गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग


कोपरगाव प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसापासून तालुक्यात 55 मिलीमीटर पाऊस (2 इंच पाच मिलिमीटर पाऊस) पडल्याची नोंद जेऊर कुंभारी हवामान केंद्रावर झाली आहे. तर मराठवाड्यातील जायकवाडी धरण 84 टक्के भरले आहे दरम्यान नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून वीस हजार 400  क्यूसेक्स तर गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात तीन हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे अशी माहिती केंद्रीय जल आयोगाचे कोपरगाव केंद्राचे साईड इन्चार्ज संजय पाटील यांनी दिली सद्यस्थितीला गोदावरी नदी पात्राची पाणी पातळी दोन मीटर आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरासह निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील गावांमध्ये संततधार पाऊस फोडत आहे. सततच्या पावसामुळे गोदावरी नदीच्या उपनद्या आणि ओढे नाल्यांना पूर आला आहे. निफाड तालुक्यात असलेल्या नांदूर-मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाणी दाखल होत आहे. या धरणातून पाण्याचा विसर्ग सायंकाळी सहा वाजता वीस हजार चारशे क्यूसेक्स सुरु करण्यात आला. 
गोदावरी नदीपात्रातून जवळपास 35 ते 40 टीएमसी पाणी वाहून गेल्याने जायकवाडी धरण 84 टक्के भरले आहे दुष्काळग्रस्त मराठवाड्याला दिलासा देणारी बातमी आहे. पुढील दोन/ तीन दिवस दुपारी ३ ते सायंकाळी ७ पर्यंत शेतात काम करू नका, प्रशासनाचे शेतकऱ्यांना आवाहन

     पुढील काही दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच या कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हयातील सर्व शेतकरी / नागरिक यांनी खबरदारी घ्यावी. विजांचा कडकडाट सुरु असताना बाहेर जाण्याचे टाळावे. पाऊस सुरू असताना शेतकऱ्यांनी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत शेतीची व इतर कामे करु नये, कारण सदर कालावधीमध्ये विजा पडण्याची शक्यता जास्त असते. दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली  पाण्याच्या स्त्रोताजवळ  विदयुत खांबाजवळ बांधू नयेत त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावीत. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करुन स्वत: सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.( छायाचित्र महेश जोशी कोपरगाव)

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा