कोपरगाव तालुक्यात दोन दिवसांत ११० मिलिमीटर पावसाची नोंद
कोपरगाव प्रतिनिधी गेल्या दोन दिवसापासून तालुक्यात 110 मिलीमीटर पाऊस(4 इंच दहा मिलिमीटर पाऊस) पडल्याची नोंद जेऊर कुंभारी हवामान केंद्रावर झाली आहे. तर मराठवाड्यातील जायकवाडी धरण 98 टक्के भरले आहे. दरम्यान नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून सकाळी45 हजार 400 क्यूसेक्स तर गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात तीन हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे अशी माहिती केंद्रीय जल आयोगाचे कोपरगाव केंद्राचे साईड इन्चार्ज संजय पाटील यांनी दिली सद्यस्थितीला गोदावरी नदी पात्राची पाणी पातळी दोन मीटर आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरासह निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील गावांमध्ये संततधार पाऊस फोडत आहे. सततच्या पावसामुळे गोदावरी नदीच्या उपनद्या आणि ओढे नाल्यांना पूर आला आहे. निफाड तालुक्यात असलेल्या नांदूर-मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाणी दाखल होत आहे. या धरणातून पाण्याचा विसर्ग सायंकाळी सहा वाजता 35 हजार617 क्यूसेक्स सुरु करण्यात आला. गोदावरी नदीपात्रातून जवळपास 40 ते 45 टीएमसी पाणी वाहून गेल्याने जायकवाडी धरण 98 टक्के भरले आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्याला दिलासा देणारी ब