गुरु शुक्राचार्यांना सिंहासनमुकुट
कोपरगाव प्रतिनिधी
शहरानजीक असलेल्या बेट भागातील सोमवार निमित्त औचित्य साधून परमसद्गुरु श्री गुरु शुक्राचार्य महाराज यांना मंदिर प्रशासनाच्या वतीने सिंहासन बनवले असून त्या सिहासनाला येथील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर रामदास आव्हाड यांनी चांदीचा मुलामा देण्याचे कबूल केले आहे. या सिंहासनाचे श्रावणी सोमवार निमित्त अभिषेक करून मुखवटापूजन येथील आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टर रामदास आव्हाड त्यांच्या पत्नी सौ अंजली आव्हाड होमिओपॅथिक डॉक्टर राजेंद्र श्रीमाळी सौ मनीषा श्रीमाळी यांचे हस्तेकरण्यात आले . सिंहासनाचे पुजन करीत असतानाच डॉक्टर आव्हाड यांनी लगेचच सिंहासनाला चांदीचा मुलामा देण्याचे गुरु शुक्राचार्य मुखवट्याच्या साक्षीने कबूल केले .सदरचे सिंहासन श्रीरामपूर येथील स्वामी आर्ट चे चालक कलाकार रोहिदास राऊत यांनी केले असून हे सिंहासन संपूर्ण ऍक्रेलिक पद्धतीने बनवले आहे त्यांनी याआधी या मंदिरासाठी दोन वर्षापूर्वी दोन मोठाले हत्ती गजराज मंदिरासाठी तयार करून दिले होते अशी माहिती अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी दिली. यावेळी सचिन परदेशी प्रसाद प-हे मुन्ना आव्हाड संजय वडांगले विकास शर्मा विशाल राऊत भागचंद रुईकर डी एन आव्हाड सर यांच्यासह नागरिक सोशल डिस्टंसिंग पळून उपस्थित होते. डॉक्टर आव्हाड यांनी चांदीचे सिंहासन बनवून देण्याचे कबूल केल्याने त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.
Comments
Post a Comment