पोलिसांकडून आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी अवैध धंद्यांना खतपाणी... औताडे.......... सरपंच अमोल औताडे, उपसरपंच प्रशांत रोहमारे सह ग्रामस्थांचे पोहेगांव पोलिस दूरक्षेत्रासमोर उपोषण


कोपरगाव पोहेगाव परिसरातील अवैध धंदे व चोऱ्यामाऱ्या रोखण्यासाठी सातत्याने पोहेगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी प्रयत्न केले आहे.दारूबंदी केली अवैद्य धंदे व चोऱ्यामाऱ्या थांबण्यासाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक विश्वास नागरे यांनी पाठपुरावा केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने 2009 मध्ये पोहेगाव येथे पोलिस दूरक्षेत्र मंजूर केले. ग्रामपंचायतीने विनामूल्य जागा, फर्निचर, वीज उपलब्ध करून दिले तरीदेखील  सातत्याने शिर्डी पोलीस स्टेशन कडून हे दूरक्षेत्र बंद ठेवले जाते.पोलीस दुरक्षेत्र चालू ठेवून अवैध धंदे करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार केले आहे.उपोषण व आंदोलनाची नोटीस पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्या त्या वेळेस दूरक्षेत्र चालू होते मात्र उपोषण आंदोलनचे दिवस संपताच पुन्हा हे दूरक्षेत्र बंद केले जाते ही दुर्दैवी बाब असून शिर्डी पोलीस हे जाणून बुजून करत असल्याचे लक्षात येते. आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठीस अवैध धंद्यांना खतपाणी घालण्याचे काम पोलिसांकडून होत असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते नितीनराव औताडे यांनी केले आहे. ते पोहेगाव येथे पोलीस दूरक्षेत्र सुरु ठेवून अवैद्य धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी सुरू असलेल्या उपोषणकर्ते व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना बोलत होते.  पोहेगाव पोलीस दूरक्षेत्र कायमस्वरूपी चालू ठेवून अवैध धंदे पूर्ण बंद करण्यासाठी सरपंच अमोल औताडे व उपसरपंच प्रशांत रोहमारे यांच्यासह ग्रामस्थ पोहेगांव पोलीस दूरक्षेत्र समोर आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत.
उपोषणाला बसण्यापूर्वी ग्रामस्थांनी पोहेगाव पोलीस दूरक्षेत्राच्या नामफलकाला पुष्पहार अर्पण करून गांधीगिरी केली.यावेळी सरपंच अमोल औताडे, उपसरपंच प्रशांत रोहमारे ,,अशोकराव नवले, दादासाहेब औताडे, तुषार औताडे ,निवृत्ती औताडे ,अशोक औताडे, प्रकाश रोहमारे, सचिन शिंदे,संतोष भालेराव, बाबासाहेब अभंग ,संदीप औताडे ,ज्ञानेश्वर गांगुर्डे ,बाबुराव वाघ, विशाल कांबळे ,अशोक भडांगे,सुनील लोखंडे बाळासाहेब औताडे ,अरुणराव डोके ,प्रमोद भालेराव ,योगेश पानगव्हाणे, रवीदादा औताडे ,वसंत औताडे, सुभाष माळी, संभाजी औताडे, विनायक मुजमुले, दीपक औताडे अदी उपस्थित होते.
किमान दिवस रात्र दहा‌ पोलीस कर्मचारी पोलीस दूरक्षेत्रला देऊन कायमस्वरूपी अवैद्य धंदे बंद करण्याच्या मुद्द्यावर उपोषर्ते ठाम असून शिर्डी पोलीस स्टेशनमे दिलेले लेखी आश्वासनात काही त्रुटी असल्याने पोलीस नाईक अविनाश मकासरे ,पोलीस कॉन्स्टेबल कैलास राठोड, के एक औताडे  यांच्या लेखी आश्वासनाची प्रत परत देत उपोषण कायम ठेवले आहे.शिर्डी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ठोस कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उपोषण कायम राहील असे सरपंच अमोल औताडे यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा