जायकवाडीचा उपयुक्त पाणीसाठा ७० टीएमसी धरण ९६ टक्के भरले कोपरगांवात ४ इंच १० मिलिमीटर पावसाची नोंद
कोपरगांव तालुक्याच्या अनेक गावात गुलाब चकीवादळाच्या तडाख्यामुळे सलग दोन दिवस मुसळधार पाउस होवुन नदी नाले ओढे तुडूंब भरून वाहु लागली आहेत. जायकवाडी धरणाची साठवण क्षमता १०० टीएमसी असुन मंगळवारी ते ९६.५५ टीएमसी पाण्याने भरले असुन त्यात ७०.९२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. कोपरगांवात ७५ मिलीमिटर म्हणजेच ३ इंच पाउस पडल्याची नोंद पाटबंधारे खात्याकडे आहे तर जेऊर कुंभारी हवामान केंद्रावर 4 इंच 10 मिलिमीटर म्हणजे 110 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. गोदावरी नदीला नादुर मध्यमेश्वर बघा-यातुन ३५ हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. यंदा समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्याचे संकट टळल्याने गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांच्या जीवात जीव आला आहे. सर्वाधिक पाउस देवगाव परिमंडळात १२५ मिलीमिटर झाला आहे. मंगळवार २८ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसाची आकडेवारी मिलीमिटरमध्ये पुढील प्रमाणे कंसात आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. दारणा (३०) (८९३), गंगापुर (१८४) (२०९४), मुकणे (३८) (९९८), कडवा (१५) (६५३), काश्यपी (९६) (१३५५), भावली (१०६) (३९१०). वालदेवी (१२) (४६८). गौतमी (९०) (१४३२), वाकी (५५) (१५७७), नांदुरमध्यमेश्वर (३५) (३६५), नाशिक (५३) (७१६), त्रंबकेश्वर (९२)(१७७४), घोटी (४७) (१९५०), ईगतपुरी (१०९) (३२००), देवगांव (१२५) (६३०), ब्राम्हणगांव (८४) (६९३), कोपरगांव (७५) (६४३), पढेगांव (१२) (४६८), सोमठाणा (४२) (३६३), कोळगांव (६५) (४७८), सोनेवाडी (५६) (४००), शिर्डी (५९) (५५९). (४२) (४४२), राहाता (३५) (४९६), रांजणगांव खुर्द (५८) (५३१), चितळी तर दारणा धरणात (७१६४), गंगापुर (५६३०), मुकणे (५२९८), कडवा (१६८८), काश्यपी (१८५२), भावली (१४८८). वालदेवी (११३३), गौतमी (१८६४), वाकी (२१५६) दशलक्ष घनफुट याप्रमाणे धरणात पाणीसाठा आहे. चालू वर्षी नाशिक त्रंबकेश्वर परिसरात पाउस जेमतेम आहे परंतु औरंगाबाद क्षेत्रात मुसळधार अतिवृष्टी झाल्याने जायकवाडी धरण पाणलोट क्षेत्रात चांगले पाणी जमा होत आहे. चालु हंगामात पाउस अत्यल्प असल्याने जायकवाडी धरण भरेल की नाही याची शाश्वती नव्हती परंतु निसर्गराजा आणि गुलाब चक्रीवादळ जायकवाडीला पावले आणि ते याही वर्षी तुडूंब भरले आहे. बारमाही गोदावरी कालवे लाभधारक सतत समन्यायी पाणीवाटपाच्या चिंतेत असत पण चालु वर्षी पाणी सोडण्यांची चिंता मिटली आहे. अजुन परतीचा मान्सुन व्हायचा आहे.
Comments
Post a Comment