Posts

Showing posts from June, 2022

नॅशनल पोस्टल सोसायटीची अल्पावधीत स्वभाडवलाकडे वाटचाल : संतोष यादव

Image
नॅशनल पोस्टल सोसायटीच्या वार्षिक सभेत गुणवंत पाल्याचा सत्कार प्रसंगी  श्री नामदेव डेंगळे, संतोष यादव,रामभाऊ लांडगे,संदीप हदगल,अमित देशमुख, श्री संदीप कोकाटे. ●कर्जावरील व्याजदरात कपात ●गुणवंत पाल्याचा गौरव अहमदनगर: अहमदनगर डिस्ट्रिक्ट नॅशनल पोस्टल सोसायटीचे स्थापना 2016 मध्ये झाली असून अल्पावधीतच ही संस्था स्वभाडवलाकडे वाटचाल करत असून, आजवर संस्था ही आपल्या उपलब्ध निधीमधून कमीत कमी व्याजदरात आपल्या सभासदांना कर्ज उपलब्ध  करत असून, सातत्याने सभासद हितास प्राधान्य देत आहे त्यामुळेच या संस्थेची ओळख स्वभाडवली संस्था म्हणून होत आहे असे गौरवोदगार  संस्थेचे जेष्ठ सभासद व पोस्टल संघटनेचे राज्यउपाध्यक्ष संतोष यादव यांनी व्यक्त केले. अहमदनगर डिस्ट्रिक्ट नॅशनल पोस्टल को ऑप क्रेडिट सोसायटीची सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा  राज पॅलेस कॉन्फरन्स हॉल याठिकाणी संस्थेचे व्हा चेअरमन  श्री नामदेव डेंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. संस्थेचे कार्यकारी संचालक श्री सचिन गायकवाड यांनी सभेची नोटीस व आर्थिक पत्रके सभागृहापुढे ठेवली,उपस्थित सभासदाने सर्व विषय सर्वानुमते मंजूर केले. संस्थेचे जेष्ठ सभासद श्री

बाप नावाचं वादळ काव्यसंग्रहाचे चांदेकसारे येथे प्रकाशन

Image
कोपरगांव : - तालुक्यातील चांदेकसारे येथील स्व. एकनाथ सोनाजी खरात यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमीत्त बाप नावाचं वादळ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे, जळगांवचे उपायुक्त दिलीपराव झाल्टे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्रवरा ग्रामिण मेडीकल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे होते.           प्रारंभी डॉ. धर्माजी खरात यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. या कार्यक्रमांस भंते धम्म शरण, जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, ऐश्वर्याताई सातभाई, शिवाजीराव ढवळे, डॉ गायकवाड, सरपंच संजय गुरसळ, बाळासाहेब देवकर, कल्याणराव होन, प्रकाशक अरूण घायवटकर, श्रीमती बबुताई खरात, रणजीत खरात, संजय खरात, संगिता सोनवणे, उज्वला कांबळे, विविध क्षेत्रातील कवी, खरात परिवार व पंचक्रोशीतील सर्व सहकारी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी महाकवी संमेलनही पार पडले.

सोमवार ६ जुन रोजी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता

कोपरगांव :-       सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या ५९ व्या गळीत हंगामाची सांगता सोमवार ६ जुन रोजी दुपारी ४ वाजता संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत, संचालक प्रदिपराव नवले व सौ. प्रतिभाताई प्रदिपराव नवले या उभयतांच्या हस्ते सत्यनारायण महापूजेने केन सप्लाय कार्यालयात होत असुन यावेळी ट्रायइथाईल ऑर्थोफॉर्मेट व इथॉक्सी मिथाईल मॅलोनिक ईस्टर या रासायनिक उपपदार्थ पायलट प्लॅन्टचे उदघाटन कारखाना कार्यस्थळावरील जुन्या अॅसिटीक अॅसिड प्रकल्पाजवळ कारखान्यांचे संचालक व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या  कोल्हे व सौ. रेणुकाताई विवेकभैय्या  कोल्हे या उभयतांच्या हस्ते होत आहे. तरी सर्व सभासद, शेतकरी बांधव, संजीवनी उद्योग समुहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी या दोन्ही कार्यक्रमांस उपस्थित रहावे असे आवाहन उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी केले आहे.