सोमवार ६ जुन रोजी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता

कोपरगांव :-

      सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या ५९ व्या गळीत हंगामाची सांगता सोमवार ६ जुन रोजी दुपारी ४ वाजता संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत, संचालक प्रदिपराव नवले व सौ. प्रतिभाताई प्रदिपराव नवले या उभयतांच्या हस्ते सत्यनारायण महापूजेने केन सप्लाय कार्यालयात होत असुन यावेळी ट्रायइथाईल ऑर्थोफॉर्मेट व इथॉक्सी मिथाईल मॅलोनिक ईस्टर या रासायनिक उपपदार्थ पायलट प्लॅन्टचे उदघाटन कारखाना कार्यस्थळावरील जुन्या अॅसिटीक अॅसिड प्रकल्पाजवळ कारखान्यांचे संचालक व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या  कोल्हे व सौ. रेणुकाताई विवेकभैय्या  कोल्हे या उभयतांच्या हस्ते होत आहे. तरी सर्व सभासद, शेतकरी बांधव, संजीवनी उद्योग समुहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी या दोन्ही कार्यक्रमांस उपस्थित रहावे असे आवाहन उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"