डॉ. अभिजीत गाढवे यांना प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयाकडून एम. डी. मेडिसिन पदवी


लोणी येथील प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने कोपरगांव येथील डॉ. अभिजीत चंद्रकांत
गाढवे यांना एम. डी. मेडिसिन ( औषध तज्ज्ञ ) ही पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली.

डॉ. अभिजीत गाढवे यांनी कोपरगांव येथील सेवानिकेतन स्कूलमधून दहावीपर्यंतचे
शिक्षण घेतल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण सद्गुरु गंगागिरी महाराज महाविद्यालयातून पूर्ण केले. या दोन्हीही ठिकाणी त्यांनी प्रथम प्राविण्य मिळविलेले आहे. तर मुंबई ( सायन ) येथील
लोकमान्य टिळक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम. बी. बी. एस. शिक्षण पूर्ण केल्यानंतर लोणी येथील प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयात पुढील वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण
केले. त्यातही ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

डॉ. अभिजीत गाढवे यांच्या या यशाबद्ल प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन एअर व्हाईस मार्शल डॉ. राजवीर बलवार यांच्याहस्ते वैद्यकीय क्षेत्रातील महत्वाची समजली जाणारी
एम. डी. मेडिसिन ही पदवी नुकतीच बहाल करण्यात आली. डॉ. अभिजीत गाढवे हे  येथील गोदावरी खोरे नामदेवरावज परजणे तालुका सहकारी दूध संघाचे कार्यकारी
संचालक चंद्रकांत गाढवे यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या या यशाबद्ल माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त व सचिव डॉ. राजेंद्र विखे , खासदार डॉ.
सुजयदादा विखे , जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे , गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे , संचालक राजेंद्र जाधव यांच्यासह
अनेकांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा