काळे गटाला दे धक्का ; वहाडणेंच्या गुगलीवर भाजप सेनेचा षटकार
साई बाबाच्या कृपेने निळवंडे चे टेंडर निघाले निळवंडे चे पाणी कोपरगाव ला आले तर स्नेहलता कोल्हे यांचा पराभव करणे शक्य होणार नाही या दुष्ट हेतूने कोपरगावचे पाणी घालविण्याचे कटकारस्थान झारीतील काही शुक्राचार्यांनी केले,-संजय सातभाई, साई
संस्थान चा अध्यक्ष कोणीही होवो, निळवंडे चे पाणी कोपरगावला यावे यासाठी आम्ही झोळी घेऊन त्यांच्याकडे जाऊ -अतुल काले, नेत्याने रस्त्यावर मुरूम टाकण्यास सांगितले मात्र यांनी समृद्धीच्या डंपरने माती टाकून त्यातही भ्रष्टाचार केला व जनतेची फरफट केली - स्वप्निल निखाडे |
कोपरगाव प्रतिनिधी
येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत वर्चस्व मिळविण्यासाठी सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष यांच्यात शहरातील २८ विकास कामाच्या मुद्द्यावरून संघर्ष टोकाला पोचला आहे.
शहराच्या रस्त्यांची झालेली दुरावस्था व नागरिकांचे होणारे हाल पाहता नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी अचानक घुमजाव करत पत्रकार परिषद घेऊन काल भाजपने उच्च न्यायालयातून २८ विकास कामांना मिळविलेली स्थगिती मागे घ्यावी अशी विनंती केली होती, तितक्याच अचानकपणे पत्रकार परिषद घेऊन भाजपा-सेना नगरसेवकांनी वहाडणे यांची विनंती मान्य करून काळे गटाला दे धक्का देऊन वहाडणे यांच्या गुगलीवर भाजप सेनेने षटकार ठोकला आहे.
गेल्या चार महिन्यांपासून गाजत असलेल्या २८ विकासकामांच्या मुद्द्यावर राजकारण ढवळून निघाले होते यावर काल मंगळवारी १४ रोजी सकाळी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकांचे हाल बघवेना,उच्च न्यायालयातून ते’ स्थगिती आदेश उठवा अशी विनंती केली होती . त्यामुळे कोंडी झालेली भाजप सेना काय व्यूहरचना आखते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते. बुधवारी सकाळी बुधवारी सकाळी भाजपा शहर अध्यक्ष दत्ता काले व शिवसेना गटनेते योगेश बागुल यांनी यासंदर्भात नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली, त्यानंतर दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अमृत संजीवनी चे चेअरमन पराग संधान म्हणाले,वहाडणे यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती उठवण्याची आवाहन केले त्याचे आम्ही सर्व भाजप सेना मित्र पक्ष नगरसेवक स्वागत करतो, शहर विकासाला आमचा पहिल्यापासून वहाडणे यांना पाठिंबा होता आहे. व राहणार आहे,पण मधल्या काळात आमच्यात वितुष्ट कोणामुळे आले हे जनतेला माहीतच आहे आमचा २८ विकास कामातील इतर २२ कामांना आमचा कुठलाही विरोध नव्हता तर त्यातील अनावश्यक खर्च असलेल्या सहाच कामांना विरोध होता, आजही आहे, मात्र त्याही कामातील अनावश्यक खर्च वगळता ही कामे करण्यास आमची काहीच हरकत नाही. तेंव्हा सुद्धा आम्ही हेच सांगितले होते. त्यांनी सांगत आलो आहे. मात्र काळे गटाने मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व अभियंता दिगंबर वाघ यांच्यावर दबाव आणून हा मुद्दा जिल्हाधिकारी यांच्याकडे नेऊन हायलाईट केला . जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून फटाके वाजवून व पेढे वाटले ठेकेदारांना ऑर्डर दिल्या जल्लोषात कामे सुरू केली, त्यामुळेच पर्याय राहिला नसल्याने आम्हाला जनतेचा पैसा वाचविण्यासाठी न्यायालयात जावे लागले असा खुलासा केला. जिल्हाधिकारी कार्यालय असो की उच्च न्यायालय वकील नगरपालिकेचा नाहीतर काळे यांचा असतो याचा अर्थ ही कामे होऊ नयेत, भाजप-सेना नगरसेवकांना बदनाम करण्याच्या हेतू काळे गटाचा यातून दिसून येतो. कारण त्यांचे नगरसेवक खासगीत बोलताना पाच नंबर तळ्याचे गाजर दाखवून मुद्द्यावर विधानसभा निवडणूक पदरात पाडून घेतली तसेच या २८ विकास कामावरच आम्ही येणारी पालिकेची निवडणूक जिंकणार असल्याचा आत्मविश्वास बोलून दाखवतात असा आरोपही त्यांनी केला,२८ विकास कामांचा मुद्दा निवडणुकीपर्यंत लांबविण्याचे काळे गटाचे कट-कारस्थान नगराध्यक्ष विजय वाढणे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी दोन पावले मागे सरकत शहर विकासासाठी ची हाक दिली तेव्हा आम्ही आमचे नेते बिपिन दादा कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या आदेशाने पाच पावले मागे सरकून आज वहाडणे यांच्या आवाहनाचे स्वागत करून सकारात्मक भूमिका घेत असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करून वहाडणे यांच्या गुगलीवर भाजप-सेना नगरसेवकांनी सकारात्मक भूमिका घेत षटकार ठोकल्याने आता विकेट कोणाची पडणार यावर मात्र चर्चा सुरू आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये नगरसेवक स्वप्निल निखाडे, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, राजेंद्र सोनवणे, शिवसेना गटनेते योगेश बागुल, यांनी भाग घेतला. यावेळी भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले, नगरसेवक अतुल काले, शिवाजी खांडेकर, अरिफ कुरेशी, वैभव गिरमे, रवी रोहमारे, विनोद राक्षे आदीसह नगरसेवक हजर होते.
Comments
Post a Comment