संजीवनी अकॅडमीला ‘एज्युकेशनल एक्सलन्स’ पुरस्कार प्राप्त...... संचालिका सौ.मनाली कोल्हे यांचाही ‘एज्युकेशनल रिफाॅर्मर ऑफ दि यिअर’ पुरस्काराने सन्मान


कोपरगांवः
शैक्षणिक  गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांचा   सर्वांगीण विकास साधल्याबध्दल व विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी राबविलेले उपक्रम पुराव्यांसह सिध्द केल्याबध्दल संजीवनी अकॅडमीला नॅशनल स्कूल अवार्ड या संस्थेने राष्ट्रीय  पातळीवरील ‘एज्युकेशनल एक्सलन्स’ हा पुरस्कार देवुन २०२१ या वर्षातील  सर्वाेत्तम कामगिरीची दखल घेतली तर स्कूलच्या संचालिका सौ. मनाली अमित कोल्हे यांनी स्कूलच्या स्थापनेपासुन शैक्षणिक  क्षेत्रात आणलेल्या अमुलाग्र बदलांबाबत व ग्रामिण विद्यार्थ्यांमधील  गुणवत्ता वाढीबाबतच्या प्रयत्नांबध्दल त्यांना ‘एज्युकेशनल रिफाॅर्मर ऑफ  दि यिअर’ पुरस्काराने सन्मानीत केले, अशी  माहिती स्कूलच्या वतीने देण्यात आली आहे.
माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक अध्यक्ष श्री शंकरराव  कोल्हे यांचे संकल्पनेतुन ग्रामिण विद्यार्थ्यांना  गुणवत्तापूर्वक  व दर्जेदार शिक्षण  देवुन त्यांनी  येणाऱ्या विश्वव्यापक  आव्हानांना सामोरे जावुन यशस्वी जीवन जगावे, या हेतुने २०१२  मध्ये संजीवनी अकॅडमीची स्थापना करण्यात आली. तेव्हा पासुन स्कूलच्या संचालिका सौ. मनाली अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली  नाविन्यपुर्ण व सृजनशील  उपक्रमांमुळे संजीवनी अकॅडमीने देश  व राज्य पातळीवर अनेक किर्तीमान स्थापित केले.
‘एज्युकेशनल एक्सलन्स’ या पुरस्कारासाठी देशातील सुमारे ३५०० शाळांनी सहभाग नोंदविला. यात संजीवनी अकॅडमीने विद्यार्थ्यांच्या  सर्वांगीण प्रगतीसाठी राबविण्यात येणारे उपक्रम तसेच कोरोना महामारीच्या काळात देण्यात आलेले सर्वोत्तम ऑनलाईन शिक्षण  प्रणालीद्वारे दिलेले शिक्षण ,  या बाबतचे सादरीकरण नॅशनल स्कूल अवार्ड या संस्थेकडे सादर केले. या संस्थेने सर्व बाबींची शहानिशा  करून संजीवनी अकॅडमीला  ‘एज्युकेशनल एक्सलन्स’ या पुरस्काराने सन्मानित केले. तर सौ. मनाली कोल्हे राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक  गुणवत्तेबरोबरच इतर क्षेत्रातील त्यांची प्रगती, कोपरगांव सह शेजारील  तालुक्यातही संजीवनी अकॅडमीचे स्थान, इत्यादी बाबींची माहीती नॅशनल स्कूल अवार्ड या संस्थेकडे देण्यात आली. सौ. मनाली कोल्हे यांचे ग्रामिण भागात शैक्षणिक  क्षेत्रात केलेल्या  भरीव कार्याची दखल घेवुन त्यांनाही ‘एज्युकेशनल रिफाॅर्मर ऑफ  दि यिअर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सौ. कोल्हे यांनी पुरस्कारांचे श्रेय विद्यार्थी, पालक व शिक्षकांना दिले आहे.
     संजीवनी  ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक अध्यक्ष श्री शंकरराव व कोल्हे, कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व  विश्वस्त  श्री सुमित कोल्हे यांनी या पुस्कारांबद्धल  समाधान व्यक्त करून सर्वांचेच अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"