श्रींच्‍या पुण्‍यतिथी उत्सवास आज उत्साही वातावरणात सुरुवात


शिर्डी –

          श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने आयोजित केलेल्‍या १०३ वा श्रींच्‍या पुण्‍यतिथी उत्सवास आज उत्साही वातावरणात सुरुवात झालीउत्‍सवानिमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्‍यात आली.

उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी पहाटे ०४.३० वाजता श्रीं ची काकड आरती झाली. त्‍यानंतर पहाटे ०५.०० वाजता श्री साईबाबांच्‍या प्रतीमेची व श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्‍यात आली. या मिरवणूकीत संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी पोथीउप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी वीणा आणि मुख्‍यलेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी बाबासाहेब शिंदे व प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे यांनी प्रतिमा धरुन सहभाग नोंदवला. मिरवणूक व्‍दारकामाई मंदिरात आल्‍यानंतर श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाच्‍या अखंड पारायणास प्रारंभ झाला. मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी प्रथमउप कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी व्दितियप्रशासकीय अधिकारी दिलीप उगले यांनी तृतिय व वैद्यकीय संचालक डॉ.प्रितम वडगावे यांनी चौथ्‍या अध्‍यायाचे वाचन केले.

सकाळी ०६.०० वाजता समाधी मंदिरात संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांच्‍या हस्‍ते श्रींची पाद्यपुजा करण्‍यात आली. दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती झालीदुपारी ०४.०० वाजता किर्तन झाले तर सायंकाळी ०६.१५ वाजता धुपारती झाली. रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती झाली. तर रात्रभर श्री साईसच्‍चरित अखंड पारायण व्‍दारकामाई मंदिरात सुरु होते.

उद्या उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी शुक्रवारदिनांक १५ ऑक्‍टोबर रोजी पहाटे ०४.३० वाजता श्रींची काकड आरतीपहाटे ०५.०० वाजता अखंड पारायण समाप्‍तीश्रींच्‍या फोटोची व पोथीची मिरवणूकपहाटे ०५.१५ वाजता श्रींचे मंगल स्‍नानसकाळी ०६.०० वाजता श्रींची पाद्यपूजासकाळी ०८.३० वाजता लेंडीबागेत शताब्‍दी ध्‍वजारोहण कार्यक्रम होईल. सकाळी ०९ ते ११.०० वाजता भिक्षा झोळी कार्यक्रमसकाळी १०.०० वाजता कीर्तनाचा कार्यक्रम तसेच सकाळी १०.३० वाजता श्रींचे समाधी समोर आराधना विधीचा कार्यक्रम होईल. दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती तर सायंकाळी ०५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्‍लंघन कार्यक्रमसायंकाळी ०६.१५ वाजता धुपारती होईल. तर रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होईल.

तसेच श्रींचा पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी रुढी परंपरेनुसार भिक्षाझोळीचा कार्यक्रम होत असतो. त्‍याअनुषंगाने उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी आयोजित करण्‍यात येणा-या भिक्षाझोळीकरीता गांवकरी व साईभक्‍तांकडून भिक्षा स्विकारण्‍याकामी मंदिर परिसरातील गेट नंबर ०४पिंपळवाडी रोड गेट नंबर ०२चावडी समोरनाट्यगृहा शेजारी तसेच साईनगर मैदान येथे काऊंटर्सची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार आहे. तरी गांवकरी व साईभक्‍तांनी भिक्षाझोळीत दान भिक्षा देतांना मास्‍कचा वापर करावा व सामाजिक अंतरासंदर्भातील नियमांचे पालन करुन भिक्षाझोळी काऊंटरवर दान भिक्षा जमा करावी.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा