Posts

Showing posts from March, 2022

सरकारच्या कामगार विरोधी धोरणाबाबत टपाल कर्मचारी आक्रमक........ जोरदार घोषणाने दुमदुमून गेला परिसर

Image
अहमदनगर प्रधान डाकघराच्या समोर आयोजित द्वारसभेस संबोधित करताना संघटनेचे नेते श्री संतोष यादव समवेत श्री कमलेश मिरगणे,श्री प्रमोद कदम,अमित कोरडे,श्री संदीप कोकाटे, सुनिल थोरात,नामदेव डेंगळे ,सलीम शेख,भाऊ श्रीमंदिलकर अहमदनगर: नवीन पेन्शन योजना रद्द करून पूर्ववत जुनी पेन्शन योजना सर्वाकरिता लागू करा, डाक विभागाच्या खाजगीकरणांच्या हालचाली थांबवा,यासह सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात टपाल विभागातील दोन्हीही मान्यताप्राप्त संघटना सहभागी झाल्यामुळे अहमदनगर विभागातील टपाल सेवा ठप्प झाल्याचा  दावा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री संतोष यादव यांनी केला आहे. टपाल विभागातील दोन्हीही मान्यताप्राप्त संघटना आपल्या केंद्रीय संघटनेच्या आवाहनानुसार संघटनेचे सभासद या दोन दिवसीय संपात सहभागी झालेले आहेत.आज संपाच्या पहिल्यादिवशी  अहमदनगर प्रधान डाकघराच्या समोर द्वारसभेचे आयोजन केले होते सभेस श्री संतोष यादव यांनी  मार्गदर्शन करताना म्हणाले की,जुनी पेन्शन योजना सर्वाकरिता लागू करा,कामगार कायद्यात सकारात्मक बदल करा  टपाल विभागातील संघटनेच्या पदाधिकाऱ्याची  छळवणूक थांबवा, कोरोनाकाळात सेवा देत असताना मय

दोन दिवसीय देशव्यापी संपात टपाल कर्मचारी सहभागी होणार - संतोष यादव

अहमदनगर: दि 28 व 29  मार्च या दोन दिवसीय देशव्यापी संपात नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज अहमदनगर सहभागी होत असल्याची माहिती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री संतोष यादव यांनी दिली. या दोन दिवसीय संपात केंद्रीय संघटनेच्या आदेशानुसार आम्ही सहभागी होत असून,केंद्र सरकारच्या नवीन कामगार विरोधी धोरणा सह खाजगीकरणास विरोध, या सहनवीन पेन्शन योजना रद करावी व  सर्वाकरिता जुनी पेन्शन सुरू करावी. डाक विभागातील कर्मचाऱ्याचा न्याय व प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा ,कोविड कालावधीत कर्मचाऱ्याचा विविध समस्यांचे निवारण करणेबाबत, डाकविभागातील सर्वाकरिता पाच दिवसाचा आठवडा सुरू करा यासह विविध मागण्यांसाठी आम्ही या संपात सहभागी होत आहोत तरी अहमदनगर विभागातील संघटनेच्या सभासदांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन श्री कमलेश मिरगणे,श्री सुनिल थोरात,श्री आसिफ शेख यांनी केले आहे.

पोस्टल कर्मचाऱ्याच्या न्याय व प्रलंबित मागण्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार श्री आर एच गुप्ता......... श्री आर एच गुप्ता यांची डेप्युटी सेक्रेटरीपदी निवड

Image
श्री आर एच गुप्ता महाराष्ट्र यांची कुरुक्षेत्र येथील अधिवेशनात डेप्युटी जनरल सेक्रेटरीपदी निवड झालेबदल त्याचा सत्कार करताना महाराष्ट्रातील संघटनेचे प्रमुख पदाधिकारी अहमदनगर:  नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज ग्रुप सी चे चोविसावे अखिल भारतीय अधिवेशन श्रीक्षेत्र कुरुक्षेत्र हरियाणा येथे  दि 6 ते 8 मार्च दरम्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले. देशभरातील विविध राज्यातील  जवळपास एकहजार तर महाराष्ट्रातील दिडशे सभासदांनी या अधिवेशनात सहभाग घेतला होता.अहमदनगर विभागातून टपाल कर्मचारी संघटनेचे नेते श्री संतोष यादव व कमलेश मिरगणे यांनी आपला सहभाग नोंदविला. या तीन दिवसीय अधिवेशनात टपाल कर्मचाऱ्याचा विविध समस्या, स्टाफ शॉर्टज,कॅनेक्टिव्हिटी मध्ये वारंवार येत असलेल्या अडचणी, दि 28 व 29 मार्च रोजीचा प्रस्तावित दोन दिवसीय संप,यावर सविस्तरपणे चर्चा झाली.अनेक सभासदांनी आपले मनोगत या अधिवेशनात व्यक्त करून यावर निर्णायक तोडगा काढण्याची विनंती याठिकाणी व्यक्त केली. पुढील दोन वर्षांकरिता श्री बी शिवकुमार (कर्नाटक) यांची अध्यक्षपदी ,श्री शिवाजी वसू रेड्डी (आंध्रप्रदेश) यांची जनरल सेक्रेटरी तर  महाराष्ट्राच्या

अल्पबचत अभिकर्ते यांचा गौरव करत साजरा केला महिला दिन......केडगाव पोस्टऑफिसचा उपक्रम

Image
केडगाव पोस्ट ऑफिसच्या प्रभारी पोस्टमास्तर सौ शुभांगी मांडगे या महिला दिनानिमित्त महिला प्रधान अभिकर्ते यांचा गौरव करताना समवेत सौ सविता ताकपेरे अहमदनगर:   पोस्टऑफिसच्या विविध योजनेत आपले अनमोल योगदान असणाऱ्या महिला प्रधान अभिकर्ते यांचा आज महिला दिनाच्या औचित्य साधत विशेष गौरव करण्यात आला. समाजामध्ये घरोघरी संपर्क करत,अल्पबचतीचे महत्त्व सांगत, पोस्टऑफिसच्या योजनेची माहिती ग्राहकांना सांगत आपली बचत पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक करणेकरिता ग्राहकांना प्रोत्साहित करणेकरिता महिला प्रधान अभिकर्ते यांचे मोठे योगदान आहे .केडगाव पोस्टऑफिस अंतर्गत जवळपास पन्नास पेक्षा अधिक महिला प्रधान अभिकर्ते कार्यरत असून त्याच्या अनमोल योगदानमुळेच केडगाव पोस्टऑफिस विविध योजनेत  सातत्याने उल्लेखनिय कामकाज करत  असते. त्यामुळेच आज या विशेष दिनाचे औचित्यसाधत आज त्याचा विशेष गौरव प्रभारी पोस्टमास्टर सौ शुभांगी मांडगे, सौ सविता ताकपेरे यांचे हस्ते श्रीमती लता कोरे, पंकजा धर्म, रंजना वाघ,निता चौधरी, कुसुम रोहकले, गुलाब कटारिया, संगीता शर्मा, रेवती शेटे, श्रीमती  रेखा पावसे, श्रीमती अस्मिता कुलकर्णी गौरव करण्यात आला