Posts

Showing posts from October, 2021

पोस्टल संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी श्री संतोष यादव यांची निवड

Image
पोस्टल संघटनेचे नूतन राज्य उपाध्यक्ष श्री संतोष यादव यांचा सत्कार करताना श्री आर एच गुप्ता,श्री संदीप कोकाटे,श्री कमलेश मिरगणे, महादेव गोपालघरे,आनंद गवळी अहमदनगर: नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज ग्रुप सी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी अहमदनगरचे संतोष यादव यांची धुळे येथे संपन्न झालेल्या  राज्यकार्यकारणी सभेत निवड सर्वानुमते निवड करण्यात आली. संघटनेची तीन दिवसीय राज्य कार्यकारणी सभा संपन्न होत असून या सभेस राज्यभरातून पदाधिकारी आलेले असून या सभेत टपाल कर्मचाराच्या विविध प्रश्नांवर सविस्तरपणे चर्चा होत आहे. श्री संतोष यादव यांच्या निवडीबदल त्याचे मा श्री रामभजन गुप्ता मुंबई,श्री महादेव गोपालघरे मुंबई,श्री संदीप कोकाटे,श्री कमलेश मिरगणे श्री कालुराम पारखी,श्री चंद्रकांत चांदरे पुणे,श्री आनंद गवळी कोल्हापूर,श्री संतोष कदम  ठाणे,श्री महेश पल्लेवाड सोलापूर,श्री बालाजी राखिले रत्नागिरी,श्री महेश कौठकर यांचेसह राजभरातील आलेल्या पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ४६ विद्यार्थ्यांची इपिटोम मध्ये निवड- श्री अमित कोल्हे..... एका पाठोपाठ नामांकित कंपन्या करीत आहे संजीवनीच्या विद्यार्थ्यांची निवड

Image
कोपरगांव: संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट डिपार्टमेंटच्या प्रयत्नाने इपिटोम काॅम्पोनंटस् प्रा. लिमिटेड या बहुराष्ट्रीय  कंपनीने संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या २०२०-२१  या शैक्षणिक वर्षाच्या  अंतिम सत्रातील  इंजिनिअरींगच्या विविध विद्या शाखांमधिल ४६ विद्यार्थ्यांची  नोकरीसाठी निवड केली आहे. अनेक नामांकित कंपन्या संजीवनीच्या विद्यार्थ्यांची  एका पाठोपाठ निवड करीत असल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये  आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ  इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजने विभाग निहाय उद्योग जगताला अभिप्रेत असणारे कौशल्ये व आधुनिक तंत्रज्ञान अवगत असणारे अभियंते तयार करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे  जास्तीत जास्त विद्यार्थी नामांकित कंपन्यांच्या कसोटींच्या कक्षा पुर्ण करीत आहे.     अलिकडेच इपिटोम या कंपनीने निवड केलेल्या विद्यार्थ्यांची  यादी जाहिर केली आहे. यात निलेश  ज्ञानेश्वर  पुंड, शुभम दत्तात्रय खर्जुले, प्रगत

कोपरगांव तालुक्यासाठी मंजूर झालेला निधी तुटपुंजा व शेतकऱ्यांची निराशा करणारा - परजणे

मागील जून ते ऑक्टोंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील खरीप पिकांचे व फळबागांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झालेले असताना कोपरगांव तालुक्यासाठी केवळ ५० लाख ४२ हजाराचा निधी उपलब्ध झाल्याचे समजते, हा निधी अतिशय तुटपुंजा असून ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांची घोर निराशा करणारा आहे. पीक नुकसानीच्या वस्तुनिष्ठ परिस्थितीची फेर पडताळणी करुन शासनाने निधी वाढवून द्यावा अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी केली. श्री परजणे यांनी यासंदर्भात  तहसीलदार विजय बोरुडे यांना दिलेल्या निवेदनातून तालुक्यातील शेती पिकांच्या नुकसानीबाबतची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येऊन निधी उपलब्ध झाला असल्याचे शासकीय यंत्रणा सांगते परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात अद्याप काहीच पडले नाही. त्यातच रविवारी ( १७ ऑक्टोंबर ) कोपरगांव तालुक्याला परतीच्या पावसाने पुन्हा झोडपल्याने शेतकऱ्यांच्या हातातून होते नव्हते ते सर्व गेले आहे. शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून शासनाने पुन्हा पंचनामे करण्यात वेळ घालवण्यापेक्षा शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देणेच

एस. एस. जी. एम. महाविद्यालयातील क्रीडा संचालक प्रा. सुभाष देशमुख यांना दोन सुवर्ण पदके प्राप्त....

Image
सुभाष देशमुख यांनी औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मास्टर कँटेगिरीमध्ये ९३ किलो वजन गटात क्लासिक व इक्विप्ड  या दोन्ही प्रकारात दोन सुवर्ण पदक पटकावली आहेत.( छाया मयूर फीचर्स कोपरगाव ) कोपरगाव प्रतिनिधी  येथील श्री सदगुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस् अॅण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेजमधील क्रीडा संचालक प्रा.सुभाष देशमुख यांनी औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मास्टर कँटेगिरीमध्ये ९३ किलो वजन गटात क्लासिक व इक्विप्ड  या दोन्ही प्रकारात दोन सुवर्ण पदक पटकावली आहेत. नोव्हेंबर २०२१ मध्ये गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी त्यांची महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग संघात निवड झाली आहे.  प्रा. सुभाष देशमुख यांच्या यशस्वी कामगिरीने महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली आहे.त्यांची ही कामगिरी महाविद्यालयाच्या दृष्टीने भूषणावह असून सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.               त्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अॅड. भगीरथ शिंदे, महाविद्यालय विकास समिती सदस्य  बिपिन कोल्ह

श्री पुण्‍यतिथी उत्‍सवाची सांगता

Image
शिर्डी  :-            श्री   साईबाबा   संस्थान   विश्वस्तव्यवस्था ,  शिर्डीच्या   वतीने   दिनांक  १४ ऑक्‍टोबर पासून सुरु असलेल्‍या श्रींची पुण्‍यतिथी उत्‍सवाची सांगता आज  काल्याच्या   कीर्तनानंतर दहीहंडी फोडून झाली. आज उत्‍सवाच्‍या सांगता दिनी पहाटे ०४.३० वाजता काकड आरती ,  त्‍यानंतर पहाटे ०५.०५ वाजता श्रींचे मंगल स्‍नान व शिर्डी माझे पंढरपूर ही आरती झाली. सकाळी ०६.०० वाजता संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत व त्‍यांचे पती संजय धिवरे   सहआयुक्‍त प्राप्तिकर विभाग ,  नाशिक यांच्‍या हस्‍ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा व गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा करण्‍यात आली. सकाळी १०.०० वाजता मंदिर पुजारी उल्‍हास वाळुंजकर यांचे गोपाळ काल्‍याचे कीर्तन झाले. काल्‍याच्‍या कीर्तनानंतर समाधी मंदिरात उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे व सहआयुक्‍त प्राप्तिकर विभाग ,  नाशिक संजय धिवरे यांच्‍या हस्‍ते दहीहंडी फोडण्‍यात आली. यावेळी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत ,  प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे ,  संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी ,  मंदिर प्रम

श्रींच्‍या पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी रुढी परंपरेनुसार आयोजित करण्‍यात आलेला प्रतिकात्‍मक भिक्षा झोळी कार्यक्रम पार पडला

Image
शिर्डी – श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था ,  शिर्डी च्‍या वतीने आयोजित केलेल्‍या १०३ वा श्रींच्‍या पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी  रुढी परंपरेनुसार आयोजित करण्‍यात आलेला प्रतिकात्‍मक भिक्षा झोळी कार्यक्रम पार पडला. उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी पहाटे ०४.३० वाजता श्रींची काकड आरती झाल्‍यानंतर श्री साईसच्‍चरित्र या पवित्र ग्रंथाच्‍या अखंड पारायणाची समाप्‍ती झाली. पारायण समाप्‍तीनंतर श्री साईबाबांच्‍या प्रतिमेची व श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्‍यात आली. या मिरवणूकीत जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश तथा  संस्थानचे तदर्थ समिती ,  अध्‍यक्ष सुधाकर वेंकटेश्‍वरराव यार्लगड्डा  व उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी प्रतिमा ,  अप्‍पर महसुल विभागीय आयुक्‍त ,  नाशिक तथा संस्‍थान तदर्थ समिती सदस्‍य भानुदास पालवे यांनी वीणा आणि संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी पोथी घेवुन सहभाग नोंदवला.  यावेळी सौ.मालती यार्लगड्डा ,  सौ.सुनिता  पालवे ,  सौ.वैशाली ठाकरे ,    सरंक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी ,  मंदिर प्रमुख रमेश चौधरी व मंदिर पुजारी उपस्

बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ

Image
सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे कारखान्यांच्या ५९ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदियन समारंभ संचालक सोपानराव पानगव्हाणे, कुसुम पानगव्हाणे, अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते शुक्रवारी झाला त्याप्रसंगीचे छायाचित्र. (छाया- राहुल फोटो, कोपरगांव) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र शासन देशातील सहकार व शेतकरी जगविण्यांचा अटोकाट प्रयत्न करत असताना राज्य शासन येथील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून परराज्यातील शेतकऱ्यांबद्दल कळवळा दाखवत आहे अशी टिका संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केली. राज्य शासनाने सहकारी साखर कारखानदारी टिकविण्यासाठी सहवीज निर्मीती करारास १० वर्षाची मुदतवाढ देऊन वीज खरीदिच्या दरात प्रतीयुनीट दीड ते दोन रुपयांची वाढ करावी, संजीवनी ऊस भावात जिल्ह्यात मागे राहणार नाही असे ते म्हणाले. विजयादशमीनिमित्त कोपरगाव मतदार संघातील सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.            सहकार महर्षि शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांच्या ५९  व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ शुक्रवारी विजयादशमीच्या मुहुर्तावर माजीमंत्री शंकरराव कोल्हे, बिपीनदादा यांच्या प्रमुख उपस्थीतीत, संच

श्रींच्‍या पुण्‍यतिथी उत्सवास आज उत्साही वातावरणात सुरुवात

Image
शिर्डी –           श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने आयोजित केलेल्‍या १०३ वा श्रींच्‍या पुण्‍यतिथी  उत्सवास   आज   उत्साही   वातावरणात   सुरुवात   झाली .  उत्‍सवानिमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई व फुलांची सजावट  करण्‍यात आली. उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी पहाटे ०४.३० वाजता श्रीं ची काकड आरती झाली. त्‍यानंतर पहाटे ०५.०० वाजता श्री साईबाबांच्‍या प्रतीमेची व श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्‍यात आली. या मिरवणूकीत संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी पोथी ,  उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी वीणा आणि मुख्‍यलेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी बाबासाहेब शिंदे व प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे यांनी प्रतिमा धरुन सहभाग नोंदवला. मिरवणूक व्‍दारकामाई मंदिरात आल्‍यानंतर श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाच्‍या अखंड पारायणास प्रारंभ झाला. मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी प्रथम ,  उप कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी व्दितिय ,  प्रशासकीय अधिकारी दिलीप उगले यांनी तृतिय व वैद्यकीय

तिकीट संग्रह हा छंदांचा राजा- भिंगारवाला

Image
तिकीट प्रदर्शनाचे उद्घाटन करताना प्रसिद्ध तिकीट संग्राहक गिरीधरलाल भिंगारवाला. सोबत संदीप हदगल, संतोष यादव, महेश तामटे, सचिन डागा, अब्दुल शेख आदी. अहमदनगर: "तिकीट संग्रह" हा छंदांचा राजा व राजांचा छंद असून हा छंद जोपासण्यासाठी वैयक्तिक आवड व प्रचंड इच्छाशक्तीची गरज आहे असे प्रतिपादन येथील प्रसिद्ध टपाल तिकीट  संग्राहक गिरीधरलाल भिंगारवाला (झंवर) यांनी केले. अहमदनगर प्रधान डाक घर येथे राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त विविध ऐतिहासिक व दुर्मिळ टपाल तिकिटे व पाकिटांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते, त्यावेळी उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 9 ऑक्‍टोबर ते 15 ऑक्टोबर हा आठवडा दरवर्षी भारतीय टपाल खात्यामार्फत राष्ट्रीय टपाल सप्ताह म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला जातो. यावर्षी 13 ऑक्टोबर हा दिवस टपाल तिकीट संग्रह दिवस म्हणून साजरा केला गेला. त्यानिमित्ताने अहमदनगर प्रधान डाक घर येथे नागरिकांसाठी खुल्या स्वरूपात भव्य टपाल तिकीट प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यावेळी विविध टपाल तिकीट संग्राहक यांनी संग्रह केलेली टपाल तिकिटे व पाकिटे यांचे प्रदर्शन भरवले होते. या तिकीट प्रदर्शनाचे उद्घाटन गिरीधरला

चिमुकल्यांनी मारला पोस्ट ऑफीसचा ऑनलाइन फेरफटका

Image
विश्व व राष्ट्रीय डाक दिनाचे औचित्य साधत स्पर्श सेवाभावी संस्था संचलित ऑर्किड प्रि स्कूल च्या विद्यार्थ्यांना केडगाव पोस्ट ऑफीसचा ऑनलाइन पद्धतीने   फेरफटका व विस्तृत माहिती श्री. संतोष यादव साहेब यांनी दिली तसेच पालकांना पोस्ट ऑफिस मधील विविध बचत योजना याविषयी अवगत करण्यात आले सुकन्या योजनेत  सहभाग घेऊन मुलींचे पुढील आयुष्य आर्थिक दृष्ट्या सुखकर कसे करता येईल याविषयी देखील पालकांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले   मा. श्री . संतोष यादव साहेब सब पोस्ट मास्तर अहमदनगर  एस ओ  केडगाव यांनी प्रि स्कूल मधील मुलांना ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करताना पोस्टकार्ड संकल्पना, अंतर्देशीय पत्र संकल्पना व त्याचे महत्त्व तसेच त्याचे होणारे दळणवळण व व्याप्ती याविषयी प्रत्यक्ष पोस्टकार्ड व अंतर्देशीय पत्र दाखवून अवगत केले याच प्रसंगी शाळेच्या शिक्षिका दिपाली भोसले व अमरीन सय्यद  यांच्या मार्गदर्शनाखाली  या प्रसंगी पत्र पेटीची प्रतिकृती सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने उत्साही वातावरणात बनवली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका   श्रीम . दिपाली सखाहरी भोसले व सौ अमरीन अझहर सय्यद यांनी केले  तसेच श्री. प्

११ हजार साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाचा लाभ घेतला.

Image
शिर्डी - राज्‍य शासनाच्‍या आदेशाने आज दिनांक ०७ ऑक्‍टोबर पासून पहाटेच्‍या काकड आरतीनंतर श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्‍यात आले असून दिवसभरात सुमारे ११ हजार साईभक्‍तांनी सामाजिक अंतराचे पालन करुन श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाचा लाभ घेतला असल्‍याची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्‍यश्री बानायत यांनी दिली. श्रीमती बानायत म्‍हणाल्‍या ,  जगभरात ,   देश व राज्‍यात आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या   संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आले असून दिनांक ०५ एप्रिल २०२१ पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले होते . दिनांक २४ सप्‍टेंबर २०२१ रोजी राज्‍य शासनाने दिनांक ०७ ऑक्‍टोबर २०२१ पासून घट स्‍थापनाच्‍या मुहुर्तावर महाराष्‍ट्रातील सर्व धार्म‍िकस्‍थळे काही अटी शर्तीवर खुले करण्‍याचे आदेश दिलेले आहेत.  तसेच अजुन कोरोना व्‍हायरसचे सावट संपले नसुन साईभक्‍तांना श्रींचे दर्शन सुलभरित्‍या व्‍हावे याकरीता श्रींच्‍या दर्शन/आरतीचे सर्व पासेस हे ऑनलाईन उपलब्‍ध करण्‍यात आल

अमित देशमुख हे स्वच्छता व पर्यावरण दूत म्हणून सन्मानित

Image
श्री अमित देशमुख यांना स्वच्छता व पर्यावरण दूत म्हणून गौरवित करताना मा सौ सुनंदाताई पवार समवेत मा श्री पोपटरावजी पवार अहमदनगर: भारतीय डाक विभागातील उपविभागीय डाक निरीक्षक कर्जत यापदी  कार्यरत असणारे श्री अमित देशमुख यांना नुकताच कर्जत येथे मा श्री पोपटरावजी पवार हिवरे बाजार व मा सौ सुनंदाताई पवार  यांचे हस्ते स्वच्छता व पर्यावरण दूत म्हणून सन्मानित करण्यात आले.  माझी वसुंधरा 1 अंतर्गत कर्जत नगर पंचायतचा नुकताच राज्यात दुसरा क्रमाक आला. कर्जत मधील सर्व स्वच्छता प्रेमी मित्र दररोज सकाळी एक तास यासाठी काम करतात यामध्ये  श्री अमित देशमुख हे सतत  सहभागी होत असतात.या सर्व स्वच्छता  दूताचा गौरव सौ मनिषाताई सचिन सोनमाळी नगरसेविका कर्जत नगरपंचायत यांनी आयोजित केला होता. यावेळी उपविभागीय अधिकारी मा डॉ श्री अजितजी थोरबोले हे उपस्थित होते.  या कार्यक्रमात श्री अमित देशमुख यांना स्वच्छता व पर्यावरण दूत म्हणून गौरवविण्यात आले त्या बदल त्याचे टपाल कर्मचारी संघटनेचे नेते श्री संतोष यादव,श्री रावसाहेब चौधरी,श्री अशोक बंडगर,श्री चंद्रकांत नेटके यांचे टपाल कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

के. जे. सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यू

कोपरगाव प्रतिनिधी          येथील के. जे. सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि एन. आय. आय. टी. मुंबई  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आय. सी.आय.सी. आय  या बँकेसाठी घेतलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये महाविद्यालयाच्या एकूण ११ विद्यार्थी-विद्यार्थिनींची निवड झाली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी दिली.          प्राचार्य यादव  म्हणाले की, " महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल अंतर्गत सोमवार , दिनांक २७ व २८ सप्टेंबर रोजी या कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी दिलेल्या पूर्वसूचनेनुसार ४४ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी ११ विद्यार्थ्यांची आय. सी.आय.सी. आय बँकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुलाखातींद्वारे अंतिम निवड केली. एन. आय. आय. टी. तर्फे  शिवम सिंग, पायल वलेसरा व  सागर गीत या  अधिकाऱ्यांनी मुलाखाती घेतल्या. "महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल अंतर्गत वर्षभर विविध कंपन्यांच्या सहकार्याने कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात येत असते.  यापूर्वीही अनेक विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्या

के. जे. सोमैया महाविद्यालय, व कोलंबिया मधील रीओनिग्रा दरम्यान ऑनलाईन आंतरराष्ट्रीय कार्यक्रम

कोपरगाव प्रतिनिधी             के. जे. सोमैया महाविद्यालय,  व कोलंबिया मधील अँटिओक्विया राज्यातील सेना (राष्ट्रीय शिक्षण सेवा संस्था), रीओनिग्रा दरम्यान ऑनलाईन आंतरराष्ट्रीय  कार्यक्रमाचे आयोजन केले होते. "आंतरराष्ट्रीय आंतरसंस्कृती संवाद विनिमय कार्यक्रम" असा विषय होता. "सोमैया महाविद्यालयाच्या वतीने या कार्यक्रमाचे संयोजक व नियंत्रक म्हणून  समन्वयक प्रा. रवींद्र जाधव यांनी व सेना ( (राष्ट्रीय शिक्षण सेवा संस्था  रीओनिग्रा,  कोलंबियाच्या वतीने सँड्रा लिलियाना गोंझालेझ यांनी काम पहिले व महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन सतत करत असते व भविष्यात देखील अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल" अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी .एस .यादव यांनी दिली.        "या कार्यक्रमाचा उद्देश हा इतर देशांची संस्कृती समजून घेणे व त्या देशाला आपल्या देशाची संस्कृती सादर करणे व विद्यार्थ्यांची अंतर्गत गुणवत्ता वाढविणे हा आहे" अशी माहिती महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे प्रमुख प्रा. विजय ठाणगे यांनी दिली."या कार्यक्रमात  महाविद्यालयाच्या ५

कोपरगांव पिपल्स को-ऑप बॅकेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने संपन्न

कोपरगांव प्रतिनिधी नगर जिल्हयातील अग्रगण्य व  नावाजलेली  कोपरगांव पिपल्स को-ऑप बॅकेची 73 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने गुरुवार दि. 30. रोजी बॅकेचे अध्यक्ष  सत्येन  मुंदडा यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बॅकेचे असि. जनरल मॅनेजर  जे.पी.छाजेड यांनी सभेतील विषय पत्रिकेनुसार वाचन केले व प्रत्येक विषयानुसार सविस्तर चर्चा होउन सर्व ठरावांना मंजूरी मिळाली व सर्व ठराव बहुमताने मंजूर झाले.  अध्यक्ष  सत्येन मुंदडा यांनी आपल्या भाषणात बॅकेचे आर्थिक स्थीतीची माहिती देतांना कोविड महामारीच्या काळात बॅकेच्या  संचालक मंडळाच्या धोरणात्मक निर्णयानुसार बॅकेच्या आर्थिक स्थैर्यात विशेषता  रिझर्व्ह बॅक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक मापदंडाप्रमाणे आर्थिक निकषांत भर घालुन बॅकेची आर्थिक स्थिती अधिक सुदृढ व निकोप वाढविलेली आहे याची माहिती देत आगामी काळातील बॅकेची वाटचाल व काही नवनविन सेवा देणार आहेत यांची सविस्तर माहिती दिली बॅकेने  मोबाईल बॅंकींग व नेट बॅंकींग सुरु करण्याकरिता रिझर्व्ह बॅकेकडे प्रस्ताव पाठविलेला असुन त्यांचे मंजूरीनंतर सदरची सुविधा चालु करीत आहोत तसेच अत्याधुनिक सेवा देण्याकरीता पुर्णता

कोपरगांव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळास मुदतवाढ

राज्यातील महायुतीच्या शासनाने कोविड परिस्थिती लक्षात घेवुन कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळास २३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदवाढ देण्याचे आदेश काढल्याने कोपरगांव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासही मुदतवाढ मिळाली आहे.             शासनाच्या कृषि पणन सहकार विभागाचे कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांनी ३० सप्टेंबर रोजी हा शासन निर्णय काढला असून कृषि उत्पन्न बाजार समिती कमांक ०१२०-प्र क.१९-२०२१ स. ३०.०९.२०२१ रोजीच्या आदेशात ज्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे. ज्यांच्या पंचवार्षीक निवडणुक प्रक्रिया सुरू झाल्या आहेत तसेच कोविड महामारी लक्षात घेवुन महायुती शासनाने राज्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकांना शासन निर्णय २४ जानेवारी २०२० १० जुलै २०२०, २२ जानेवारी २०२१ व २२ एप्रिल २०२१ याप्रमाणे स्थगिती देत संचालक मंडळांना मुदतवाढ दिली. ३० सप्टेंबर रोजी शासनाने पुन्हा अध्यादेश काढून कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ कार्यरत होईपर्यंत किंवा २३ ऑक्टोबर २०२१ पासुन पुढील ३ महिने यापैकी अगोदर जे घडेल तोपर्यंत मुदतवाढ दिली आहे, मात

शहरातील प्रमुख रस्त्यावर कोणत्याही कमान प्रवेशद्वार बांधण्यास परवानगी देऊ नये -कलविंदरसिंग डडियाल

कोपरगाव प्रतिनिधी शहरातील मुख्य रस्त्यालगत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहे त्या स्मारकासमोर रस्त्यावर अनधिकृत, विनापरवाना, बेकायदेशीर, कोणतीही तांत्रिक मंजुरी कोणतीही शासकीय मंजुरी न घेता  कमान उभारणी केली जात असून ती बांधण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी जिल्हाधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक यांच्याकडे कलविनदर डडियाल यांनी केली आहे.         दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले की प्रमुख रस्त्यावर इतर समाजाची कोणतीही तसेच अन्य सामाजिक संघटनांनी महापुरुषांच्या नावाने कमानी तसेच प्रवेशद्वार बांधण्याचे घाट घातले जात आहे.त्यांमुळे असे झाल्यास विविध ठिकाणी  20 ते 25 कमानी बांधण्यात येऊ शकतात. प्रत्येकाला आपली प्रवेशद्वार इतरांपेक्षा मोठी असावी, असे वाटून त्यातून जीवघेणी स्पर्धा तयार होऊन सामाजिक सलोखा व शांतता भंग होण्याचा संभव आहे. याची कृपया गांभीर्याने दखल घ्यावी. तसेच कोणत्याही समाजाला संस्थेला किंवा संघटनेला वरील प्रमुख रस्त्यावर कमान प्रवेशद्वार बांधण्यास परवानगी देऊ नये असे निवेदन  शिवसेना शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, तहसीलदार विजय बोरुडे, प

प्रेमचंद मोरे यांचा संजीवनी उद्योग समुहाचेवतीने सत्कार

Image
अहमदनगर न्यू इंडिया इंशुरन्स कंपनीचे डिव्हीजनल मॅनेजर  प्रेमचंद मोरे यांची पुणे कार्यालयात रिजनल मॅनेजरपदी बढती झाल्याबद्दल त्यांचा संजीवनी उद्योग समुहाचेवतीने गुरुवारी सहकारमहर्षी कोल्हे कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला.             या प्रसंगी कारखान्याचे संचालक सर्वश्री. विवेक कोल्हे, फकीरराव बोरणारे, भास्करराव भिंगारे, ज्ञानेश्वर परजने, निवृत्ती बनकर, साहेबराव कदम,  शिवाजीराव वक्ते, अरूणराव येवले, अशोकराव औताडे,  सोपानराव पानगव्हाणे, संजय होन, विलास वाबळे, मनेश गाडे, संगिता राजेंद्र नरोडे, श्रीमती सोनुबाई दशरथ भाकरे, प्रदीप नवले, राजेंद्र कोळपे, मच्छिंद्र लोणारी, कामगार संचालक वेणुनाथ बोळिज, बी.एम. वक्ते, श्री. शेख आदी उपस्थीत होते. प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरख्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी स्वागत केले; लेखापाल एस.एन. पवार, उपमुख्यलेखापाल प्रविन टेमगर यांनी कारखाना विमाबद्दल माहिती दिली.             श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, विमा संरक्षण काळाची गरज आहे.  न्यु इंडीया इंशुरन्स कंपनीने सहकारी साखर कारखान्यांसाठी सभा

प्रमुख जिल्हा मार्ग ५ रवंदे टाकळी पवार गिरणी रस्त्याच्या साईडपटटया व गटार कामासाठी निधी द्या-स्नेहलता कोल्हे

दळणवळणांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या प्रमुख जिल्हा मार्ग ५ रवंदे,टाकळी, पवार गिरणी, राउत वस्ती ते राज्यमार्ग ६५ पर्यंतच्या कोपरगांव पढेगांव वैजापुर रस्त्याच्या साईडपटटया व गटार कामासाठी तात्काळ निधी मिळावा व या रस्त्यास पडलेले खडडे तातडीने बुजविण्यांत यावे अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी नाशिकचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पी. बी. भोसले, अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता संगमनेर यांच्याकडे केली आहे.             त्या पुढे म्हणाल्या की, या रस्त्याचे काम आपल्या कार्यकाळात पुर्ण झालेले आहे. मात्र पावसाळ्यात त्यास मोठया प्रमाणात खड्डे पडले आहेत परिणामी वाहतुकीची कोंडी होते. या रस्त्याचा वापर वाहनधारकासह पादचारी, दुचाकीस्वार, शेतकरी, महाविद्यालयीन, शाळकरी मुले मुली व तालुक्याच्या तसेच औरंगाबाद, नाशिक जिल्हयाच्या ठिकाणी ये जा करण्यासाठी होत आहे. साईडपटटया व गटारचे काम व्हावे म्हणून या भागातील वाहनधारकांनी आपल्याकडे मागणी केली आहे तेव्हा या रस्त्याचे साईडपटटयाचे व सखल भागात साठणारे पाणी वाहुन जाण्यांसाठी गटार काम बाकी आहे त्यास तातडीने निधी देवु

शासनाने नुकसाग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देऊन आधार द्यावा - परजणे

मागील आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे लाखो हेक्टरवरील खरीप पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. अनेक गांवामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी शिरुन अनेक घरांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे शासन पातळीवरुन तातडीने पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे  यांनी केली.  तहसीलदार विजय बोरुडे यांना दिलेल्या निवेदनातून श्री परजणे  यांनी कोपरगांव तालुक्यात अतिवृष्टी व पुराने झालेल्या नुकसानीची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली.  तालुक्यातील ओढ्या नाल्यावरील छोटे मोठे के. टी. वेअर्स, शेततळी, गांवतळी तसेच शेतातील चर तुडुंब भरुन वाहत आहेत. उभ्या शेतपिकांसह जमिनी पाण्याखाली गेल्याने शिवारे जलमय झाली आहेत. काढणीला आलेले सोयाबीन, मका, कापूस, बाजरी, तूर, उडीद, मूग, भूईमूग पिके वाया गेली आहेत. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने धान्य, कपडे, मुलांची पुस्तके, वह्या अशा संसारोपयोगी साहित्याचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार यामुळे उघड्यावर पडले आहेत. आधारासाठी जागा नसल्याने अनेकांना उघड्यावर पावसात जीवन व्यथीत करण्याची वेळ आली आहे

चार वर्षाचा पाठपुरावा तरी ब्राम्हणगाव शिवारात नळयांचे काम होईना शेतकरी प्रशासनापुढे झाले हतबल

Image
तालुक्यातील ब्राम्हणगांव शिवारात गट नंबर ३६२ व त्याशेजारील अन्य आठ शेतक-यांचे गट नंबर येससांव ब्राम्हणगांव रस्त्याच्या कामामुळे बाधित झाले आहेत, रस्ता कामात ठेकेदाराने पुर्वीच्या नळया काढून टाकल्या परिणामी या सर्व शेतक-यांच्या शेतात पावसाचे पाणी प्रचंड प्रमाणात साठले जाते त्यातुन कोटयावधी रूपये किंमतीच्या पिकांची नासाडी होते याबाबत गेल्या चार वर्षापासुन पाठपुरावा करतो पण सिमेंट नळया काही टाकल्या जात नाही अशी तकार सुभाष शामराव गाडे यांच्यासह अन्य शेतक-यांनी केली आहे, शेतकरी प्रशासनापुढे हतबल झाले आहेत.             गुलाब चकीवादळाच्या प्रभावामुळे २७ सप्टेंबर रोजी मोठया प्रमाणांत अतिवृष्टी झाली आणि पावसाचे प्रचंड पाणी अजुनही शेतात साठलेले आहे त्याचा निचरा होण्यासाठी पर्यायी मार्ग काढुन न दिल्याने हे पाणी आजही साठलेले आहे. काम अत्यंत शुल्लक आहे पण ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि त्यांची यंत्रणा यांना त्याबाबत काहीही घेणेदेणे उरलेले नाही, या परिसरातील शेतकरी मात्र मेटाकुटीला आले आहेत.            यापुर्वी २२ सप्टेंबर २०२० व त्यानंतर चालु पावसाळयात मोठया प्रमाणांत पाउस झाला. शे