एस. एस. जी. एम. महाविद्यालयातील क्रीडा संचालक प्रा. सुभाष देशमुख यांना दोन सुवर्ण पदके प्राप्त....

सुभाष देशमुख यांनी औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मास्टर कँटेगिरीमध्ये ९३ किलो वजन गटात क्लासिक व इक्विप्ड  या दोन्ही प्रकारात दोन सुवर्ण पदक पटकावली आहेत.( छाया मयूर फीचर्स कोपरगाव )

कोपरगाव प्रतिनिधी
 येथील श्री सदगुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस् अॅण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेजमधील क्रीडा संचालक प्रा.सुभाष देशमुख यांनी औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मास्टर कँटेगिरीमध्ये ९३ किलो वजन गटात क्लासिक व इक्विप्ड  या दोन्ही प्रकारात दोन सुवर्ण पदक पटकावली आहेत. नोव्हेंबर २०२१ मध्ये गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी त्यांची महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग संघात निवड झाली आहे. 
प्रा. सुभाष देशमुख यांच्या यशस्वी कामगिरीने महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली आहे.त्यांची ही कामगिरी महाविद्यालयाच्या दृष्टीने भूषणावह असून सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.               त्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अॅड. भगीरथ शिंदे, महाविद्यालय विकास समिती सदस्य  बिपिन कोल्हे, रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष व महाविद्यालय विकास समिती सदस्य  आमदार आशुतोष काळे आदिंसह समितीच्या सर्व  सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.  महाविद्यालयात त्यांचा सत्कार करून प्राचार्य डॉ. एस. आर. थोपटे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर सेवकांनी प्रा. देशमुख यांचे अभिनंदन केले व त्यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सदर प्रसंगी महाविद्यालायचे उपप्राचार्य डॉ. सुभाष रणधीर, डॉ. विजय निकम ज्यु. विभागाचे उपप्राचार्य प्रा. रामभाऊ गमे, रजिस्ट्रार  सुनील ठोंबरे, अधीक्षक  सुनील गोसावी आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा