नॅशनल पोस्टल सोसायटीची अल्पावधीत स्वभाडवलाकडे वाटचाल : संतोष यादव

नॅशनल पोस्टल सोसायटीच्या वार्षिक सभेत गुणवंत पाल्याचा सत्कार प्रसंगी  श्री नामदेव डेंगळे, संतोष यादव,रामभाऊ लांडगे,संदीप हदगल,अमित देशमुख, श्री संदीप कोकाटे.

●कर्जावरील व्याजदरात कपात

●गुणवंत पाल्याचा गौरव


अहमदनगर: अहमदनगर डिस्ट्रिक्ट नॅशनल पोस्टल सोसायटीचे स्थापना 2016 मध्ये झाली असून अल्पावधीतच ही संस्था स्वभाडवलाकडे वाटचाल करत असून, आजवर संस्था ही आपल्या उपलब्ध निधीमधून कमीत कमी व्याजदरात आपल्या सभासदांना कर्ज उपलब्ध  करत असून, सातत्याने सभासद हितास प्राधान्य देत आहे त्यामुळेच या संस्थेची ओळख स्वभाडवली संस्था म्हणून होत आहे असे गौरवोदगार  संस्थेचे जेष्ठ सभासद व पोस्टल संघटनेचे राज्यउपाध्यक्ष संतोष यादव यांनी व्यक्त केले.

अहमदनगर डिस्ट्रिक्ट नॅशनल पोस्टल को ऑप क्रेडिट सोसायटीची सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा  राज पॅलेस कॉन्फरन्स हॉल याठिकाणी संस्थेचे व्हा चेअरमन  श्री नामदेव डेंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. संस्थेचे कार्यकारी संचालक श्री सचिन गायकवाड यांनी सभेची नोटीस व आर्थिक पत्रके सभागृहापुढे ठेवली,उपस्थित सभासदाने सर्व विषय सर्वानुमते मंजूर केले.

संस्थेचे जेष्ठ सभासद श्री संतोष यादव  यांनी  संस्थेच्या आर्थिकपत्रका विषयी सविस्तरपणे मार्गदर्शन करत, संस्था नवीन असताना ही व संस्थेकडे आज  अखेर कॅश क्रेडिट नसतानाही संस्था उपलब्ध निधीमधून आपल्या सभासदास अधिकाधिक कर्ज,अत्यंत अल्पव्याजदरात उपलब्ध करून देत असून सातत्याने सभासदहित हिच बाब समोर ठेवत हे संचालक मंडळ काम करत आहे.आजच्या सभेत  संचालक मंडळाने कर्ज व्याजदरामध्ये अर्धा टक्का व्याज कपात करण्याची घोषणा केली असून अहमदनगर पोस्टल विभागात सर्वात कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणारी संस्था म्हणून एक आदर्श संस्था म्हणून आपला नावलौकिक निर्माण केला आहे हे संस्थेच्या दृष्टीने अत्यंत गौरवशाली बाब आहे. यापुढे हे संचालक मंडळ असेच कामकाज करेल अशी अपेक्षा त्यानी यानिमित्ताने व्यक्त करत संचालक मंडळास  शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी श्री  रामभाऊ लांडगे,श्री एकनाथ ताकपेरे,कमलेश मिरगणे,गणेश धनक,श्री अमित देशमुख उपविभागीय डाक निरीक्षक कर्जत श्री संदिप हदगल सहायक अधिक्षक डाकघर पश्चिम उपविभाग  अहमदनगर  यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले. 

संस्थेचे चेअरमन श्री नामदेव डेंगळे,संघटनेचे नेते संतोष यादव ,अमित देशमुख, संदिप हदगल,रामभाऊ लांडगे यांचे हस्ते  सभासदाच्या गुणवंत पाल्याचा सत्कार करण्यात आला.

त्यानंतर संस्थेचे व्हा चेअरमन श्री नामदेव डेंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना,संस्थेचा कर्जावरील व्याजदरात अर्धा टक्के कपात करण्याचा निर्णय त्याचबरोबर  संस्थेच्या भागभांडवल मध्ये वाढ करणेकरिता मासिक वर्गणी मध्ये पाचशे रु वाढ करून ती  प्रतिमाह दोन हजार रु करावी अशी विनंती केली सर्व सभासदांनी त्यास मंजुरी दिली या दोन्हीही निर्णयाची अंमलबजावणी दि एक जुलै 2022 पासून मासिक वर्गणी ही दोन हजार प्रतिमाह व कर्जावरील व्याजदर हा आठ टक्के असेल असे जाहीर जाहीर केले सर्व सभासदाने या निर्णयाचे टाळ्यांचा गजरात स्वागत केले.

यावेळी  कार्यकारी  संचालक श्री सचिन गायकवाड, संचालक  राधाकिसन मोटे, रावसाहेब चौधरी,प्रकाश कदम ,प्रदिप सूर्यवंशी संजय बोदर्डे  यांचेसह संदिप कोकाटे, अरुण रोकडे, व्यवस्थापक श्री लक्ष्मीकांत दंडवते, सभासद श्री अभिमनुकुमार,नितीन थोरवे,दिपक नागपुरे,दिपक कुंभारे,अजित रायकवाड , सुनिल थोरात,विजय दरदले,निलिमा कुलकर्णी, वासंती नगरकर,आश्विनी चिंतामणी, अर्चना भुजबळ सविता ताकपेरे,मोनाली हिंगे,आरती भालेराव, प्रियांका भोपळे, वंदना नगरकर,धनंजय दैठणकर, सागर पंचारिया,प्रितम वराडे,अशोक बंडगर,आसिफ शेख,भाऊसाहेब जाधव, यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदिप सूर्यवंशी  सूत्रसंचालन श्री  कमलेश मिरगणे तर आभार बापु तांबे यांनी केले.


दि 1 जुलै पासून 8% सर्वसाधारण कर्जावरील व्याजदर

भागभांडवल वाढ करणेकरिता मासिक वर्गणी 2000 रू

अवघ्या सात आर्थिक वर्षात स्वभाडवलाकडे वाटचाल

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा