के.जे.सोमैया महाविद्यालयात मायक्रोबायोलॉजिस्‍ट विद्यार्थी संघाची स्थापना

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव हे यशस्‍वी विद्यार्थ्‍यांचे अभिनंदन करतांना

कोपरगाव प्रतिनिधी
येथील के.जे.सोमैया वरिष्ठ व के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात मायक्रोबायोलॉजी विभाग, महाविद्यालयाचा  अंतर्गत गुणवत्‍ता हमी कक्ष व मायक्रोबायोलॉजीस्‍ट सोसायटी इंडिया या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आज महाविद्यालयात मायक्रोबायोलॉजिस्‍ट विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. मायक्रोबायोलॉजीस्‍ट सोसायटी इंडिया ही संस्था भारतात विद्यार्थी केंद्रित अनेक उपक्रमाचे आयोजन करत असते. या संस्थेच्या कार्याचा लाभ विद्यार्थ्यांना व्हावा या उद्देशाने या संघाची स्थापना महाविद्यालयात करण्यात आलेली असून आजच्या उद्घाटन सत्राच्या ऑनलाईन कार्यक्रमात डॉ.संजीव पाटणकर, अध्यक्षएमएसआयहाराष्ट्र व गोवा राज्‍य आणि प्रा.नीलिमा पेंढारकर, समन्वयक, एमएसआय. महाराष्ट्र हे उपस्थित होते महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी विभागातील कुशुभांगी निकुंभ व कुमार अखीलेश रूद्रभाटे या दोन विद्यार्थ्यांना विभागामधील नैपून्‍यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल एमएस. आय. यांच्‍या वतीने उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
                पुरस्‍कारप्राप्‍त विद्यार्थ्‍यांचे एम.एस.आय. चे संस्‍थापक मा. डॉ. ए.एम. देशमुख यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एसयादवअंतर्गत गुणवत्‍ता हमी कक्षाचे समन्‍वयक प्रा.व्‍ही.सी.ठाणगेकार्यालयीन अधीक्षक डॉ. अभिजीत नाईकवाडे उपस्थित होतेकार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय मायक्रोबायोलॉजी विभाग प्रमुख प्रा. आकाश पवार यांनी केलेतर आभार प्रा.पूजा गख्खड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रायोगेश चौधरी,  कुमार ऋषिकेश जाधवकुप्रीती अहीरराव यांनी प्रयत्न केले.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा