Posts

Showing posts from November, 2021

डाक विभागाचे वतीने इंदिरानगर केडगाव येथे आधारकॅम्पचे आयोजन

Image
भारतीय डाक विभाग अहमदनगर व बास्को ग्रामीण विकास केंद्र यांचे वतीने आयोजित  आधार कॅम्प  उद्घाटन करताना केडगाव चे पोस्टमास्तर श्री संतोष यादव समवेत उपस्थित रहिवासी अहमदनगर: भारतीय डाक विभाग अहमदनगर  व बॉस्को ग्रामीण विकास केंद्र,केडगाव अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरानगर येथील जि प शाळा केडगाव येथे स्थलांतरित कुटुंबासाठी आधार कॅम्पचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे संचालक फा.जॉर्ज डाबरिओ यांनी कार्यक्रम घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन केले व केडगाव डाकघरचे पोस्टमास्तर श्री. संतोष यादव  यांनी कॅम्प साठी साहित्य व कर्मचारी उपलब्ध करून मोलाचे सहकार्य केले श्री संतोष यादव यांचे हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यासाठी भारतीय डाक विभागाच्या वतीने कॅम्पस्थळी स्वतंत्र संगणकीयप्रणाली बसवून कॅम्पसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.अहमदनगर प्रधान डाकघर मधील श्री बापूसाहेब तांबे व श्री.प्रकाश कदम यांनी संगणकीय कामकाज पहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विलास आल्हाट यांनी तर आभार श्रीमती.भावना घाटविसावे यांनी केले.यावेळी शाळेचे  मुख्याध्यापक  श्री. आप्पासाहेब जा

अहमदनगर प्रधान डाकघराच्या प्रभारी सिनियर पोस्टमास्तरपदी श्री संदीप कोकाटे

Image
नूतन  प्रभारी सिनियर पोस्टमास्तर श्री संदीप कोकाटे यांचा सत्कार करताना पोस्टल संघटनेचे नेते श्री संतोष यादव समवेत श्री कमलेश मिरगणे,प्रकाश कदम,बापु तांबे अहमदनगर : प्रधान डाकघर अहमदनगराच्या प्रभारी सिनियर पोस्टमास्तरपदी आज श्री संदीप कोकाटे यांनी पदभार स्वीकारला.  श्री संदीप कोकाटे यांनी यापूर्वी बीड, रत्नागिरी तर अहमदनगर विभागात श्रीगोंदा ,आनंदीबाजार व अहमदनगर सिटी पोस्ट ऑफिस याठिकाणी सब पोस्टमास्तर म्हणून काम पाहिलेले आहे. त्याची एक कुशल प्रशासक व कामगार प्रिय म्हणून ओळख आहे. प्रधान डाकघराचे पोस्टमास्तर हे पद मागील काही काळापासून रिक्त असून यापदी प्रभारीपदी अगोदर श्री गोरख दहिवाळकर श्री महेश तामटे यानी काम पाहिले आहे. आज पोस्टमास्तर म्हणून श्री संदीप कोकाटे यांनी कार्यभार स्वीकारला,त्यानिमित्ताने नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईजचे राज्य उपाध्यक्ष श्री संतोष यादव यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी श्री  शिवाजी जावळे, श्री बापू तांबे,श्री प्रकाश कदम,श्री सागर पंचारिया, श्री कमलेश मिरगणे,श्री नितिन थोरवे,श्री तान्हाजी सूर्यवंशी श्रीमती हिरा मगर,श्रीमती आश्विनी चिंतामणी,श्री अनिल

अध्यक्षपदी बापू तांबे तर सचिवपदी श्रीकांत नरसाळे यांची निवड

Image
आपुलकी मित्रमंडळाच्या वतीने दिपावली निमित्त ब्लँकेट व मिठाईचे वाटप करताना नूतन अध्यक्ष श्री बापू तांबे मेजर समवेत मंडळाचे सदस्य पारनेर (प्रतिनिधी)  गोरेगाव ता पारनेर येथील आपुलकी मित्र मंडळाची  वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच श्री गोरेश्वर मंदिर परिसर येथे  सर्व सभासदाच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली.    या सभेत मंडळाचे नूतन अध्यक्ष म्हणून श्री बापू तांबे (मेजर), उपाध्यक्ष म्हणून श्री रावसाहेब तांबे तर सचिव म्हणून श्री श्रीकांत नरसाळे यांची  एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.  मंडळाची स्थापना मागील तीन वर्षांपूर्वी झाली असून सतत सामाजिक उपक्रम  राबविण्याचा  मंडळाचा प्रयत्न असतो . याचाच एक भाग म्हणून कोरोना  महामारीच्या काळात मंडळाने  गोरेगाव येथील कोविड सेंटरसाठी मंडळाच्या वतीने मदत केली.सर्व  सभासदाच्या अनमोल योगदानामुळे मंडळाकडे आवश्यक निधी जमा होतो व यानिधीतुनच सामाजिक कामे करण्याचा मंडळाचा प्रयत्न असतो. आज मंडळामध्ये एकूण 14 विश्वासु सदस्य असून त्यामध्ये सर्वश्री रामदास नरसाळे, साहेबराव नरसाळे, जयराम तांबे, त्रिभुवन लष्करे, संतोष नरसाळे, भाऊसाहेब तांबे, गणेश नरसाळे, भरत तांबे, रघु