साईबाबा कॉर्नर ते येवला नाका तालुका हद्य रस्ता दुरुस्त करा

नगर-मनमाड महामार्गावरील कोपरगाव शहरालगत साईबाबा कॉर्नर, येवला नाका ते कोकमठान, टोलनाका तालुका हद्द रस्ता अत्यंत नादुरुस्त झाला असून तो तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी जागतिक बँक प्रकल्प विभाग अहमदनगरचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. यापूर्वी ५ सप्टेंबर रोजी या कामाचा पाठपुरावा केला होता.
          त्यांनी या बाबत पुन्हा नव्याने पत्र लिहून त्यात पुढे म्हटले आहे की, प्रमुख राज्यमार्ग ८ वर कोपरगाव तालुका टोल नाका हद्दीत येणाऱ्या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत व रस्त्याच्या कडेला घळ्या पडलेले आहेत तसेच दुभाजकास पट्टे मारलेले नाही, झेब्रा क्रॉसिंग पट्ट्या इलेक्ट्रिक केटाय बसवलेले नाही, अपघाताचे प्रमाणiत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे प्रवाशांना व नागरिकना जीव गमवावा लागत आहे. रस्त्याला  चढ-उतारामुळे चार चाकी वाहनांचे मशीनला धक्का  लागून मशीन नादुरुस्त होऊन वाहनधारकांच्या खिशाला झळ बसत आहे, या  रस्त्यावर जागतिक कीर्तीचे श्री साईबाबा मंदिर, जंगली महाराज आश्रम, महानुभाव  पंथीय श्रीकृष्ण मंदिर, जनार्दन स्वामी समाधी मंदिर, जगदंबा माता मंदिर, कोपरगाव बेट गुरु शुक्राचार्य, कचेश्र्वर धार्मिक स्थळे आहेत, तेव्हा या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून या रस्त्याचे मजबुतीकरण दुभाजक झेब्रा क्रॉसिंग संदर्भात तात्काळ दुरुस्ती व्हावी अशी मागणी स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"