संजीवनीचा गणेश उत्सव नामानिराळा_ बाजीराव सुतार

दक्षिणकाशी गंगा गोदावरीचा तीर, कोपरगावची गुरु शुक्राचार्य भूमी, स्वामी सहजानंदभारती यांची त्यागमय वृत्ती आणि सहकारमहर्षी, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांची उद्योग व्यासंगाची भावना यामुळे संजीवनी कारखाना कार्यस्थळावरील सांस्कृतिक  मंडळाचा गणेशोत्सव 61 व्या वर्षातही नामानिराळा असल्याचे प्रतिपादन कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी केले.
               संजीवनी उद्योग समूह, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने कोरोना नियम पाळून कारखाना कार्यस्थळावर आराध्य दैवत हनुमान मंदिरात गणेशाची प्राणप्रतिष्ठा शुक्रवारी करण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते 
               प्रारंभी उपाध्यक्ष आप्पासाहेब  दवंगे, कामगार नेते मनोहर शिंदे, कामगार संचालक वेणुनाथ बोळीज, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.  व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, सहाय्यक स्थापत्य अभियंता राजेंद्र पाबळे यांनी प्रास्ताविक केले.   कारखान्याचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व तज्ञ संचालक विवेक कोल्हे, भाजपाच्या प्रदेशाची स्नेहलता कोल्हे हे संकट काळात मदतीचा हात घेऊन संकटमोचकाप्रमाणे सर्वांच्या पाठीमागे उभे राहत असल्याचे प्रतिपादन उपमुख्य लेखापाल प्रवीण टेमगर यांनी केले.  
             याप्रसंगी एच. आर. मॅनेजर प्रदिप गुरव, वर्क्स र्मनेजर के.के. शक्य, मुख्य अभियंता विवेक शुक्ला, सचिव तुळशीराम कानवडे, मुख्य लेखापाल एस.एन.पवार, कायदे सल्लागार विधिज्ञ बाळासाहेब देशमुख, किरण  म्हस्के, केन मॅनेजर गोरखनाथ शिंदे, ऊस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर,  डिस्टिलरी मॅनेजर श्री. जंगले, साखर गोडाऊन प्रमुख भास्कर बेलोटे,  कामगार कल्याण अधिकारी एस सी. चिने, प्रवीण गिरमे, सुरक्षा अधिकारी रमेश डांगे, श्री.  वानखेडे, संगणक विभाग प्रमुख रमाकांत मोरे, महेश गायकवाड, चंद्रकांत जाधव, वसंत थोरात, स्वीय सहाय्यक रंगनाथ लोंढे,  आयुब पठाण, बाळासाहेब पानगव्हाणे, आरोग्य विभागाचे परमेश्वर खरात, श्री.  भालेराव, विविध खातेप्रमुख,  उपखाते प्रमुख, कामगार, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
           श्री. बाजीराव सुतार पुढे म्हणाले की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कार्यस्थळावर गणेशोत्सव वैशिष्ट्यपूर्ण आहे, अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे हे कारखाना प्रगतीत सातत्याने पुढाकार घेऊन आवश्यक तेथे सूचना देऊन आधुनिकीकरणात पुढाकार घेत असतात, सभासद शेतकऱ्यांनी ८६०३२ ऊस लागवडीसाठी काय काय उपाय योजना केल्या म्हणजे उत्पादन वाढते याबाबतही मार्गदर्शन देत असतात.  शेवटी प्रख्यात सनईवादक, पुजारी रामकृष्ण गुरव यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"