कोपरगांव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळास मुदतवाढ
राज्यातील महायुतीच्या शासनाने कोविड परिस्थिती लक्षात घेवुन कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळास २३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदवाढ देण्याचे आदेश काढल्याने कोपरगांव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासही मुदतवाढ मिळाली आहे.
शासनाच्या कृषि पणन सहकार विभागाचे कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांनी ३० सप्टेंबर रोजी हा शासन निर्णय काढला असून कृषि उत्पन्न बाजार समिती कमांक ०१२०-प्र क.१९-२०२१ स. ३०.०९.२०२१ रोजीच्या आदेशात ज्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे. ज्यांच्या पंचवार्षीक निवडणुक प्रक्रिया सुरू झाल्या आहेत तसेच कोविड महामारी लक्षात घेवुन महायुती शासनाने राज्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकांना शासन निर्णय २४ जानेवारी २०२० १० जुलै २०२०, २२ जानेवारी २०२१ व २२ एप्रिल २०२१ याप्रमाणे स्थगिती देत संचालक मंडळांना मुदतवाढ दिली. ३० सप्टेंबर रोजी शासनाने पुन्हा अध्यादेश काढून कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ कार्यरत होईपर्यंत किंवा २३ ऑक्टोबर २०२१ पासुन पुढील ३ महिने यापैकी अगोदर जे घडेल तोपर्यंत मुदतवाढ दिली आहे, मात्र या संचालक मंडळांना धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही असेही म्हटले आहे.
या निर्णयामुळे कोपरगाव बाजार समितीच्या सध्याच्या संचालक मंडळास आणखी काम करण्यास मुदतवाढ मिळाली आहे. कोपरगांव कृषि उत्पन्न बाजार समितीचा कारभार व्यापक असुन मतदार संघातील ८९ गावातील पीक उत्पादक शेतक-यांसह अन्य आसपासच्या शेतक-यांना फायदा होतो. कोरोना परिस्थितीमुळे बाजार समितीसह, जनावरांच्या खरेदी विक्रीवरही निर्बंध आले होते. ६ सप्टेंबर रोजी पुन्हा नव्याने आदेश करत जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी कोपरगाव बाजार समितीस जनावरांचा बाजार सुरू करण्यास परवानगी दिली. कोरोना नियम पाळून कोपरगाव बाजार समितीचे सभापती संभाजीराव रक्ताटे व त्यांचे सर्व संचालक टप्या टप्याने व टोकन देवुन शेतक-यांकडील शेतमाल खरेदी करत आहे. शासनाच्या या निर्णयामुळे कोपरगाव बाजार समितीच्या संचालक मंडळiस काम करण्यास मुदतवाढ मिळाली आहे.
Comments
Post a Comment