कोपरगांव बाजार समितीने दिले कर्मर्‍यांना विमा सुरक्षा कवच

कोपरगांव प्रतिनिधी

जगभरात थैमान घालणार्‍या कोरोना विषाणू संसर्गाविरूद्ध प्रत्येक भारतीय धैर्याने लढा देत आहे. या कठिण  प्रसंगी येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमधील सेवा देणार्‍या सर्व कर्मचार्‍यांना संस्थेतर्फे विमा सुरक्षा कवच देण्यात आले आहे.
बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे उपसभापती राजेंद्र निकोले सचिव नानासाहेब रणशुर  व सर्व संचालक मंडळाच्या पुढाकाराने प्रत्येक कर्मचार्‍यांचा पाच लाखाचा विमा काढण्यात आला आहे. बाजार समितीमधील 20 कर्मचार्‍यांना या विम्याचा लाभ मिळणार आहे.
कोपरगांव बाजार समितीमध्ये मोठया प्रमाणात शेतमालाची खरेदी विक्री होते. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या कोपरगांव बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांना विविध सुविधा दिल्या जातात. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असतांना सुद्धा बाजार समितीमधील कर्मचारी सेवा देत असतात. अशा प्रसंगी कर्मचारी व त्याच्या कुटूंबियांची भविष्याची काळजी घेण्यासाठी बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे, उपसभापती राजेंद्र निकोले सचिव नानासाहेब रणशुर व सर्व संचालक मंडळ यांनी पुढाकार घेवून प्रत्येक कर्मचार्‍यांना पाच लाखांचा सुरक्षा विमा कवच दिले आहे या निर्णयामुळे कर्मचार्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"