डाक विभागाचे वतीने इंदिरानगर केडगाव येथे आधारकॅम्पचे आयोजन

भारतीय डाक विभाग अहमदनगर व बास्को ग्रामीण विकास केंद्र यांचे वतीने आयोजित  आधार कॅम्प  उद्घाटन करताना केडगाव चे पोस्टमास्तर श्री संतोष यादव समवेत उपस्थित रहिवासी

अहमदनगर:

भारतीय डाक विभाग अहमदनगर  व बॉस्को ग्रामीण विकास केंद्र,केडगाव अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरानगर येथील जि प शाळा केडगाव येथे स्थलांतरित कुटुंबासाठी आधार कॅम्पचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे संचालक फा.जॉर्ज डाबरिओ यांनी कार्यक्रम घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन केले व केडगाव डाकघरचे पोस्टमास्तर श्री. संतोष यादव  यांनी कॅम्प साठी साहित्य व कर्मचारी उपलब्ध करून मोलाचे सहकार्य केले श्री संतोष यादव यांचे हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

यासाठी भारतीय डाक विभागाच्या वतीने कॅम्पस्थळी स्वतंत्र संगणकीयप्रणाली बसवून कॅम्पसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.अहमदनगर प्रधान डाकघर मधील श्री बापूसाहेब तांबे व श्री.प्रकाश कदम यांनी संगणकीय कामकाज पहिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विलास आल्हाट यांनी तर आभार श्रीमती.भावना घाटविसावे यांनी केले.यावेळी शाळेचे  मुख्याध्यापक  श्री. आप्पासाहेब जाधव व श्रीमती. अनुजा रिगणे,अगंणवाडी सेविका श्रीमती. रंजना मांढरे. श्रीमती. नलिनी पाटोळे, श्री.श्याम कांबळे,श्री.प्रीतम वराडे,श्री सचिन मोरे श्री अनिल धनावत यांच्यासह मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा