पोस्टल कर्मचाऱ्याच्या न्याय व प्रलंबित मागण्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार श्री आर एच गुप्ता......... श्री आर एच गुप्ता यांची डेप्युटी सेक्रेटरीपदी निवड

श्री आर एच गुप्ता महाराष्ट्र यांची कुरुक्षेत्र येथील अधिवेशनात डेप्युटी जनरल सेक्रेटरीपदी निवड झालेबदल त्याचा सत्कार करताना महाराष्ट्रातील संघटनेचे प्रमुख पदाधिकारी

अहमदनगर: नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज ग्रुप सी चे चोविसावे अखिल भारतीय अधिवेशन श्रीक्षेत्र कुरुक्षेत्र हरियाणा येथे  दि 6 ते 8 मार्च दरम्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

देशभरातील विविध राज्यातील  जवळपास एकहजार तर महाराष्ट्रातील दिडशे सभासदांनी या अधिवेशनात सहभाग घेतला होता.अहमदनगर विभागातून टपाल कर्मचारी संघटनेचे नेते श्री संतोष यादव व कमलेश मिरगणे यांनी आपला सहभाग नोंदविला.

या तीन दिवसीय अधिवेशनात टपाल कर्मचाऱ्याचा विविध समस्या, स्टाफ शॉर्टज,कॅनेक्टिव्हिटी मध्ये वारंवार येत असलेल्या अडचणी, दि 28 व 29 मार्च रोजीचा प्रस्तावित दोन दिवसीय संप,यावर सविस्तरपणे चर्चा झाली.अनेक सभासदांनी आपले मनोगत या अधिवेशनात व्यक्त करून यावर निर्णायक तोडगा काढण्याची विनंती याठिकाणी व्यक्त केली.

पुढील दोन वर्षांकरिता श्री बी शिवकुमार (कर्नाटक) यांची अध्यक्षपदी ,श्री शिवाजी वसू रेड्डी (आंध्रप्रदेश) यांची जनरल सेक्रेटरी तर  महाराष्ट्राच्या वतीने श्री आर एच गुप्ता (मुंबई) यांची डेप्युटी जनरल सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली.

श्री गुप्ता हे महाराष्ट्राचे सर्कल सेक्रेटरी म्हणून कार्यरत असून,त्याचे डेप्युटी जनरल सेक्रेटरी म्हणून निवड झाल्याने त्याना देशपातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्याचे निवडीबदल त्याचा श्रीक्षेत्र कुरुक्षेत्र हरियाणा येथे महाराष्ट्रातील सभासदाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना श्री गुप्ता यांनी सर्वाना धन्यवाद देत,आपण टाकलेल्या विश्वासास पात्र राहून,आपल्या न्याय व प्रलंबित मागण्यांसाठी निश्चितच प्रयत्न करून,सभासद व प्रशासन यातील दुवा म्हणून निश्चितच प्रामाणिकपणे काम करील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्रातून  अधिवेशनासाठी उपस्थित असलेले श्री निसार मुजावर (कोल्हापूर), श्री सुनील झुंजारराव (ठाणे) श्री संतोष यादव,श्री कमलेश मिरगणे (अहमदनगर),श्री शिवाजी नवले,श्री धनंजय शेंडगे (बीड),श्री जयकांत सरदेसाई,महादेव गोपालघरे ,श्री रत्नाकरजीअभंग,श्री कृष्णकांतजी तायडे श्री संतोष कवठकर(मुंबई) श्री संतोष कदम(ठाणे),श्री आनंद गवळी श्री काटकरसाहेब (कोल्हापूर),श्री शिवाजी चाफे,श्री कल्पेश वाघ (श्रीरामपुर), श्री आशुतोष देशपांडे (नाशिक)श्री महेश पल्लेवाड(सोलापूर)श्री शिवाजी तोंडले (पंढरपूर)श्री बालाजी राखिले(रत्नागिरी)श्री यमतकर (अकोला) श्री धनंजय राऊत,श्री निपानकर (नागपूर) श्री गणेश ठाकूर ,श्री चव्हाण(धुळे) श्री विशाल भोपळे (रायगड),श्री सुनील गोहर (गोवा)श्री महेंद्र कडु (पालघर)यांचे सह मोठया संख्येने सभासद उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा