मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा दिन साजरा...

कोपरगाव प्रतिनिधी

मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी  तालुका एज्युकेशन सोसायटीचे  अध्यक्ष अशोक  रोहमारे, संस्थेचे सचिव ऍड. संजीव कुलकर्णी, संस्थेचे विश्वस्त  संदीप रोहमारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, कार्यालयीन अधीक्षक डॉ. अभिजीत नाईकवाडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उप-प्राचार्य  बी . आर. सोनवणे, जिमखाना समितीचे चेअरमन  जी. एन. डोंगरे,  एस. बी. जगझाप,  डी.एस. बुधवंत व शारीरिक शिक्षक  एम. व्ही. कांबळे उपस्थित होते.
             कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुष्पहाराने पूजन करण्यात आले.  पाहुण्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या चारित्र्याविषयी बहुमोल माहिती देत क्रीडा क्षेत्रातील योगदानावरही प्रकाश टाकला. कार्यक्रम प्रसंगी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. जिमखाना समिती चेअरमन यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"