शहरातील प्रमुख रस्त्यावर कोणत्याही कमान प्रवेशद्वार बांधण्यास परवानगी देऊ नये -कलविंदरसिंग डडियाल
कोपरगाव प्रतिनिधी
शहरातील मुख्य रस्त्यालगत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहे त्या स्मारकासमोर रस्त्यावर अनधिकृत, विनापरवाना, बेकायदेशीर, कोणतीही तांत्रिक मंजुरी कोणतीही शासकीय मंजुरी न घेता कमान उभारणी केली जात असून ती बांधण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी जिल्हाधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक यांच्याकडे कलविनदर डडियाल यांनी केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले की प्रमुख रस्त्यावर इतर समाजाची कोणतीही तसेच अन्य सामाजिक संघटनांनी महापुरुषांच्या नावाने कमानी तसेच प्रवेशद्वार बांधण्याचे घाट घातले जात आहे.त्यांमुळे असे झाल्यास विविध ठिकाणी 20 ते 25 कमानी बांधण्यात येऊ शकतात. प्रत्येकाला आपली प्रवेशद्वार इतरांपेक्षा मोठी असावी, असे वाटून त्यातून जीवघेणी स्पर्धा तयार होऊन सामाजिक सलोखा व शांतता भंग होण्याचा संभव आहे. याची कृपया गांभीर्याने दखल घ्यावी. तसेच कोणत्याही समाजाला संस्थेला किंवा संघटनेला वरील प्रमुख रस्त्यावर कमान प्रवेशद्वार बांधण्यास परवानगी देऊ नये असे निवेदन शिवसेना शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, तहसीलदार विजय बोरुडे, पोलिस निरिक्षक वासुदेव देसले जिल्हाधिकारी अहमदनगर पोलिस अधिक्षक यांना दिले आहे.
Comments
Post a Comment