भारतीय डाक विभागाचे सेवा घराघरापर्यंत.. मा खा सदाशिवराव लोखंडे....... पोस्टल संघटनेचे तीन दिवसीय रौप्य महोत्सवी अधिवेशन
श्रीरामपुर:
भारतीय डाक विभागाच्या सेवा सर्वसामान्याच्या घराघरात पोहचल्या आहेत ही अतिशय अभिमानाची बाब आहे असे प्रतिपादन मा खा सदाशिवराव लोखंडे यांनी केले.
नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज ग्रुप सी महाराष्ट्र सर्कलचे रौप्य महोत्सवी अधिवेशन श्रीरामपुर येथे मा खा गोविंदराव आदिक सभागृह श्रीरामपुर येथे सूरु झाले.
पोस्टऑफिसच्या लोकाभिमुख सेवा अधिकाधिक लोकप्रिय करणेकरिता आपण अनमोल सेवा देत आहात तसेच कोविड कालखंडात आपण अखंडित सेवा दिल्या याविषयी विशेष कौतुक केले, व अशीच सेवा पुढील कालखंडात असेच चालू ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली.आपले कार्यालये अद्यावत करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा उपलब्ध करण्यासाठी शासन स्तरावर मी निश्चितच प्रयत्नशील राहील.आपल्याकडे असणाऱ्या ग्राहकांच्या ठेवीवर कर्ज उपलब्ध करून देणेकरिता शासनाकडे मी स्वतः प्रयत्न करील त्यामुळे आपल्या ग्राहकांची मोठ्या प्रमाणात सोय होईल. आपल्या विविध न्याय मागण्यांसाठी सुद्धा मी प्रयत्नशील राहील.
याप्रसंगी नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वाकरिता जुनी पेन्शन योजना सुरू करावी अशी विनंती अनेक सभासदांनी मा खा सदाशिवराव लोखंडे यांचे कडे केली.यावर लोकसभेच्या माध्यमातून या प्रश्नी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करू.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा आमदार श्री लहुजी कानडे हे म्हणाले की, ग्रुप सी कर्मचारी प्रशासकीय हे व्यवस्थेचा मुख्य कणा आहे. आपला डाक विभाग सचोटीने सेवा देणारे प्रमुख खाते आहे.
यावेळी संघटनेचे राष्ट्रीय नेते मा बी शिवकुमार दिल्ली यांनी कर्मचाऱ्याचा न्याय मागणीकरिता संघटनेचा पाठपुरावा सुरू आहे कनेक्टिव्हिटी बाबत निश्चितच लवकर तोडगा निघून आपल्या सर्व सेवा सुरळीत होतील.
याप्रसंगी श्री संतोष यादव ,आर एच गुप्ता,श्री राजेंद्र विश्वास,बबनराव शिंदे,यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विकास लांडे,व सौ विजया शहाणे तर आभार श्री गोरक्ष कांबळे यांनी केले.
कार्यक्रमासाठी राज्यभरातून प्रतिनिधी उपस्थित आहेत.
Comments
Post a Comment