Posts

Showing posts from July, 2023

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे उस उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शक मेळावे

Image
    कोपरगाव -  सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील उस उत्पादक सभासद शेतक-यांचे प्रति एकरी उत्पादन वाढविण्यासाठी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी उस तज्ञ अरुण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ठिबक सिंचनाच्या महत्वासह मार्गदर्शक मेळाव्याचे ३१ जुलै व १ ऑगस्ट रोजी आयोजन केले असुन सभासद शेतक-यांनी यास मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन उपाध्यक्ष रमेश घोडेराव, सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी केले आहे.                कारखान्याच्या उस विकास विभागातील सर्व शेतकी कर्मचा-यांसाठी प्रशिक्षण ३१ जुलै रोजी दुपारी २ वाजता कारखाना कार्यस्थळावर प्रशिक्षण व १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता देर्डे को-हाळे, कुंभारी, वेळापूर व वाकद गटातील उस उत्पादक सभासद शेतक-यांसाठी मार्गदर्शन जय मातादी लॉन्स देर्डे येथे, तर दुपारी २ वाजता दहेगांव, करंजी, जेउरकुंभारी, ब्राम्हणगांव, वारी व येवला गट विभागातील उस उत्पादक सभासद शेतक-यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळ शिंगणापुर येथे उपस्थित राहुन

दारुल उलूम मदरसा मधील विद्यार्थ्यांचे आर.एम.टी. तायक्वांदो स्पर्धेत यश

Image
  दारुल उलूम मदरसा मधील विद्यार्थ्यांचे आर.एम.टी. तायक्वांदो स्पर्धेत यश सुवर्ण, रौप्य व कास्य पदकांची कमाई मोबाईलमध्ये अडकलेल्या मुलांना मैदानावर आणण्याची गरज -दिनकराव मुंडे अहमदनगर - केडगावमध्ये झालेल्या आर.एम.टी. तायक्वांदो चषक स्पर्धेत आलमगीर येथील दारुल उलूम मदरसा मधील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश संपादन केले. खेळाडूंनी विविध गटात सुवर्ण, रौप्य व कास्य पदकांची कमाई केली. या गुणवंत खेळाडूंचा दारुल उलूम मदरसा मध्ये भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे दिनकराव मुंडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देऊन सत्कार करण्यात आला. दारुल उलूम मदरसा मधील विद्यार्थ्यांना शोदान शोदान इंटरनॅशनल कराटे फेडरेशनच्या माध्यमातून फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रशिक्षक गौस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे व तायक्वांदोचे प्रशिक्षण दिले जात आहे. दीड महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण करुन खेळाडू या स्पर्धेत उतरले होते. यामध्ये हम्माद अन्सारी, अरशीद सय्यद, मुख्तार सय्यद, सुलतान शेख यांनी सुवर्ण पदक पटकाविले. तर सुफियान शेख, हमजा शेख यांनी रौप्य तर अयान सय्यद, समीर शेख, खालिद शेख यांनी कास्य पदक पटकाविले. तसेच या स्पर्धेत अया

निमगाव वाघातील ग्रामस्थांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका

Image
  निमगाव वाघातील ग्रामस्थांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका पी.आर.एम. सॉफ्टवेअर सोल्युशनचा सामाजिक उपक्रम राजेंद्र शिंदे यांना युवा उद्योजक तर शालन शिंदे यांना आदर्श माता पुरस्कार जाहीर अहमदनगर - निमगाव वाघा (ता. नगर) येथे ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने व तातडीने उपचार मिळण्याच्या हेतूने पी.आर.एम. सॉफ्टवेअर सोल्युशन कंपनीच्या माध्यमातून उद्योजक राजेंद्र काशिनाथ शिंदे यांनी गावासाठी रुग्णवाहिका दिली. या रुग्णवाहिकेचे पूजन भानुदास ठोकळ यांच्या हस्ते झाले. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, डॉ. विजय जाधव, पै. अनिल डोंगरे, सोसायटीचे संचालक अजय ठाणगे, जालिंदर आतकर, संजय डोंगरे, पिंटू जाधव, मीरा पुंड, आकाश पुंड, श्रीरंग आतकर, राजू हारदे, विजय जाधव, पै. संदीप डोंगरे, भरत बोडखे, सागर शिंदे, मारुती निकम, अनिता शिंदे, भास्कर फलके, लक्ष्मण चौरे आदींसह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पै. नाना डोंगरे म्हणाले की, गावात असलेल्या रुग्णवाहिकेमुळे ग्रामस्थांना तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. आजारी व्यक्ती, अपघात प्रसंगी व गरोदर महिलांना जलदगतीने

हर दिन मॉर्निंग ग्रुपचे वृक्षारोपणाने जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा

Image
  हर दिन मॉर्निंग ग्रुपचे वृक्षारोपणाने जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा स्थिर निरोगी वातावरणासाठी निसर्ग संवर्धन मानवी समाजाचा पाया -संजय सपकाळ अहमदनगर - हर दिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने जागतिक निसर्ग संवर्धन दिन वृक्षारोपण अभियानाने साजरा करण्यात आला. भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध प्रकारचे झाडे लावून निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सचिन कस्तुरे, मेजर दिलीप ठोकळ, रमेशराव वराडे, दिलीप गुगळे, विकास भिंगारदिवे, सर्वेश सपकाळ, दीपक बडदे, सरदारसिंग परदेशी, नामदेवराव जावळे, अभिजीत सपकाळ, बाबासाहेब बेरड, सुमेश केदारे, रामनाथ गर्जे, सिताराम परदेशी, विठ्ठल राहिंज, दिनेश शहापूरकर, किशोर भगवाने, शरद धाडगे, अशोकराव भगवाने, विकास निमसे, विलास तोतरे, विश्‍वास वाघस्कर, राजू शेख, सुरेश कानडे, सौरभ रासने, गणेश माळगे, भाऊसाहेब कराळे, किरण फुलारी, योगेश चौधरी, अनंत सदलापूर, विशाल भामरे, संजय वाकचौरे, संतोष लुनिया, रमेश कोठारी आदी उपस्थित होते.  संजय सपकाळ म्हणाले की, मानवाने आपल्या सुख सोयीस

शहरात उद्योग व्यवसाय झपाट्याने वाढत असल्याने कामगारांची नोंदणी करण्याची मागणी

Image
राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने कामगार आयुक्त यांना निवेदन.       शहरात उद्योग व्यवसाय झपाट्याने वाढत असल्याने कामगारांची नोंदणी करण्याची मागणी- गजानन भांडवलकर.     अहमदनगर - अहमदनगर शहर झपाट्याने विकसित होत असून शहरांमध्ये नवे नवे उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणात येत असून आलेले उद्योग व्यवसायामध्ये कामगार हे भूमिपुत्र नसून परप्रांतीय मोठ्या संख्येने आलेले आहे. तरी कामगार आयुक्त कार्यालय मार्फत आलेला नवा उद्योग व्यवसाय व कामगार या सर्वांची नोंदणी असणे गरजेचे असून नोंदणी करण्याच्या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवळे यांना निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचे जिल्हा अध्यक्ष गजानन भांडवलकर, उपाध्यक्ष अक्षय भिंगारदिवे, नितीन लिगडे पाटील, निलेश बांगरे, वैभव म्हस्के, विशाल म्हस्के, वैभव शेवाळे, पवन कुमटकर, शेखर पंचमुख, अशोक जगताप, हेमराज भालसिंग, सुरज जपे, यश लिगडे, साईराज शेळके, ओंकार गोडाळकर, सचिन गायकवाड आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.  पुढे निवेदनात म्हटले आहे की अहमदनगर शहरांमध्ये नव्याने आलेले उद्योग व्यवसाय व कामगार यांची नो

नातवासाठी 85 वर्षाच्या आजीचे पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आत्मदहन करण्याचा प्रयत्न.

Image
  नातवासाठी 85 वर्षाच्या आजीचे पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आत्मदहन करण्याचा प्रयत्न.                                                  कोरोनात निधन झालेल्या वडिलांच्या जागेवर नातवाला हजर करुन घेण्याची मागणी. शासनाकडून अहवाल प्राप्त असून, देखील हजर करून घेतले जात नसल्याचा आरोप.   अहमदनगर - पोलीस दलात कार्यरत असलेला मुलगा व सेवानिवृत्त सूनचे कोरोनामध्ये निधन झाले. मुलाच्या जागेवर लहान नातूला अनुकंपा तत्वावर हजर करून न घेता टाळाटाळ करत असून अनेक वेळा जिल्हा पोलीस अधीक्षक व शासनाकडे व महासंचालकाकडे विनंती अर्ज देऊनही कुठल्याही प्रकारची अद्यापही कारवाई करण्यात आली नसून आजी मुंबई येथील विधान भवन येथे 18 जुलैला आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. परंतु परवानगी नाकारल्याने आजी सुलोचना गणपत केदारे हे नातवासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आत्मदहन करणार असल्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदनाद्वारे कळवले होते. परंतु कुठल्याही प्रकारची अद्यापही कारवाई करण्यात आली नसून नगर पाथर्डी रोड भिंगार वाल्मिक नगर येथिल 85 वर्षाच्या आजी सुलोचना गणपत केदारे यांनी नातवाला पोलीस खात्यात समाविष्ट क

लालटाकी येथे भाविकांसाठी मोहरमनिमित्त भंडारा

Image
  लालटाकी येथे भाविकांसाठी मोहरमनिमित्त भंडारा अहमदनगर - लालटाकी येथील हजरत जलालशाह बुखारी दर्गा येथे मोहरम निमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. मोहंमद जाफर शेख यांच्या हस्ते भंडाऱ्याचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी जाकिर शेख, इरफान शेख, शेख, अरमान शेख, मुस्ताक शेख, नूर शेख, नंदू आदी उपस्थित होते.

विविध किसान संघटनांची मुंबईत बैठक

Image
  महाराष्ट्रात संयुक्त किसान मोर्चा ज्वलंत शेतकरी प्रश्‍नांवर प्रभावी संयुक्त संघर्ष उभारणार -कॉ. बन्सी सातपुते  विविध किसान संघटनांची मुंबईत बैठक 11 प्रमुख संघटनांची महाराष्ट्र स्तरावरील समन्वय समितीची निवड अहमदनगर - महाराष्ट्रात संयुक्त किसान मोर्चा स्थापन करण्यासाठी विविध किसान संघटनांची मुंबईत शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्‍नावर संयुक्त संघर्ष उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. बन्सी सातपुते यांनी दिली. अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे अध्यक्षस्थानी असलेल्या या बैठकीत शेतकरी सभेचे आमदार जयंत पाटील, प्रा. एस. व्ही. जाधव, ॲड. राजेंद्र कोरडे, बोऱ्हाडे पाटील, अखिल भारतीय किसान सभेचे उमेश देशमुख, डॉ. उदय नारकर, किसन गुजर, डॉ. भाऊसाहेब झिरपे, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राजन क्षीरसागर, ॲड. बन्सी सातपुते, अशोक सोनारकर, लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, सर्वहारा जन आंदोलनाच्या उल्का महाजन, जन आंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाचे युवराज गटकळ, सत्यशोधक शेतकरी सभेचे किशोर ढमाले, महाराष्ट्र

रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग यूथ क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

Image
  रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग यूथ क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात नगरच्या शिलू मकर अध्यक्षपदी तर मुंबईच्या आरती कथारिया-म्हात्रे सचिवपदी कार्यक्रमात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय रोटरीच्या पदाधिकाऱ्यांचा ऑनलाईन सहभाग अहमदनगर - युवक-युवतींच्या विविध प्रश्‍नांवर कार्य करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग यूथचा दुसऱ्या वर्षीचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. नगरच्या शिलू मकर यांनी अध्यक्षपदाची तर मुंबईच्या आरती कथारिया-म्हात्रे यांनी सचिवपदाची सूत्रे स्विकारली. या कार्यक्रमात राज्य व परदेशातील सदस्य ऑनलाईन पध्दतीने सहभागी झाले होते. रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 अंतर्गत हा क्लब युवकांच्या विविध प्रश्‍नांवर कार्य करणार आहे. या पदग्रहण सोहळ्यासाठी रोटरीचे जिल्हा 3132 चे उपप्रांतपाल क्षितीज झावरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. क्लबच्या मावळत्या अध्यक्षा नंदिनी जग्गी यांनी शिलू मकर यांच्याकडे तर मावळत्या सचिव सविता चढ्ढा यांनी आरती म्हात्रे यांच्याकडे आपल्या पदाची सूत्रे सोपवली. नूतन अध्यक्षा शिलू मकर यांनी नवीन वर्षात रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग यूथ क्लबच्या माध्यमातू

आधुनिक लहूजी शक्ती सेनेच्या मातंग समाज संपर्क दौरा अभियानाची शहरात बैठक

Image
  समाजाचे नेतृत्व करणारे राजकीय पुढाऱ्यांच्या दावणीला बांधले गेल्याने मातंग समाजाची ससेहोलपट -नगिनाताई कांबळे आधुनिक लहूजी शक्ती सेनेच्या मातंग समाज संपर्क दौरा अभियानाची शहरात बैठक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून विविध प्रश्‍नांवर चर्चा अहमदनगर - मातंग समाजात श्रेय घेण्याच्या नादात समाजातील प्रश्‍न सुटले नाही. समाजाचे नेतृत्व करणारे काही नेते राजकीय पुढाऱ्यांच्या दावणीला बांधले गेल्याने मातंग समाजाची ससेहोलपट सुरु आहे. भावी पिढीच्या कल्याणासाठी व न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी संघर्ष करुन समाजाला जागृत करावे लागणार असल्याची भावना आधुनिक लहूजी शक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा नगिनाताई कांबळे यांनी व्यक्त केली. मातंग समाजाच्या न्याय हक्कांसाठी आधुनिक लहूजी शक्ती सेनेच्या वतीने राज्यभर सुरु असलेला मातंग समाज संपर्क दौरा अभियानानिमित्त कांबळे नगरमध्ये आले असता, जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीसाठी राज्य प्रवक्ते लक्ष्मण क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, आढळगावचे सरपंच पै.बंटी उबाळे, नागवडे दूध संघाचे संचालक विनायक सस

लंगर सेवेच्या अन्न छत्रालयास अन्नधान्य व किराणाची मदत

Image
  श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने लंगर सेवेच्या अन्न छत्रालयास अन्नधान्य व किराणाची मदत गरजूंना फुड पॅकेटसह फळांचे वाटप अहमदनगर - श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून गरजू घटकांना जेवण पुरविणाऱ्या घर घर लंगर सेवेच्या तारकपूर येथील अन्न छत्रालयास अन्नधान्य व किराणाची मदत देऊन गरजूंना जेवणाच्या पाकिटासह फळांचे वाटप करण्यात आले. वासन उद्योग समुहाचे स्व. कुंदनलालजी वासन यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी लंगर सेवेचे जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, प्रितपालसिंह धुप्पड, गुलशन कंत्रोड, सतीश गंभीर, डॉ. संजय असनानी, अनिश आहुजा, मनोज मदान, जतीन आहुजा, दलजीतसिंग वधवा, राजू जग्गी, सोमनाथ चिंतामणी आदींसह सेवादार उपस्थित होते. जनक आहुजा म्हणाले की, जीवनात समाधानासाठी व्यवसायाला समाजसेवेची जोड असावी. वासन परिवार सामाजिक बांधिलकी व सचोटीने आपला व्यवसाय करत आहे. व्यवसायाबरोबर समाजातील गरजूंना त्यांनी नेहमीच मदतीचा हात दिला असून, ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. नाशिक येथे ट्रस्टच्

डॉन बॉस्को सोसायटीचा सामाजिक न्याय भवनावर जन आक्रोश मूक मोर्चा

Image
  डॉन बॉस्को सोसायटीचा सामाजिक न्याय भवनावर जन आक्रोश मूक मोर्चा मणिपूर हिंसाचार व महिलांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध देशात स्त्रियांवर होणारे अत्याचार त्वरित थांबण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी अहमदनगर - मणिपूर राज्यातील हिंसाचार व तीन महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यांच्यावर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ डॉन बॉस्को अहमदनगर सोसायटीच्या वतीने गुरुवारी (दि.27 जुलै) सावेडी येथील सामाजिक न्याय भवनावर जन आक्रोश मूक मोर्चा काढण्यात आला. सावेडी येथील डॉन बॉस्को शैक्षणिक संकुल येथून मोर्चाला प्रारंभ झाले. यामध्ये शैक्षणिक संकुलातील पालक, परिसरातील नागरिक, सर्व धर्मीय बांधव, महिला व युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. महिलांवरील अत्याचार थांबवा, मुलींना जगू द्या, मणिपूर मध्ये झालेला हिंसाचार व बलात्काराचा निषेध नोंदविणारी फलक हातात घेऊन हा मोर्चा निघाला होता. सर्वांनी तोंडाला काळ्या मुखपट्टया लावल्या होत्या. तर महिला व युवतींनी काळा पोशाख परिधान करुन आपला निषेध व्यक्त केला. नगर-मनमाड मार्गे हा जन आक्रोश मूक मोर्चा सामाजिक न्याय भवनावर धडकला. यावेळी फादर रिचर्ड डिसिल्वा

श्री सागर कलगुंडे यांची डाक विभाग पावरलिफ्टिंग संघात राष्ट्रीय पातळीवर निवड...

Image
  श्री सागर कलगुंडे यांची डाक विभाग पॉवरलिफ्टिंग संघात राष्ट्रीय पातळीवर निवड ही निश्चितच अभिमानास्पद: श्री सुरेश बन्सोडे   राज्यस्तरीय निवड चाचणी मुंबई येथे संपन्न श्री सागर कलगुंडे यांचा विशेष गौरव करताना श्री सुरेश बन्सोडे प्रवर अधिक्षक डाकघर अहमदनगर समवेत श्री संतोष यादव,बाळासाहेब बनकर ,संदिप कोकाटे आदी अहमदनगर: अहमदनगर डाक विभागातील आनंदीबा जार पोस्टऑफिसमध्ये डाक सहायक म्हणून कार्यरत असणारे श्री सागर गोरख कलगुंडे यांची नुकतीच परेल मुंबई येथे संपन्न झालेले राज्य निवड स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर निवड झाली. डाक विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचारी,अधिकारी यांचे करीता पॉवरलिफ्टिंग,वेटलिफ्टिंग बॉडी बिल्डरची  2023_2024 साठी   राज्य निवड चाचणी परेल येथील ओंकार फिटनेस क्लब येथे संपन्न झाली. राज्यभरातील 48 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता,  अहमदनगर डाक विभागातील श्री सागर कलगुंडे, कमलेश मिरगणे, संदीप कोकाटे,तान्हाजी सूर्यवंशी यांनी स्पर्धेत सहभाग घेतला, त्यामध्ये पॉवरलिफ्टिंग मध्ये श्री सागर कलगुंडे यांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली. राष्ट्रीय पातळीवर निवड होणारे अहमदनगर विभागातील श्री सागर कलग

हुतात्मा स्मारकात कारगिल विजय दिवस साजरा

Image
  हुतात्मा स्मारकात कारगिल विजय दिवस साजरा मेणबत्त्या प्रज्वलीत करुन व पुष्पचक्र अर्पण करुन शहिदांना अभिवादन भारत माता की जय..., शहीद जवान अमर रहे!... च्या घोषणांनी परिसर दणाणला अहमदनगर - देशभक्तीच्या गीतांनी प्रफुल्लीत झालेल्या वातवरणात शहरातील हुतात्मा स्मारकात बुधवारी (दि.26 जुलै) कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. भारत माता की जय..., वंदे मातरम..., शहीद जवान अमर रहे!... च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणला. लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, लिओ क्लब ऑफ अहमदनगर, मराठी पत्रकार परिषद, रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळा व गुरु अर्जुन देव सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आर्मड कॉर्प्स सेंटर ॲण्ड स्कूलच्या शिक्षणाधिकारी मेजर विदूशी पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या कार्यक्रमासाठी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूर शेख, सुभेदार रमेश बेल्हेकर, लायन्स क्लबचे अध्यक्ष धनंजय भंडारे, सचिव दिलीप कुलकर्णी, खजिनदार नितीन मुनोत, लिओच्या अध्यक्षा आंचल कंत्रोड, जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, आनंद बोरा, डॉ. अमित बडवे, हरमनकौर वधवा, प

जय हिंद फाऊंडेशनने केला कारगिल विजय दिवस वृक्षरोपणाने साजरा

Image
  जय हिंद फाऊंडेशनने केला कारगिल विजय दिवस वृक्षरोपणाने साजरा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय परिसरात 211 झाडांची लागवड देश रक्षणासह पर्यावरण रक्षणाच्या कर्तव्यासाठी माजी सैनिकांचा पुढाकार प्रेरणादायी -सुहास मापारी अहमदनगर - माजी सैनिकांच्या जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने कारगिल विजय दिवस वृक्षरोपणाने साजरा करण्यात आला. माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या आवारात 211 झाडांची लागवड केली. अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे, सैनिक फेडरेशनच्या अध्यक्षा अर्चना नागरे व कोल्हारचे ग्रामपंचायत सदस्य संदीप पालवे यांच्या हस्ते वृक्षरोपणाने या अभियानाचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, सामाजिक कार्यकर्ते निळकंठ उल्हारे, संजय पाटेकर, संतोष शिंदे, भाऊसाहेब देशमाने, बाबासाहेब घुले, सैनिक समाज पार्टीचे ॲड. शिवाजी डमाळे, ॲड. राजेंद्र सोमवंशी, पोपट गिते, सुनिल गुंजाळ, भाऊसाहेब पालवे, अमोल वारे, त्रिदल संघटनेचे अशोक चौधरी, भाऊसाहेब पालवे, संदिप घुले, नवनाथ वारे, एकनाथ माने, आव्हाड मेजर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चित्रसेन

बेलापूर ते पढेगाव रेल्वेच्या सातव्या टप्प्याची चाचणी यशस्वी

Image
  अहमदनगर - नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत बेलापूर ते पढेगाव या 13 कि.मी. अंतराची चाचणी शनिवारी घेण्यात आली. लवकरच नगर ते मनमाड पर्यंतचे हे काम पूर्ण होणार असून, यामुळे नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे. या संपूर्ण मार्गात इलेक्ट्रीक इंजनचा वापर होत आहे. गेल्या तीन वर्षापासुन नगर ते मनमाड द्रुतगती (डबललाईन) रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. या पूर्वी कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई, अंकाई ते अंकाई किल्ला, अंकाई किल्ला ते मनमाड, कोपरगाव ते कान्हेगाव, बेलापूर ते पुणतांबा या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. शनिवारी (दि.22 जुलै) 13  कि.मी. डबल लाईन रेल्वे मार्गाची चाचणी घेण्यात आली. आता एकूण 94 कि.मी. अंतराची चाचणी पूर्ण घेतल्याची माहिती उप मुख्य अभियंता (बांधकाम) दीपक कुमार यांनी दिली. मनमाड ते दौंड रेल्वे मार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्त्वपूर्ण टप्पा येतो. मात्र हा मार्ग सिंगल लाईन असल्यामुळे रेल्वेगाडीचा वेग कमी होता. तसेच सिंगललाईनमुळे अनेकदा रेल्वेगाड्यांना थांबा घ्यावा लागत होता. तासनतास रेल्वे गाडी एकाच जाग्यावर थांबून ठेवावी लागत होती. मात्र आता हा सं

मनसेचे नेते अमित ठाकरे यांचे शहरात नितीन भुतारे यांनी केले स्वागत.

Image
  मनसेचे नेते अमित ठाकरे यांचे शहरात नितीन भुतारे यांनी केले स्वागत. अहमदनगर - शहरात  महाराष्ट्र निर्माण सेनेचे नेते व विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे अहमदनगर शहरात येणार असून मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मनसेचे पदाधिकारी नितीन भुतारे यांना डावळून नगर शहरांमध्ये सर्वत्र ठिकाणी होर्डिंग फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले या कारणावरून मनसेमध्ये दोन गट निर्माण झाले असल्याची भावना शहरातील नागरिकांना जाणवले त्यामुळे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे शहरात आले असता त्यांचा स्वागत महाराष्ट्र निर्माण सेनेचे नितीन भुतारे यांनी केले यावेळी कर्जत तालुका अध्यक्ष सचिन सटाले, पारनेर तालुका अध्यक्ष संतोष जिरेसाळ, परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे, पारनेर तालुका अध्यक्ष बाळासाहेब माळी, उपजिल्हाध्यक्ष मारुती रोहोकळे, माथाडी जिल्हा अध्यक्ष अविनाश पवार, रवि रासकर, वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष दिलीप भालसिंग, अनिकेत जाधव, गणेश शिंदे, गणेश मराठे, रतन गाडळकर, आबासाहेब उघडे, श्रीराम शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.....     

अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित 19 वर्षाखालील जिल्हा निवड स्पर्धा संपन्न

Image
  अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित 19 वर्षाखालील जिल्हा निवड स्पर्धा संपन्न.                                                       बुद्धिबळ खेळामुळे आपले व्यक्तिमत्त्व बहरते -  तहसीलदार  हेमंत कुमार ढोकले.     अहमदनगर -  अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित 19 वर्षाखालील जिल्हा निवड स्पर्धा नुकतीच जुना कापड बाजार येथील नागर महाजन वाडी येथे संपन्न झाली. याप्रसंगी श्रीगोंदा तालुक्याचे तहसीलदार हेमंत कुमार ढोकले उद्घाटन प्रसंगी बोलत होते. तर हेमंत कुमार ढोकले सुद्धा बुद्धिबळ खेळाडू असल्यामुळे त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित 19 वर्षाखालील जिल्हा निवड स्पर्धेचे उद्घाटन हेमंत कुमार ढोकले यांनी पटावर चाल देऊन केले. यावेळी सरकारी ऑडिटर उमेश देवकर, सर्कल ऑफिसर आंधळे, जायंट्स ग्रुपचे संजय गुगळे, अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव  यशवंत बापट, सदस्य पारुनाथ ढोकळे, प्रशिक्षक प्रकाश गुजराथी, पंच रोहित आडकर,  देवेंद्र ढोकळे, संजय खडके आदीसह पालक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.           यावेळी सामने अतिशय रंगदार झाले ७ फेऱ्यांमध्ये वि

बेरोजगार युवकांना उद्योग व व्यवसाय क्षेत्रात करिअर घडविण्याच्या उद्देशाने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

Image
  बेरोजगार युवकांना उद्योग व व्यवसाय क्षेत्रात करिअर घडविण्याच्या उद्देशाने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन...  युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन...  ई टेंडरिंग, जेम पोर्टल, ई सेवा, पशुसंवर्धन व डिजिटल मार्केटिंगचे दिले जाणार प्रशिक्षण अहमदनगर - सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी उद्योग व व्यवसाय क्षेत्रात करिअर घडविण्याच्या उद्देशाने शार्प बिजनेस कन्सल्टन्सी ॲण्ड एम.एस.एम.ई. ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.  एमआयडीसी येथील आयटी पार्क, सारस्वत बँक शेजारी होणाऱ्या या प्रशिक्षणार्थींना उद्योग गुरु रविराज भालेराव मार्गदर्शन करणार आहे. या प्रशिक्षण वर्गात ई टेंडरिंग, जेम पोर्टल प्रशिक्षण, ई सेवा ट्रेनिंग, ग्रामीण भागातील मुलांसाठी पशुसंवर्धन आधारित ऑनलाईन शेळी, कुक्कट आणि गाय, म्हैस पालन प्रशिक्षण व डिजिटल मार्केटिंग प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ई-निविदा प्रक्रिया ओळख,  ई-निविदा प्रक्रिया पद्धती, शासनाचे  ई-टेंडरिंगचे मार्गदर्शक तत्त्वे, डिजिटल स्वाक्षरी म्हणजे काय, डिजिटल स्वाक्षरीसाठी अर्ज कसा करायचा, पीएसयू, सीपीएसयू आणि सरकारच्या आवश

आधुनिक लहूजी शक्ती सेनेच्या मातंग समाज संपर्क दौरा अभियानाची शहरात बैठक

Image
  समाजाचे नेतृत्व करणारे राजकीय पुढाऱ्यांच्या दावणीला बांधले गेल्याने मातंग समाजाची ससेहोलपट -नगिनाताई कांबळे आधुनिक लहूजी शक्ती सेनेच्या मातंग समाज संपर्क दौरा अभियानाची शहरात बैठक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून विविध प्रश्‍नांवर चर्चा अहमदनगर - मातंग समाजात श्रेय घेण्याच्या नादात समाजातील प्रश्‍न सुटले नाही. समाजाचे नेतृत्व करणारे काही नेते राजकीय पुढाऱ्यांच्या दावणीला बांधले गेल्याने मातंग समाजाची ससेहोलपट सुरु आहे. भावी पिढीच्या कल्याणासाठी व न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी संघर्ष करुन समाजाला जागृत करावे लागणार असल्याची भावना आधुनिक लहूजी शक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा नगिनाताई कांबळे यांनी व्यक्त केली. मातंग समाजाच्या न्याय हक्कांसाठी आधुनिक लहूजी शक्ती सेनेच्या वतीने राज्यभर सुरु असलेला मातंग समाज संपर्क दौरा अभियानानिमित्त कांबळे नगरमध्ये आले असता, जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीसाठी राज्य प्रवक्ते लक्ष्मण क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, आढळगावचे सरपंच पै.बंटी उबाळे, नागवडे दूध संघाचे संचालक विनायक सस

निमगाव वाघातील विद्यालयात वृक्षरोपण करुन स्वच्छता अभियान

Image
  शिक्षण संचालनालयच्या प्रोजेक्ट लेट्स चेंज- स्वच्छता मॉनिटर उपक्रमांतर्गत निमगाव वाघातील विद्यालयात वृक्षरोपण करुन स्वच्छता अभियान प्लास्टिक मुक्तीचा संदेश देऊन विद्यार्थ्यांनी घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ अहमदनगर - महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयच्या वतीने सुरु असलेल्या प्रोजेक्ट लेट्स चेंज- स्वच्छता मॉनिटर 2023  उपक्रमांतर्गत निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयात स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या सहकार्याने वृक्षरोपण करुन स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तर पर्यावरणाला घातक ठरत असलेल्या प्लास्टिक मुक्तीचा संदेश देऊन विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली.  विद्यालयाच्या प्रांगणात माजी सरपंच साहेबराव बोडखे व माजी मुख्याध्यापक किसन वाबळे यांच्या हस्ते वृक्षरोपण मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्र. मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, निळकंठ वाघमारे, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, तेजस केदारे, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, अमोल वाबळे, भा

जय हिंद फाऊंडेशनच्या वृक्षारोपण अभियानाला प्रारंभ

Image
  जय हिंद फाऊंडेशनच्या वृक्षारोपण अभियानाला प्रारंभ...  उजाड डोंगररांगा व माळरान हिरावाईने फुलविण्यासाठी सातत्याने होत आहे वृक्षरोपण व संवर्धन...  माजी सैनिकांचा देश सेवेनंतर वृक्ष सेवेचा ध्यास मानवतेच्या कल्याणासाठी -पुरुषोत्तम आठरे अहमदनगर - जिल्ह्यातील उजाड डोंगररांगा व माळरान हिरावाईने फुलविण्याच्या उद्देशाने मागील काही वर्षापासून सातत्याने वृक्षरोपण करुन त्याचे संवर्धन करणाऱ्या जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण अभियानाला प्रारंभ करण्यात आले. दरवर्षी पावसाळा सुरु झाल्यावर फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध ठिकाणी वृक्षारोपण अभियान राबविण्यात येते, त्याचा प्रारंभ शिरापूर करडवाडी (ता. पाथर्डी) येथून करण्यात आला.   शिरापूर करडवाडी येथील श्रीकृष्ण गोशाळेच्या आवारात 51 वडाच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी श्रीकृष्ण गोशाळेचे ह.भ.प. दिपक काळे महाराज, जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम आठरे, पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, उद्योजक धीरज मैड, जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, गणेश बुधवंत, अमोल लवांडे आदी उपस्थित होते. पुरुषोत्तम आठरे म्हणाले की, जिल्ह्यात जय हिंदने वृक्षरो