पोस्टल संघटनेचे रौप्यमहोत्सवी राज्य अधिवेशन...... कर्मचाऱ्याचा न्याय व प्रलंबित मागण्यांवर होणार अधिवेशनात चर्चा.......

डाकविभागातील मान्यताप्राप्त संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन प्रथम:च अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर येथे होत असल्याने सभासदामध्ये उत्सवाचे वातावरण आहे.

या अधिवेशनात निश्चित सभासदाच्या न्याय व प्रलंबित मागण्यांवर सविस्तरपणे उदापोह होईल.
 - संतोष यादव राज्य उपाध्यक्ष
अहमदनगर: नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज ग्रुप सी महाराष्ट्र व गोवा सर्कलचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन मा खा गोविंदरावजी आदिक सभागृह संगमनेर रोड श्रीरामपुर येथे दि 17 ते 19 एप्रिल दरम्यान आयोजित केले असल्याची माहिती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री संतोष यादव यांनी दिली. 

   रविवार दि 17 एप्रिल रोजी  सकाळी 10 वाजता या अधिवेशनाचे खुले अधिवेशनाचे उदघाटन मा खा श्री सदाशिवराव लोखंडे खासदार शिर्डी, तर मा श्री लहुजी कानडे आमदार श्रीरामपुर, मा श्रीमती वीणा रामकृष्ण श्रीनिवास चिफ पोस्टमास्तर जनरल महाराष्ट्र यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

याप्रसंगी मा श्री बी शिवकुमार सेक्रेटरी जनरल FNPO दिल्ली ,श्री शिवाजी वासिरेड्डी जनरल सेक्रेटरी ग्रुप सी दिल्ली,श्री निसार मुजावर जनरल सेक्रेटरी पोस्टमन दिल्ली, श्री रामभजन गुप्ता मंडळ सचिव महाराष्ट्र, श्री जे के सरदेसाई, श्री सुनील झुंजारराव,श्रीमती सुनेत्रा सारंग,श्री उमेश म्हसकर,श्री पी एस नाईक,संतोष कदम,श्री राजू करपे,श्री अरविंद साळवी,श्री अनंतराव महाडिक, श्री बबनराव शिंदे,श्री शशी पवार, श्री संतोष यादव,श्री काळूराम पारखी, श्री हेमंतजी खडकीकर,संतोष जोशी,रवींद्र झावरे,विनायक शिंदे,श्री सागर आढाव,यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. 

 महाराष्ट्रातील सर्व चाळीस पोस्टल  विभागातुन जवळपास एकशे पन्नास प्रतिनिधी या राज्यस्तरीय अधिवेशनात सहभागी होणार आहेत.

 या तीन दिवसीय अधिवेशनात पहिल्या दिवशी खुले अधिवेशन तर उर्वरित दोन दिवस प्रतिनिधी सत्र होणार आहे.महाराष्ट्रातील प्रत्येक विभागातून  उपस्थित प्रतिनिधी आपल्या विभागातील समस्या, दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अडचणी,  याविषयी उदापोह करतील. सर्वांच्या समस्या जाणून घेत या अधिवेशनात  त्याविषयी काही सकारात्मक पर्यायाचे काही ठराव करून प्रशासनास सादर करतील.

अधिवेशनास संघटनेचे वरिष्ठ नेते व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याने ते निश्चितच उपस्थीत प्रतिनिधींच्या समस्या विषयी आपल्या स्तरावरून सकारात्मक मार्ग काढतील.

अहमदनगर जिल्हामध्ये प्रथमच संघटनेचे राज्य अधिवेशन होत असल्याने सभासदांमध्ये उत्सवाचे वातावरण आहे.

तरी अहमदनगर व श्रीरामपुर पोस्टल विभागातील संघटनेच्या सभासदाने उपस्थित राहावे असे आवाहन श्री   राजेश नेतनकर,दिलीप भालेकर,राजेंद्र विश्वास,गोरक्ष कांबळे, गोरख दहिवाळकर, सागर आढाव,शिवाजी चाफे,बापू निघूडे,राजू शेख,श्रीमती विजया शहाणे,शहनाज तांबोळी,वर्षा दंडवते,शैलेश जगताप, यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा