कोपरगाव चासनळी सरपंचाच्या पेट्रोल पंपावर बिबट्याचे झाले दर्शन


कोपरगाव प्रतिनिधी

तालुक्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने वेगवेगळ्या ठिकाणी जनावरावर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच बिबट्याने सोमवारी चासनळी परिसरात पुन्हा एकदा दर्शन दिल्याची माहिती पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक प्रवीण पगारे यांनी दिली त्यामुळे परिसरातील नागरिकात व शेतकऱ्यात दहशत पसरली आहे . या भागात पिंजरे लावावेत अशी मागणी होत आहे.

  तालुक्यातील चासनळी येथील सरपंच निळकंठ चांदगुडे यांच्या पेट्रोल पंपावर सोमवारी (२७) रोजी रात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे. बिबट्याने मोठ्या ऐटीत दिमाखदारपणे रॅम्पवॉक करीत १५ ते २० मिनिटं पंपावरील सर्व परिसरात फेरफटका मारला , यावेळी पेट्रोल पंपावर रात्रपाळीसाठी असलेले कर्मचारी विशाल शिंदे होते. त्यांनी समोर बिबट्या पाहताच जीव मुठीत धरून मोठ्या धाडसाने आपल्या मोबाईल मध्ये बिबट्याचे व्हिडिओ शूटिंग केलेल तिकडे पंपावर असलेल्या असलेल्या सीसीटीव्हीकॅमेराने ही बिबट्याचे  मुक्त संचाराचे चित्रण केले . बिबटयाचे दर्शन घडल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. याबाबत माहिती मिळताच मंगळवारी (२८) रोजी सकाळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपास भेट दिली असून, माहिती घेतली आहे, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना खबरदारीच्या उपाययोजना बद्दल माहिती सांगितली. खबरदारीचा उपाय म्हणून गुराख्यांनी एकत्र जनावरे संभाळावीत, तसेच रात्रीच्या वेळी बाहेर फिरणे टाळावे, तसेच जनावरे शेळ्या बंदिस्त ठेवण्याचे आवाहन केले आहे.व परिसरात पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. 

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"