Posts

Showing posts from April, 2022

श्री किशोर नेमाने यांची पोस्टल सोसायटीच्या संचालकपदी निवड

Image
पोस्टल सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक श्री किशोर नेमाने यांचा सत्कार करताना पोस्टल संघटनेचे नेते श्री संतोष यादव समवेत सचिन मोरे,शिवाजी भापकर, सागर वाघमारे अहमदनगर: अहमदनगर पोस्टल डिव्हीजन को ऑप क्रेडीट सोसायटीच्या  संचालकपदी वाहननगरचे (व्हीआरडीई) सब पोस्टमास्तर श्री किशोर नेमाने यांची  पुढील पाच वर्षाकरिता निवड झाल्याची अधिकृतपणे घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी मा श्री व्ही के मुटकुळे  यांनी अधिकृत पत्राद्वारे केली.   त्यानिमित्ताने वाहननगर पोस्ट ऑफिसमध्ये आयोजित सत्कार प्रसंगी पोस्टल संघटनेचे नेते श्री संतोष यादव बोलताना म्हणाले की,आपली या संस्थेवर संचालकपदी झालेली निवड ही आपण आजवर केलेल्या विधायक कामाची पावतीच आहे.संस्थेमध्ये संचालक म्हणून काम करताना मोठी जबाबदारी असते. आपल्याकडून निश्चितच  या जबाबदारीची जाणीव ठेऊन कामकाज होईल.आपल्यावर सभासदाने टाकलेल्या विश्वास पात्र राहत कारभार कराल.त्याच बरोबर संस्थेच्या सर्व सभासदाच्या हितास प्राधान्य द्याल,अशी अपेक्षा श्री संतोष यादव यांनी व्यक्त केली. त्याची  निवड झालेबदल त्याचा वाहननगर पोस्ट ऑफिसमध्ये  पोस्टल संघटनेचे नेते श्री संतोष यादव यांनी स

पोस्टल संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी अहमदनगरचे संतोष यादव.... सचिवपदी ठाणेचे श्री संतोष कदम........ श्रीरामपुर येथे संपन्न झाले रौप्य महोत्सवी अधिवेशन

Image
नवनिर्वाचित राज्य उपाध्यक्ष श्री संतोष यादव  यांचा सत्कार करताना श्री शिवाजी कांबळे, श्रीमंती शुभांगी मांडगे, श्रीमती सविता ताकपेरे ,अनिल धनावत. अहमदनगर: नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल असोसिएशन ग्रुप सी महाराष्ट्रचे  रौप्य  महोत्सवी अधिवेशन दि 17 ते 19 दरम्यान मा खा गोविंदराव आदिक सभागृह  श्रीरामपुर येथे संपन्न झाले. त्यामध्ये अहमदनगरचे श्री संतोष यादव यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. या अधिवेशनाचे उदघाटन मा खा सदाशिवराव लोखंडे,तर प्रमुख पाहुणे मा  आमदार श्री लहुजी कानडे,तर संघटनेचे राष्ट्रीय नेते मा श्री बी शिवकुमार दिल्ली,श्री शिवाजी वासू रेड्डी दिल्ली यांचे सह महाराष्ट्रातील चाळीस विभागातील प्रतिनिधी उपस्थित होते.  या सर्वांच्या उपस्थितीत  संघटनेची पुढील दोन वर्षासाठी पुढील प्रमाणे कार्यकारणी निवडण्यात आली   अध्यक्ष श्री रामभजन गुप्ता (मुंबई)उपाध्यक्ष संतोष यादव (अहमदनगर) श्री धनंजय यमतकर (अकोला) श्री आनंद गवळी (कोल्हापूर),मंडळ सचिव श्री संतोष कदम (ठाणे) सहायक मंडळ सचिव श्री काळूराम पारखी (पुणे),श्री संजय सनातन (औरंगाबाद),श्री धनंजय राऊत (नागपूर)श्री नंदू झलबा (गोवा) खजिन

भारतीय डाक विभागाचे सेवा घराघरापर्यंत.. मा खा सदाशिवराव लोखंडे....... पोस्टल संघटनेचे तीन दिवसीय रौप्य महोत्सवी अधिवेशन

Image
  नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज ग्रुप सी महाराष्ट्र सर्कलचे  रौप्य महोत्सवी  खुल्या अधिवेशनाचे  उदघाटन करताना मा खा सदाशिवराव लोखंडे, मा आ श्री लहुजी कानडे,श्री बी शिवकुमार, आर एच गुप्ता , अरविंदजी साळवे, संतोष यादव, काळूराम पारखी, सुनील झुंझारराव,संतोष कदम,श्री आशुतोष देशपांडे,आनंद गवळी, बबनराव शिंदे,महादेव गोपालघरे,राजेंद्र विश्वास ,विजया शहाणे,गोरक्ष कांबळे,गोरख दहिवाळकर श्रीरामपुर:   भारतीय डाक विभागाच्या सेवा सर्वसामान्याच्या घराघरात पोहचल्या आहेत ही अतिशय अभिमानाची बाब आहे  असे प्रतिपादन मा खा सदाशिवराव लोखंडे यांनी केले.  नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज ग्रुप सी महाराष्ट्र सर्कलचे  रौप्य महोत्सवी अधिवेशन श्रीरामपुर येथे मा खा गोविंदराव आदिक सभागृह श्रीरामपुर येथे सूरु झाले. पोस्टऑफिसच्या लोकाभिमुख सेवा अधिकाधिक लोकप्रिय करणेकरिता आपण  अनमोल सेवा देत आहात तसेच कोविड कालखंडात आपण अखंडित सेवा दिल्या याविषयी विशेष कौतुक केले, व अशीच सेवा पुढील कालखंडात  असेच चालू  ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली.आपले कार्यालये अद्यावत  करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा उपलब्ध करण्यासाठी श

पोस्टल संघटनेचे रौप्यमहोत्सवी राज्य अधिवेशन...... कर्मचाऱ्याचा न्याय व प्रलंबित मागण्यांवर होणार अधिवेशनात चर्चा.......

Image
डाकविभागातील मान्यताप्राप्त संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन प्रथम:च अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर येथे होत असल्याने सभासदामध्ये उत्सवाचे वातावरण आहे. या अधिवेशनात निश्चित सभासदाच्या न्याय व प्रलंबित मागण्यांवर सविस्तरपणे उदापोह होईल.  - संतोष यादव राज्य उपाध्यक्ष अहमदनगर: नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज ग्रुप सी महाराष्ट्र व गोवा सर्कलचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन मा खा गोविंदरावजी आदिक सभागृह संगमनेर रोड श्रीरामपुर येथे दि 17 ते 19 एप्रिल दरम्यान आयोजित केले असल्याची माहिती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री संतोष यादव यांनी दिली.     रविवार दि 17 एप्रिल रोजी  सकाळी 10 वाजता या अधिवेशनाचे खुले अधिवेशनाचे उदघाटन मा खा श्री सदाशिवराव लोखंडे खासदार शिर्डी, तर मा श्री लहुजी कानडे आमदार श्रीरामपुर, मा श्रीमती वीणा रामकृष्ण श्रीनिवास चिफ पोस्टमास्तर जनरल महाराष्ट्र यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याप्रसंगी मा श्री बी शिवकुमार सेक्रेटरी जनरल FNPO दिल्ली ,श्री शिवाजी वासिरेड्डी जनरल सेक्रेटरी ग्रुप सी दिल्ली,श्री निसार मुजावर जनरल सेक्रेटरी पोस्टमन दिल्ली, श्री रामभजन गुप्ता मंडळ सचिव महाराष्ट्र, श

अहमदनगर प्रधान डाकघर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी.

Image
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव प्रसंगी मानवंदना देते वेळी मा श्री एस रामकृष्ण,श्री संदिप कोकाटे,पोस्टल संघटनेचे नेते श्री संतोष यादव,प्रदिप सूर्यवंशी अहमदनगर: अहमदनगर प्रधान डाकघरमध्ये मा श्री संदीपजी कोकाटे प्रभारी सिनियर पोस्टमास्तर व मा श्री एस रामकृष्ण प्रवर अधिक्षक डाकघर यांचे प्रमुख उपस्थितीत महामानव,भारतीय घटनेचे शिल्पकार,बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्याउत्सवात साजरी करण्यात आला. यावेळी पोस्टल संघटनेचे नेते श्री संतोष यादव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ बाबासाहेबजी आंबेडकर यांचे अतुलनीय कार्या विषयी सविस्तरपणे माहिती दिली. यावेळी श्री राजू राहिंज,श्री सतिष येवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी आदरणीय डॉ बाबासाहेबजी आंबेडकर मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन मनोरंजन कक्षाच्यावतीने युवा नेते श्री प्रदिप सूर्यवंशी, श्री कमलेश मिरगणे,श्री दिपक नागपुरे यांनी केले. यावेळी श्री रमीत रोहिला,श्री राधाकिसन मोटे,श्री अजित रायकवाड,श्री सुरज गायकवाड,श्री दिपक जेसवानी,श्री आनंद भोंडवे, श्री विजय चाबुकस्वार,श्री झुंबरराव विधाते यांचे सह मोठ्या संख्येने

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

Image
श्री अशोक शेजुळ लिखित कृपाछत्र या पुस्तकाचे विमोचनप्रसंगी ह भ प शिंगोटे महाराज,श्री आर एन जाधव,श्री बाळासाहेब भुजबळ, श्री माऊली गायकवाड,इ .   अहमदनगर: स्वतःचे आत्मचरित्र लिहीत असताना आपल्यातील *मी* बाजूला ठेवत ते लिहणे ही खरोखरच तारेवरची कसरत आहे,त्याच बरोबर संघर्षमय जीवनाताच खरा आनंद असून त्यामधूनच माणूस समृद्ध होत असतो,आपल्याबरोबर सर्वानाच बरोबर घेऊन चालतो तोच खऱ्या सर्वार्थाने उंचीवर जाऊ शकतो असे प्रतिपादन श्री आर एन जाधव सेवानिवृत्त विक्रीकर उपायुक्त यांनी केले. श्री अशोक शेजुळ सेवानिवृत्त विक्रीकर अधिकारी लिखित *कृपाछत्र* या पुस्तकाच्या विमोचन सोहळा मधुरंजनी सभागृह सावेडी येथे श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर पार पडला. या कार्यक्रमासाठी नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब भुजबळ,प्रांत उपाध्यक्ष श्री माऊली मामा गायकवाड, नगरसेविका मा सौ दिपालीताई बारस्कर,नितीनजी बारस्कर,अमितजी वाघमारे,बाबुराव दळवी,बापूसाहेब औटी,पोस्टल संघटनेचे नेते श्री संतोष यादव उपस्थित होते. श्री संतोष यादव आपल्या मनोगतात म्हणाले की, श्री अशोक शेजुळ यांनी आपल्या आयुष्यातील आजवरच्या प्रवासाचे यथार्थ वर्णन या