बाप नावाचं वादळ काव्यसंग्रहाचे चांदेकसारे येथे प्रकाशन


कोपरगांव : -

तालुक्यातील चांदेकसारे येथील स्व. एकनाथ सोनाजी खरात यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमीत्त बाप नावाचं वादळ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे, जळगांवचे उपायुक्त दिलीपराव झाल्टे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्रवरा ग्रामिण मेडीकल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे होते.
          प्रारंभी डॉ. धर्माजी खरात यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. या कार्यक्रमांस भंते धम्म शरण, जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, ऐश्वर्याताई सातभाई, शिवाजीराव ढवळे, डॉ गायकवाड, सरपंच संजय गुरसळ, बाळासाहेब देवकर, कल्याणराव होन, प्रकाशक अरूण घायवटकर, श्रीमती बबुताई खरात, रणजीत खरात, संजय खरात, संगिता सोनवणे, उज्वला कांबळे, विविध क्षेत्रातील कवी, खरात परिवार व पंचक्रोशीतील सर्व सहकारी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी महाकवी संमेलनही पार पडले.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा