संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ४६ विद्यार्थ्यांची इपिटोम मध्ये निवड- श्री अमित कोल्हे..... एका पाठोपाठ नामांकित कंपन्या करीत आहे संजीवनीच्या विद्यार्थ्यांची निवड


कोपरगांव:
संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट डिपार्टमेंटच्या प्रयत्नाने इपिटोम काॅम्पोनंटस् प्रा. लिमिटेड या बहुराष्ट्रीय  कंपनीने संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या २०२०-२१  या शैक्षणिक वर्षाच्या  अंतिम सत्रातील  इंजिनिअरींगच्या विविध विद्या शाखांमधिल ४६ विद्यार्थ्यांची  नोकरीसाठी निवड केली आहे. अनेक नामांकित कंपन्या संजीवनीच्या विद्यार्थ्यांची  एका पाठोपाठ निवड करीत असल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये  आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ  इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजने विभाग निहाय उद्योग जगताला अभिप्रेत असणारे कौशल्ये व आधुनिक तंत्रज्ञान अवगत असणारे अभियंते तयार करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे  जास्तीत जास्त विद्यार्थी नामांकित कंपन्यांच्या कसोटींच्या कक्षा पुर्ण करीत आहे.
    अलिकडेच इपिटोम या कंपनीने निवड केलेल्या विद्यार्थ्यांची  यादी जाहिर केली आहे. यात निलेश  ज्ञानेश्वर  पुंड, शुभम दत्तात्रय खर्जुले, प्रगती मानिक साळुंके, निशिगंधा  राजेंद्र काळे, कोमल अनिल कदम, आरती रावसाहेब गवळी, पुणम रानोबा पिठ्ठे, कोमल अर्जुन हाडके, पल्लवी रविंद्र सोजवळ, अक्षय संजय गाढवे, किरण मच्छिंद्र शेळके, गौरव साहेबराव षिंदे, समाधान रावसाहेब ढगे, योगेष संजय खंडीझोड, दिपक सुरेश  रहाणे, तेजस हेमंत दोशी , उदय विजय नालकर, बाळासाहेब रामदास गावटे, अजय संजय रोहमारे, आकाश  संजय निलकंठ, दिपक जगन खेमनार, निशांत  मयुर कुलकर्णी, अक्षय अनिल सोनवणे, श्रीकांत कारभारी त्रिभुवन, योगेश  गोरख कुऱ्हे , शुभम ज्ञानेश्वर  रानोडे, ऋषिकेश  गवुबा उगले, ओंकार गहिनीनाथ फुंदे, युवराज विजय गाडगिळे, योगेश  अरूण तिरमखे, निखिल संभाजी भाकरे, सागर ज्ञानेश्वर  गायकवाड, सचिन हरीभाउ युवारे, अक्षय विलास थोरात, प्रकाश  संजय मार्के, किरण मच्छिंद्र शेळके, गौरव साहेबराव शिंदे , वैभव गणपतराव रोहम, अनिकेत मुकेश  गायकवाड, वैभव नारायण चव्हाण, सचिन मधुकर वाबळे, सागर संजय पाटील, योगेश संजय म्हस्के, अनिल रमेश  घागरे व ऋषिकेश  राजेंद्र कानकाटे यांचा समावेश  आहे.
आपल्या पाल्यास संजीवनीच्या प्रयत्नाने नामांकित कपनीमध्ये हमखास नोकरी मिळेल या विश्वासार्हतेने  पालक त्यांच्या पाल्यास संजीवनी मध्ये दाखल करतात. पालकांनी टाकलेला विश्वास  सार्थ ठरविण्यासाठी संजीवनीच्या सर्व इंजिनिअरींग विभागांमार्फत विद्याथ्र्यांना सक्षम केल्या जाते. यामुळेच संजीवनी ग्रामिण भागात असुनही जास्तित जास्त विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्यात यशस्वी होत आहे.
माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक अध्यक्ष श्री शंकरराव  कोल्हे, कार्याध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजचे डायरेक्टर डाॅ. ए.जी. ठाकुर व सर्व ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट डिपार्टमेंटची टीम यांचे अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा