बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र शासन देशातील सहकार व शेतकरी जगविण्यांचा अटोकाट प्रयत्न करत असताना राज्य शासन येथील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून परराज्यातील शेतकऱ्यांबद्दल कळवळा दाखवत आहे अशी टिका संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केली. राज्य शासनाने सहकारी साखर कारखानदारी टिकविण्यासाठी सहवीज निर्मीती करारास १० वर्षाची मुदतवाढ देऊन वीज खरीदिच्या दरात प्रतीयुनीट दीड ते दोन रुपयांची वाढ करावी, संजीवनी ऊस भावात जिल्ह्यात मागे राहणार नाही असे ते म्हणाले. विजयादशमीनिमित्त कोपरगाव मतदार संघातील सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
सहकार महर्षि शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांच्या ५९ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ शुक्रवारी विजयादशमीच्या मुहुर्तावर माजीमंत्री शंकरराव कोल्हे, बिपीनदादा यांच्या प्रमुख उपस्थीतीत, संचालक सोपानराव पानगव्हाणे, सौ. कुसुमताई पानगव्हाणे या उभयतांच्या हस्ते पार पडला त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी उपस्थीताचे स्वागत केले. कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविक केले.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे, त्र्यंबकराव सरोदे, संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीनराव कोल्हे, रिपाईचे दिपक गायकवाड, प्रदेश भाजपाचे विधीज्ञ रविंद्र बोरावके, जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष शरद थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम, विक्रम पाचोरे, सर्व खाते प्रमुख, उपखातेप्रमुख कामगार ,ऊस उत्पाक सभासद शेतकरी, साईनाथ रोहमारे, बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे, शेतकरी सहकारी संघाचे उपाध्यक्ष विलास कुलकर्णी, विश्वासराव महाले, संचालक अरुण येवले, प्रदिप नवले, मनेष गाडे, साहेबराव कदम, बाळासाहेब नरोडे, राजेंद्र कोळपे, संजय होन, विलासराव वाबळे, ज्ञानेश्वर परजने, फकिरराव बोरनारे, पांडुरंग शास्त्री शिंदे, शिवाजीराव बाराहाते, त्र्यंबकराव परजणे, भास्करराव भिंगारे, मच्छिंद्र लोणारी, कामगारनेते मनोहर शिंदे, वेनुनाथ बोळीज, माजी सभापती सुनिल देवकर, दगुराव चौधरी, जयराम गडाख, कैलास माळी, रमेश औताडे, आदि उपस्थीत होते.
श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, संजीवनीला संघर्ष नवीन नाही, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे कारखान्याने आधुनिक तंत्रज्ञानाने गाळप क्षमतेत वाढ करून बॉयलरचे नुतनीकरण करत सहकाराला खाजगीकरणांच्या स्पर्धेत सज्ज ठेवत सातत्याने नाविन्यतेचा ध्यास घेतला आहे.
राज्यातील महायुतीचे शासन शेतकऱ्यांना सापत्नवागणूक देत आहे, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचा कळवळा दाखवून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. आज स्पर्धा वाढत आहे. बाझीलमध्ये दुष्काळ असल्याने भारतातील साखर उद्योगाला उज्वल भक्तिव्य आहे. इथेनॉल पेट्रोलमध्ये मिश्रण करून सहकाराला आर्थिक स्थैर्याकडे यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहकार मंत्री अमित शहा, तत्कालीन पेट्रोलियममंत्री राम नाईक, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी काम करत आहे, तर राज्य शासन साखर उद्योगाला मदत करताना दिसत नाही, त्यासाठी ठोस पावले उचलून जादा साखर उत्पादन होणार असल्यांने त्या दृष्टीने पावले उचलावी. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर उद्योगाच्या स्थैर्याला दिशा देण्याचे काम केले आहे, आज कोळशा अभावी वीजेचे संकट आहे, जे सहकारी साखर कारखाने सहवीज निर्मीतीकरत आहे त्यांचे करार मुदत संपली आहे ती आणखी १० वर्षाची करावी, सहवीज निर्मीती युनिटचे दर दीड ते दोन रुपयांनी वाढवावे. मागील हंगामात ६० लाख टन साखर निर्यात झाली. आताही साखर निर्यातीला वाढीव अनुदान द्यावे म्हणजे त्याचा फायदा उस उत्पादक सभासदांना होईल पूर्वी परचेस टॅक्समधील काही रक्कम साखर कारखान्यांना मिळत होती आता ती मिळत नसल्याने कार्यक्षेत्रात सुविधा ता येत नाही. शेवटी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment