पोस्टल संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी अहमदनगरचे संतोष यादव.... सचिवपदी ठाणेचे श्री संतोष कदम........ श्रीरामपुर येथे संपन्न झाले रौप्य महोत्सवी अधिवेशन

नवनिर्वाचित राज्य उपाध्यक्ष श्री संतोष यादव  यांचा सत्कार करताना श्री शिवाजी कांबळे, श्रीमंती शुभांगी मांडगे, श्रीमती सविता ताकपेरे ,अनिल धनावत.

अहमदनगर: नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल असोसिएशन ग्रुप सी महाराष्ट्रचे  रौप्य  महोत्सवी अधिवेशन दि 17 ते 19 दरम्यान मा खा गोविंदराव आदिक सभागृह  श्रीरामपुर येथे संपन्न झाले. त्यामध्ये अहमदनगरचे श्री संतोष यादव यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.

या अधिवेशनाचे उदघाटन मा खा सदाशिवराव लोखंडे,तर प्रमुख पाहुणे मा  आमदार श्री लहुजी कानडे,तर संघटनेचे राष्ट्रीय नेते मा श्री बी शिवकुमार दिल्ली,श्री शिवाजी वासू रेड्डी दिल्ली यांचे सह महाराष्ट्रातील चाळीस विभागातील प्रतिनिधी उपस्थित होते. 

या सर्वांच्या उपस्थितीत संघटनेची पुढील दोन वर्षासाठी पुढील प्रमाणे कार्यकारणी निवडण्यात आली 

 अध्यक्ष श्री रामभजन गुप्ता (मुंबई)उपाध्यक्ष संतोष यादव (अहमदनगर) श्री धनंजय यमतकर (अकोला) श्री आनंद गवळी (कोल्हापूर),मंडळ सचिव श्री संतोष कदम (ठाणे) सहायक मंडळ सचिव श्री काळूराम पारखी (पुणे),श्री संजय सनातन (औरंगाबाद),श्री धनंजय राऊत (नागपूर)श्री नंदू झलबा (गोवा) खजिनदार,श्री महादेव गोपालघरे (मुंबई),सहायक खजिनदार श्री सागर आढाव (श्रीरामपुर)संघटन सचिव धनंजय इंगोले (नवी मुंबई),जितेंद्र पाटील (बुलढाणा)श्री गणेश ठाकूर(धुळे)तर ऑडिटरपदी श्री रवींद्र शिंपी (बुलढाणा) यांची निवड करण्यात आली.

या अधिवेशनात कर्मचाऱ्याना दैनंदिन कामकाजात येत असलेल्या विविध समस्येविषयी सविस्तरपणे चर्चा झाली .प्रतिनिधी सत्रात उपस्थित सर्व विभागातील सहभाग घेतला.सर्वांच्या समस्या जाणून घेत संघटनेचे राष्ट्रीय नेते मा श्री बी शिवकुमार,श्री शिवाजी वासू रेडी यांनी सविस्तरपणे मार्गदर्शन केले. श्रीरामपुर डाक विभागाचे अधिशक श्री हेमंत खडकेकर यांनी अधिवेशनास उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

श्रीक्षेत्र शिर्डी व नेवासा येथे हॉलिडे होम करण्याची आग्रही मागणी श्री गुप्ताजी यांनी डाक अधिक्षक श्री हेमंत खडकेकर यांच्या कडे केली.यावर कार्यवाही सुरू असून त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे त्यानी सांगीतले.

सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा श्रीरामपुर शाखेच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

या अधिवेशनासाठी मोलाची भूमिका बजावणारे श्री राजेंद्र विश्वास, श्री गोरख कांबळे,श्री गोरख दहिवाळकर,श्रीमती विजया शहाणे यांचा विशेष गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विकास लांडे तर आभार श्री गफूर सय्यद यांनी केले.

श्री यादव यांचे निवडीच्या निमित्ताने आज अहमदनगर आर  एस पोस्ट ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये  त्याचा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी श्री शिवाजी कांबळे,श्री अंबादास सुद्रीक,श्री भाऊ श्रीमंदिलकर ,श्रीमती शुभांगी मांडगे,श्रीमती सविता ताकपेरे, श्री स्वप्नील पवार,बाबासाहेब बुट्टे, अनिल धनावत, संजीव पवार,श्रीमती पंकजा धर्म हे कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा