के. जे. सोमैया महाविद्यालय, व कोलंबिया मधील रीओनिग्रा दरम्यान ऑनलाईन आंतरराष्ट्रीय कार्यक्रम

कोपरगाव प्रतिनिधी
            के. जे. सोमैया महाविद्यालय,  व कोलंबिया मधील अँटिओक्विया राज्यातील सेना (राष्ट्रीय शिक्षण सेवा संस्था), रीओनिग्रा दरम्यान ऑनलाईन आंतरराष्ट्रीय  कार्यक्रमाचे आयोजन केले होते. "आंतरराष्ट्रीय आंतरसंस्कृती संवाद विनिमय कार्यक्रम" असा विषय होता. "सोमैया महाविद्यालयाच्या वतीने या कार्यक्रमाचे संयोजक व नियंत्रक म्हणून  समन्वयक प्रा. रवींद्र जाधव यांनी व सेना ( (राष्ट्रीय शिक्षण सेवा संस्था  रीओनिग्रा,  कोलंबियाच्या वतीने सँड्रा लिलियाना गोंझालेझ यांनी काम पहिले व महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन सतत करत असते व भविष्यात देखील अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल" अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी .एस .यादव यांनी दिली.        "या कार्यक्रमाचा उद्देश हा इतर देशांची संस्कृती समजून घेणे व त्या देशाला आपल्या देशाची संस्कृती सादर करणे व विद्यार्थ्यांची अंतर्गत गुणवत्ता वाढविणे हा आहे" अशी माहिती महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे प्रमुख प्रा. विजय ठाणगे यांनी दिली."या कार्यक्रमात  महाविद्यालयाच्या ५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन भारतातील विविध धर्म,  सण, ऐतिहासिक ठिकाणे, भारतीय खाण्यापिण्याच्या सवयी व  विविध राज्यातील नृत्य इत्यादी विषयी माहिती कोलंबियन विद्यार्थ्यांना दिली.  माहिती देत असताना भारतात राष्ट्रीय एकात्मता कशी साधली जाते याची प्रचिती विदयार्थ्यांनी दिली. त्याच बरोबर कोलंबियन विद्यार्थ्यांनी कोलंबियन संस्कृतीचे सादरीकरण करून कोलंबिया देशाची ओळख करून दिली. यामागील उद्देश हा संस्कृतीचे  अदानप्रदान करणे तसेच विद्यार्थ्यांना आंतराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा होता " अशी माहिती  संयोजक व नियंत्रक प्रा. रवींद्र जाधव यांनी दिली. या कार्यक्रमाच्या  सेना राष्ट्रीय शिक्षण सेवा संस्था  रीओनिग्रा,  कोलंबियाच्या वतीने संयोजक व नियंत्रक सँड्रा लिलियाना गोंझालेझ यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले, "विद्यार्थ्यांमध्ये आंतरराष्ट्रीय संदेशवहन विकसित होण्यासाठी व त्याचा फायदा विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य विकसित करणे. तसेच दुसऱ्या देशाच्या संस्कृतीचा अभ्यास  करणे हा होता अशी माहिती दिली.".
आपले अनुभव  विद्यार्थिनी प्रियंका लावर हिने विशद करताना म्हंटले कि, " कोलंबिया देशातील सेना इन्स्टिट्युट मधल्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्याचा अनुभव हा आत्तापर्यंतच्या केलेल्या सगळ्याच ॲक्टीविटीज पेक्षा वेगळा आणि अगदी अविस्मरणीय होता. तो के. जे.एस.कॉलेजमुळे आम्हाला मिळणे शक्य झाले. कॉलेज कडून प्रतिनिधित्व  करणे म्हणजेच भारताचे प्रतिनिधित्व करण्या सारखे होते, त्यामुळे आनंद आणि उत्सुकता दोन्ही गोष्टी मनात होत्या. भारताच्या पूर्वापार चालत आलेल्या संस्कृती ची थोडक्यात ओळख करून देणे आणि कोलंबियन जीवनशैली समजून घेणे हे दोन्ही उद्देश  साध्य झाले.  दोन्ही बाजूंमध्ये छान मित्रता देखील निर्माण झाली. मार्गदर्शक प्रा. रवींद्र जाधव आणि विद्यार्थी सहकारी यांची मदत झाली".तर ओंकार वाघ म्हणाला कि, “कोलंबिया देशाशी आंतरसंस्कृती संवादाचा असा आजीवन अनुभव आम्हाला मिळाला.आम्ही कोलंबियाची संस्कृती आणि तेथिल वातावरण समजून घेतले,तसेच तेथील आहाराचे प्रकार समजले.  तेथील लोकांनाही आपल्या भारताविषयी आपुलकी असल्याचे जाणवले व तसेच त्यांना रंगपंचमी सणाविषयी खूप आकर्षण असल्याचे समजले”.तर “अंतरसंस्कृतीचा अनुभव मिळाला तसेच कोलंबियन लोकांना भारताविषयी आपुलकी दिसून आली" असे मत  पठाण हिने व्यक्त केले. तर स्नेहलकुमार याने "कोलंबिया मध्ये निसर्ग आणि पौष्टीक आहारावर भर दिला जातो" असे मत व्यक्त केले.मारिट्झा यिसल्ट रेंडेन मार्टिनेझ हिने " भारतीय लोकगीते आणि रंगपंचमी हे उत्सव छान असून  भारतीय संस्कृती मध्ये राष्ट्रीय एकात्मता दिसून आली” असे मत व्यक्त केले.
संस्थेचे सचिव  संजीव कुलकर्णी सदस्य  संदीप रोहमारे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयातअसे  कार्यक्रम राबविले जातील यासाठी संस्था कटिबद्ध आहे .
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, डॉ. संजय अरगडे, प्रा. अजित धनवटे, प्रा. वर्षा आहेर,डॉ. महारुद्र खोसे व डॉ. वसुदेव साळुंके यांनी सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा