कोपरगांव पिपल्स को-ऑप बॅकेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने संपन्न

कोपरगांव प्रतिनिधी
नगर जिल्हयातील अग्रगण्य व  नावाजलेली  कोपरगांव पिपल्स को-ऑप बॅकेची 73 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने गुरुवार दि. 30. रोजी बॅकेचे अध्यक्ष  सत्येन  मुंदडा यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बॅकेचे असि. जनरल मॅनेजर  जे.पी.छाजेड यांनी सभेतील विषय पत्रिकेनुसार वाचन केले व प्रत्येक विषयानुसार सविस्तर चर्चा होउन सर्व ठरावांना मंजूरी मिळाली व सर्व ठराव बहुमताने मंजूर झाले.
 अध्यक्ष  सत्येन मुंदडा यांनी आपल्या भाषणात बॅकेचे आर्थिक स्थीतीची माहिती देतांना कोविड महामारीच्या काळात बॅकेच्या  संचालक मंडळाच्या धोरणात्मक निर्णयानुसार बॅकेच्या आर्थिक स्थैर्यात विशेषता  रिझर्व्ह बॅक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक मापदंडाप्रमाणे आर्थिक निकषांत भर घालुन बॅकेची आर्थिक स्थिती अधिक सुदृढ व निकोप वाढविलेली आहे याची माहिती देत आगामी काळातील बॅकेची वाटचाल व काही नवनविन सेवा देणार आहेत यांची सविस्तर माहिती दिली बॅकेने  मोबाईल बॅंकींग व नेट बॅंकींग सुरु करण्याकरिता रिझर्व्ह बॅकेकडे प्रस्ताव पाठविलेला असुन त्यांचे मंजूरीनंतर सदरची सुविधा चालु करीत आहोत तसेच अत्याधुनिक सेवा देण्याकरीता पुर्णता सुरक्षित उत्तम साॅफटवेअर प्रणाली घेतली असुन त्याचा  ग्राहकांना बॅंकींग सेवा देण्यासाठी उपयोग होणार आहे. बॅंकेने विविध प्रकारची एसएमएस सुविधा तसेच सर्व खातेदारांना मोबाईलवर आपल्या खात्याची माहिती देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे याचा लाभ घेण्यासाठी सर्व खातेदारांनी बॅंकेकडे आपला मोबाईल नंबर नोंदवावा असे आवाहन मुंदडा यांनी केले.  बॅकेवर असलेला सभासदांचा व ग्राहकांचा विश्वास व त्यांचे सहकार्यामुळे बॅक प्रगतीकडे वाटचाल करीत असुन नुकतेच झालेल्या लेखापरीक्षणात बॅकेस अ वर्ग मिळाल्याबदद्ल समाधान व्यक्त केले व सभासदांना 15 टक्के लाभांश जाहिर करण्यात आला. यावेळी बॅकेचे सभासद रवींद्र बोरावके यांनी बॅकेचे जळीत घटनेस 27 वर्ष पुर्ण झाले असुन जळीत घटना घडल्यानंतरही तात्काळ उभारी घेउन ग्राहकांना सेवा देणारी बॅक निश्चीतच भारतात प्रथम असेल व दिड वर्षापासुन कोविड महामारीमुळे व्यवसायावर परिणाम झालेला असतांनाही बॅकेने उज्वल प्रगती केल्याबद्द्ल अभिनंदन केले. यानंतर सभासद  केशवराव भंवर यांनी सध्याचे कोविड वातावरणामध्ये ज्या सभासदांचे या महामारीत निधन झाले त्यांचे कुटुंबीयांना बॅकेचे वतीने त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी असे सुचविले.  सभासद  सुधिर बज यांनीही चर्चेत भाग घेतला. सभासदांचे प्रश्नावर  जनरल मॅनेजर   दिपक एकबोटे यांनी समर्पक उत्तरे दिली. बॅकेचे सभासद डाॅ. एकनाथ गोंदकर,  अविनाश दंडवते,  महेंद्र शेळके यांची  साईबाबा संस्थान, शिर्डीचे विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.   
याप्रसंगी बॅकेचे संचालक कैलासचंद ठोळे, डाॅ. विजय कोठारी, सुनिल कंगले, रविंद्र लोहाडे, धरमचंद बागरेचा, कल्पेश शहा, अतुल काले, राजेंद्र शिंगी, सुनिल बंब, वसंतराव आव्हाड, यशवंत आबनावे, हेमंत बोरावके, रविंद्र ठोळे,  सेवक संचालक विरेश पैठणकर, विठ्ठल रोठे उपस्थित होते. शेवटी अध्यक्ष सत्येन मुंदडा यांनी सर्व सभासदांचे तसेच ऑनलाईन मिटींग करीता सेवा देणारे  नितीन बागरेचा यांची सर्व टीम तसेच आय.टी. विभागातील मुख्य सिनिअर ऑफीसर  चंद्रशेखर व्यास, त्यांचे सहकारी  गणेश काळे यांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा