दोन दिवसीय देशव्यापी संपात टपाल कर्मचारी सहभागी होणार - संतोष यादव

अहमदनगर: दि 28 व 29  मार्च या दोन दिवसीय देशव्यापी संपात नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज अहमदनगर सहभागी होत असल्याची माहिती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री संतोष यादव यांनी दिली.


या दोन दिवसीय संपात केंद्रीय संघटनेच्या आदेशानुसार आम्ही सहभागी होत असून,केंद्र सरकारच्या नवीन कामगार विरोधी धोरणा सह खाजगीकरणास विरोध, या सहनवीन पेन्शन योजना रद करावी व  सर्वाकरिता जुनी पेन्शन सुरू करावी. डाक विभागातील कर्मचाऱ्याचा न्याय व प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा ,कोविड कालावधीत कर्मचाऱ्याचा विविध समस्यांचे निवारण करणेबाबत, डाकविभागातील सर्वाकरिता पाच दिवसाचा आठवडा सुरू करा यासह विविध मागण्यांसाठी आम्ही या संपात सहभागी होत आहोत तरी अहमदनगर विभागातील संघटनेच्या सभासदांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन श्री कमलेश मिरगणे,श्री सुनिल थोरात,श्री आसिफ शेख यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"