गोदावरी नदीपात्रात 35000 क्यूसेक्स वेगाने पाणी


कोपरगाव प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्याच्या धरण परिक्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे गंगापूर धरण  दारणा धरण  काठोकाठ भरले  आहेत श्रीगणेशच्या आगमनासोबतच पावसाचेदेखील  पुनरागमन झाले आहे. त्यामुळे नाशिक  त्र्यंबकेश्वर  इगतपुरी  परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या चोवीस तासात सुरगाना येथे सर्वाधिक 316.1 मिलिमीटर तर त्यापाठोपाठ त्रंबकेश्वर मध्ये 305 .4मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजता 33497 क्यूसेक्स नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले आहे त्यामुळे गोदाकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे

धरणक्षेत्रात संततधार पाऊस पडत असल्याने गंगापूर धरण   दारणा 100 टक्के भरले आहे. नाशिकच्या धरण क्षेत्रात ९० टक्के पेक्षा जादा साठा झालेला आहे. त्यामुळे आता धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.

दारणा   गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन विभागाला पुराच्या नियंत्रणासाठी आवश्यक ती यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.दि.14/09/2021, सायंकाळी 6.00 वा.
 प्रवरा नदी - अ) भंडारदरा धरण विसर्ग - *3,252* क्यूसेस. ब) निळवंडे धरण - *6,244* क्यूसेस. क) ओझर बंधारा - *19,947* क्यूसेस.
 गोदावरी नदी – नांदूरमधमेश्‍वर बंधारा विसर्ग - *26,246* क्यूसेस.
 भिमा नदी - दौंड पूल विसर्ग - *21,505* क्यूसेस.
 मुळा नदी - मुळा धरण विसर्ग - 1,075  क्यूसेस. पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती पाटबंधारे खात्याच्या वतीने देण्यात आली.
छायाचित्र महेश जोशी कोपरगाव गोदावरी नदी वरील छायाचित्र

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा