकारल्याने आजी सुलोचना गणपत केदारे हे नातवासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आत्मदहन करणार असल्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदनाद्वारे कळवले होते. परंतु कुठल्याही प्रकारची अद्यापही कारवाई करण्यात आली नसून नगर पाथर्डी रोड भिंगार वाल्मिक नगर येथिल 85 वर्षाच्या आजी सुलोचना गणपत केदारे यांनी नातवाला पोलीस खात्यात समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालय समोर स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला असता पोलिसांनी धरले.
पोलीस दलात कार्यरत असलेले विठ्ठल केदारे व सेवानिवृत्त झालेल्या आईचे एप्रिल 2021 मध्ये कोरोना महामारीत निधन झाले. पोलीस अधीक्षक कार्यालयातील आस्थापना विभागातील कर्मचारी व हेड क्लार्क यांच्या सोबत मोठया नातवाच्या नोकरी संदर्भात झालेल्या वाद व सुनावणी झाल्यानंतर मोठ्या नातवाला केलेल्या पैशाची मागणी पूर्ण न केल्याने अनुकंपा तत्वावर हजर करून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप सुलोचना गणपत केदारे यांनी केला असून.
लहान नातू विक्रम विठ्ठल केदारे याचा विनंती अर्ज शासनास पाठविण्यात आलेला आहे. शासनाकडून अहवाल प्राप्त झालेला असून, सुद्धा पोलीस दलात त्याला हजर करून घेतले जात नाही. दोन्ही नातू बेरोजगार असल्यामुळे माझा वैद्यकिय खर्च व कुटुंब चालविण्यासाठी काहीही साधन उपलब्ध नसून, मुलगा व सून राहिले नसल्याने कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी लहान नातू विक्रम केदारे याला पोलीस सेवेत घेण्याची मागणी करण्यात आली......
Comments
Post a Comment