गणरायाच्या आगमनाने सगळं पूर्ववत होऊ दे_ विवेक कोल्हे
सर्व विघ्ने दूर करणारा गणराय आहे तेव्हा त्याचे आगमनाने कोरोना महामारीचा नाश होऊन सगळं जनजीवन पूर्ववत होऊ दे आणि तालुक्यातील जनतेला पुन्हा सुख समृद्धीसह आरोग्यमय जीवन लाभू दे अशी प्रार्थना जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केली.
संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी 93 वर्षात पदार्पण केल्याचे औचित्य साधत शिंगणापूर येथील 93 गणेशभक्तांना राष्ट्रसंत जनार्दन स्वामीभक्त भीमा संवत्सरकर, विजय जाधव, लोकनियुक्त सरपंच सुनिता संवत्सरकर, यांच्या संकल्पनेतून 93 गणपती मूर्तीचे मोफत वितरण विवेक कोल्हे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सुनील शिंदे, श्रीपाद गंडे, कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे संचालक रोहित वाघ माणिक संवत्सरकर आदी उपस्थित होते. या मोफत गणेश मूर्ती वितरणात दानशूर भक्तांनी दिलेल्या देणगीतील रक्कमेत स्वतःची रक्कम टाकून कोकमठाण येथील गोशाळाला हिरवा चारा देण्याचे भीमा संवत्सरकर यांनी या वेळी स्पष्ट केले.
श्री. विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, गणपती आणि संजीवनी एक अतूट नातं आहे. पूर्वी करमणुकीची साधने कमी होती. त्याकाळी संजीवनी सांस्कृतिक मंडळ गणपती दहा दिवस उत्सव काळात विविध करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करत. आता करमणुकीसाठी सोशल मीडियासह अनेक पर्याय आलेले आहेत. त्यात कोरोनाचा तिसरा लाटेचा धोका आहे, तेव्हा गणेशभक्तांनी स्वतःसह परिसर व गावाची काळजी घ्यावी, सुरक्षित राहून गणरायाचा उत्सव पार पाडावा., युवकांनी दहा दिवस काळजी घेत सामाजिक कार्य करून पर्यावरण संतुलनासाठी घरच्या घरी काम करावे, गणराय आलेली सगळी संकटे दूर करण्यासाठी सर्वांना शक्ती देवो असे ते म्हणाले. शेवटी ग्रामपंचायत सदस्य सुनील शिंदे यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment