अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित 19 वर्षाखालील जिल्हा निवड स्पर्धा संपन्न
अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित 19 वर्षाखालील जिल्हा निवड स्पर्धा संपन्न.
बुद्धिबळ खेळामुळे आपले व्यक्तिमत्त्व बहरते - तहसीलदार हेमंत कुमार ढोकले.
अहमदनगर - अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित 19 वर्षाखालील जिल्हा निवड स्पर्धा नुकतीच जुना कापड बाजार येथील नागर महाजन वाडी येथे संपन्न झाली. याप्रसंगी श्रीगोंदा तालुक्याचे तहसीलदार हेमंत कुमार ढोकले उद्घाटन प्रसंगी बोलत होते. तर हेमंत कुमार ढोकले सुद्धा बुद्धिबळ खेळाडू असल्यामुळे त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित 19 वर्षाखालील जिल्हा निवड स्पर्धेचे उद्घाटन हेमंत कुमार ढोकले यांनी पटावर चाल देऊन केले. यावेळी सरकारी ऑडिटर उमेश देवकर, सर्कल ऑफिसर आंधळे, जायंट्स ग्रुपचे संजय गुगळे, अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट, सदस्य पारुनाथ ढोकळे, प्रशिक्षक प्रकाश गुजराथी, पंच रोहित आडकर, देवेंद्र ढोकळे, संजय खडके आदीसह पालक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सामने अतिशय रंगदार झाले ७ फेऱ्यांमध्ये विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यामधे ७ वर्षाखालील गटामध्ये प्रथम अन्वित गायकवाड चार गुण, दृतिय शर्विल भागूरकर चार गुण, तृतीय सुभाष कंकाळ अडीच गुण, चतुर्थ चिन्मय गोरे अडीच गुण, पाचवा आरव नागपुरे दोन गुण. तर १३ वर्षाखालील गटामध्ये प्रथम क्रमांक अद्वैत महाजन पाच गुण, दृतिय जुन्नम संकलेच्या पाच गुण, तृतीय ऋषिकेश राठोड पाच गुण
चतुर्थ दर्श पोरवाल पाच गुण, पाचवा ईशान चोरडिया पाच गुण तर स्पर्धेतील विजेते
मुले- प्रथम क्रमांक प्रणित कोठारी साडेसहा गुण, दृतिय आदेश देखणे सहा गुण, तृतीय शंतनू गावडे साडेपाच गुण, चतुर्थ श्रीराज इंगळे साडेपाच गुण, पाचवा स्वराज्य काळे साडेपाच गुण मिळून विजय झाले तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक वेदांती इंगळे पाच गुण, दृतिय इशिता जामगावकर साडेचार गुण, तृतीय स्वानंदी महाजन चार गुण, चतुर्थ योषना मंडलेच्या तीन गुण, पाचवा ग्रीष्मा मंडलेच्या एक गुण हे खेळाडू विजयी झाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे यांनी केले प्रस्ताविक शाम कांबळे यांनी केले व आभार प्रकाश गुजराथी यांनी मांडले........
Comments
Post a Comment