|
ओबीसी आरक्षणाबाबत महायुती शासनाचा निषेध करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोपरगांव शहर व तालुका भाजपाच्यावतींने तहसिलदार योगेश चंद्रे यांच्यामार्फत ओबीसी आरक्षण कायम रहावे याबाबतचे निवेदन तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी बुधवारी दिले. |
तत्कालीन आघाडी शासनांने इम्पेरिकल डाटा दिला नाही त्यामुळे ओबीसी आरक्षण न्यायालयात टिकले नाही, आताच्या शिवसेना काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस महायुतीच्या शासन व सत्तेतील मंत्री यांना याबाबतचे गांभीर्य नाही, ओबीसी आरक्षणचा मुददा प्रलंबित असतांना धुळे, नंदुरबार, अकोले, वाशिम, पालघर व नागपुर या सहा जिल्हयातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यांत याव्या अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी केली आहे.
ओबीसी आरक्षणाबाबत महायुती शासनाचा निषध करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे नांवे असलेले निवेदनाची प्रत तहसिलदार योगेश चंद्रे यांना बुधवारी देण्यांत आली त्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक राउत, शहराध्यक्ष दत्ता काले, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, जगदिश मोरे, नगरसेवक शिवाजी खांडेकर, वैभव गिरमे, तालुकाध्यक्ष बापूसाहेब रांधवणे, सहकारमहर्षी कोल्हे कारखान्यांचे संचालक प्रदिप नवले, विवेक सोनवणे, संतोश नेरे, चंद्रकांत जाधव आदि उपस्थित होते.
श्री. साहेबराव रोहोम पुढे म्हणांले की, ओबीसींचे राजकीय आरक्षण हा त्यांचा न्याय हक्क असुन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी हे आरक्षण रहावे म्हणून वेळोवेळी भूमिका मांडलेली आहे. राज्यातील महायुती शासनांच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाचा खेळखंडोबा झाला. मागासवर्ग आयोग नेमुनही त्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. ओबीसी आरक्षण प्रलंबित असतांनाही या निवडणुका घेणे म्हणजे ओबीसी समाजबांधवावर अन्याय आहे, हा अन्याय जोपर्यत दुर होत नाही तोपर्यंत या निवडणुकांना स्थगिती देण्यांत यावी असे ते म्हणांले.
Comments
Post a Comment