रक्षाबंधन साजरा करून सासरी परतत असलेल्या श्रीरामपूरच्या नवविवाहितेचा कोपरगाव जवळअपघातात दुर्दैवी मृत्यू भाऊ जखमी
कोपरगाव प्रतिनिधी
नगर-मनमाड महामार्गावर शहरानजीक असलेल्या मोठ्या पुलावरून भावासोबत सासरी जाणाऱ्या नवविवाहितेला एका भरधाव कंटेनरने जोराची धडक दिल्याने श्रीरामपूरच्या नवविवाहितेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून अपघात होताच कंटेनरचालक पळून गेला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे
याबाबतचीअधिक माहिती अशी भाऊ बहिणीच्या
अतूट नात्यांचा सण रक्षाबंधन या निमित्ताने नवविवाहिता प्रियंका सचिन साळुंके (वय २४)हल्ली रा.मालूजे खुर्द ता श्रीरामपूर ही येवला तालुक्यातील देशमाने येथे भावासोबत आली होती मोठ्या आनंदाने सण साजरा करून सासरी मोटारसायकल वरून जात असताना कोपरगाव शहरातील नगर - मनमाड महामार्गावर असलेल्या गोदावरी मोठ्या पुलानजीक दुचाकीला कंटेनरने जोराची धडक दिल्याने अपघात होऊन या अपघातात नवविवाहितेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पथकाने याठिकाणी येऊन नवविवाहिता व तिच्या भावाला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी नवविवाहित तरुणीला मयत घोषित केले. दरम्यान पोलीसांनी कंटेनर ताब्यात घेतला आहे बाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
Comments
Post a Comment