Posts

Showing posts from January, 2022

सेवानिवृती हा आयुष्यातील अनमोल योग - संतोष यादव........... श्री झेंडे यांचा सेवापूर्ती सोहळा

Image
सेवानिवृत्ती निमित्त श्री झेंडे यांचा सत्कार करताना टपाल कर्मचारी संघटनेचे नेते श्री संतोष यादव,समवेत संदीप कोकाटे,श्री रावसाहेब चौधरी,श्री कमलेश मिरगणे,श्री शिवदासजी बनकर ,श्री श्रीकांत शिंदे सुबोधकुमार अहमदनगर: अहमदनगर डाक विभागातील व सध्या सबपोस्टमास्तर श्रीगोंदा येथे कार्यरत असणारे श्री चंद्रकांत  विठोबा झेंडे हे त्याच्या 39 वर्षीच्या प्रदीर्घ सेवेनंतर दि 31 जानेवारी 2022 रोजी सेवानिवृत्त झाले. श्री झेंडे यांनी डाक विभागात 39 वर्षे सेवा करत असताना पाथर्डी,बोधेगाव,जामखेड,बेलवडी , कोळगाव,विसापूर,अहमदनगर प्रधान डाकघर,श्रीगोंदा साखर कारखाना,काष्टी याठिकाणी काम केले. त्याचे  सेवानिवृतीनिमित्त त्याना निरोप सभारभ आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी पोस्टल संघटनेचे नेते संतोष यादव हे ह तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी सिनियर पोस्टमास्तर श्री संदीप कोकाटे,श्री शिवदासजी  बनकर डेप्युटी जनरल मॅनेजर सुदर्शन केमिकल्स पुणे हे होते. यावेळी बोलताना टपाल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री संतोष यादव म्हणाले की,सध्य परिस्थितीत संगणकीय प्रणाली मुळे कामकाजाची पध्दत मोठ्या जोमा

श्री भाऊसाहेब जाधव हे डाक विभागाचे वतीने सुकन्यासाथी म्हणून गौरवित

Image
श्री भाऊसाहेब जाधव यांनी सुकन्या साथी मोहिमेत उल्लेखनिय कामगिरी केलेबदल  यांचा सत्कार करताना पोस्टल संघटनेचे नेते श्री संतोष यादव समवेत श्री नामदेव डेंगळे, श्री सुनील थोरात इ. अहमदनगर: भारतीय डाक विभागाचे वतीने दि 7 ऑक्टोबर 21 ते 31डिसेंबर 2021 या कालावधीत,डाक विभागाचे वतीने खास मुलीकरिता असलेल्या सुकन्यासमृद्धी योजनेची विशेष मोहीम या कालावधीत अहमदनगर विभागात राबविण्यात आलेली होती.  या मोहिमेत अहमदनगर विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला. काही कर्मचाऱ्यांनी या योजनेत उल्लेखनिय काम केले त्यामध्ये अहमदनगर प्रधान डाकघरातील पोस्टमन म्हणून कार्यरत असणारे  श्री भाऊसाहेब विठोबा जाधव यांनी उल्लेखनिय कामगिरी केली त्यानी या कालावधीत आपले नित्याचे टपाल वाटपाचे कामकाज करत या मोहिमेअंतर्गत 91 सुकन्या समृद्धी खाते उघडत उल्लेखनिय कामगिरी केली. अहमदनगर विभागात या दरम्यान 7742 नवीन खाते उघडले गेले.या मोहिमेत 25 नवीन खाते उघडणाऱ्या 135 कर्मचाऱ्यास  सुकन्यासाथी म्हणून पात्र ठरले आहेत. या योजनेस मोहिमेत मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता ही मोहीम दि 11 जानेवारी पर्यत मुदत वाढविण्यात आलेली आहे.  य