रक्तदान करत साजरी केली छत्रपती शिवाजी महाराज जयंती......... टपाल कर्मचाऱ्याचा अनोखा उपक्रम

डाक कर्मचाऱ्याचा वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचा निमित्ताने रक्तदान करताना श्री सागर पंचारिया व श्री कमलेश मिरगणे  याप्रसंगी श्री संदीप कोकाटे प्रभारी सिनियर पोस्टमास्टर, पोस्टल संघटनेचे जेष्ठ नेते श्री संतोष यादव, श्री संपत घुले ,मोटे पाटील,बापू तांबे.

अहमदनगर:  प्रधान डाकघर अहमदनगर मध्ये  श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्साहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले  होते.

प्रारंभी  महाराजांच्या प्रतिमेचे पूजन श्री एस रामकृष्ण प्रवर अधिक्षक डाकघर अहमदनगर यांचे हस्ते करण्यात आले यावेळी श्री संदीप कोकाटे प्रभारी सिनियर पोस्टमास्तर  उपस्थित होते.

दुपारच्या सत्रात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

 सायंकाळी  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात आपले  दिवसभराचे कामकाज करत जवळपास तेवीस डाक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.

शिबीराचे सांगता श्री छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती श्री व सौ वंदना  मिलिंद नगरकर यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने टपाल कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्री कमलेश मिरगणे, बापु तांबे, सागर पंचारिया, तान्हाजी सूर्यवंशी,प्रदिप सूर्यवंशी,राजेंद्र राहिंज ,शिवाजी वराडे,नितीन थोरवे,देवेन्द्र शिंदे,शुभांगी शेळके,नाजमीन शेख,हैदरअली मुलानी, राधाकिसन मोटे, किशोर नेमाने, संपत घुले,निलिमा कुलकर्णी, स्मिता कुलांगे, शुभांगी मांडगे  यांनी विशेष प्रयत्न केले.

यावेळी मोठ्या संख्येने टपाल कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"